रेशन कार्ड धारकांसाठी
महत्वाची बातमी, नियमात होणार मोठा बदल!
तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल तर ही बातमी
तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण रेशन कार्डच्या नियमात बदल होणार आहे. अन्न
आणि सार्वजनिक वितरण विभाग हे बदल करण्यात येणार आहे. खरंतर हा विभाग शासकीय
शिधावाटप दुकानातून रेशन घेणार्या पात्र लोकांसाठी ठरवलेल्या मानकांमध्ये बदल करत
आहे. नवीन मानांकाचा मसुदा आता जवळपास तयार झाला आहे. यासंदर्भात या विभागाच्या
प्रत्येक राज्याच्या सरकारांसोबत अनेक बैठकाही झाल्या आहेत. दरम्यान, नवीन नियम आणि हे बदल
कोणते असणार याबाबत जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे
अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या माहितीनुसार सध्या देशभरातील 80 कोटींहून
अधिक नागरिक रेशनच्या सुविधेचा लाभ घेत आहे. जे नागरिक आर्थिकदृष्ट्या संपन्न आहेत. ते
देखील या सेवेचा लाभ घेत आहे, ज्यामुळे बऱ्याचदा ज्या लोकांना खरचं या अन्नाची गरज आहे
किंवा जे लोक
खरोखरंच आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्यांना याचा लाभ घेता येत नाही.
हीच बाब लक्षात घेता, सार्वजनिक वितरण मंत्रालयाने मानकांमध्ये बदल करण्याचे ठरवले
आहे. ज्यामुळे आता अशी कोणतीही गडबड होऊ नये म्हणून नवीन मानक
पूर्णपणे पारदर्शक केले जाणार आहेत. यासंदर्भात माहिती देताना अन्न
आणि सार्वजनिक वितरण विभागाने सांगितले की, गेल्या सहा महिन्यांपासून
मानकांमध्ये बदल करण्याबाबत राज्यांशी बैठक सुरू आहे. राज्यांनी दिलेल्या
सूचनांचा समावेश करून पात्रांसाठी नवीन मानके तयार केली जात आहेत. ही
मानके लवकरच निश्चित केली जातील.
कुणाला मिळेल लाभ?
दरम्यान, हे
नवीन मानक लागू झाल्यानंतर या सेवेचा केवळ पात्र व्यक्तींनाच लाभ मिळेल, अपात्र व्यक्तींना याचा लाभ मिळू शकणार नाही. गरजूंना डोळ्यासमोर ठेवून हा
बदल करण्यात येत आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या म्हणण्यानुसार, डिसेंबर 2020 पर्यंत 32 राज्ये
आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘एक राष्ट्र, एक रेशन कार्ड योजना’ लागू करण्यात आली आहे. सुमारे 69
कोटी लाभार्थी म्हणजेच NFSA अंतर्गत येणाऱ्या
लोकसंख्येपैकी 86 टक्के लोक या योजनेचा लाभ घेत आहेत. तर दर
महिन्याला सुमारे 1.5 कोटी लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी
जाऊन या सेवेचा लाभ घेत आहेत.