तलाठी गट क संवर्गाची रिक्त असलेली सर्व महसुली
विभाग मिळून राज्यातील एकूण १०१२ रिक्त पदे भरण्यास अखेर शासनाने मान्यता दिलेली
आहे. सन २०२२ ची तलाठी पदभरतीची कार्यपद्धती स्वतंत्र पणे नंतर कळविण्यात येईल.
The government has approved filling a total of 1012 vacancies in the state, including all the revenue departments of the Talathi Group C category. The procedure for recruitment of Talathi for the year 2022 will be informed separately later.
तत्पूर्वी, आपल्या संदर्भाधीन पत्रान्वये, तलाठी (गट-क) च्या सादर केलेल्या दि. ३१/१२/२०२० अखेर पर्यंतचा रिक्त पदांबातचा सामाजिक आरक्षण व समांतर आरक्षणनिहाय भरावयाचा तपशील (Vacancy Matrix) आपल्या अधिनिस्त जिल्हाधिकारी कार्यालयांकडून प्राप्त करून एकत्रितरीत्या आपल्यामार्फतच शासनास दि. २८/०३/२०२२ पर्यंत खास दुतामार्फत पाठविण्याची क्षमता घ्यावी.
तलाठ्यांना महसुली अभिलिखे ठेवणे व शासकीय अभिलिखे ठेवणे व शासकीय वसुली करणे इत्यादी प्राथमिक कामे असतात. याशिवाय गावपातळीवर तो महसूल विभागाचा कर्मचारि असल्यामुळे महसूल विभागा मार्फत केली जाणारी विविध कामे तलाठ्या मार्फत पार पाडली जातात, परंतु दिंडवी च्या तलाठ्यावर तीन साज्याचा डोलारा असल्याने ग्राम विकासात खोळंबा येत आहे आणि अनेक नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
जारावंडी परिसरात जारावंडी दिंडवी आणि वडसाखुर्द असे तीन साजे आहेत आणि या साज्या अंतर्गत जवळपास 24 गावे येतात आणि या सर्व गावांचा भार एकाच तलाठ्यावर असल्याने नागरिकांची हेळसांड होत आहे. 2020 पूर्वी तीनही साज्यावर कार्यरत तलाठी होते. परंतु जारावंडी च्या महिला तलाट्याची काही कारणांस्तव शेतकऱ्यांनी तहसीलदारांना तक्रार केली आणि त्या तलाठ्याची बदली करण्यात आली आणि वडसाखुर्द च्या तलाठ्याची इतरत्र बदली करण्यात आली आणि या दोनही साज्यांचा भार दिंडवीच्या तलाठ्यावर सोपविण्यात आला.
गावोगावचे अर्थकारण अन मालमत्ताचा लेखाजोखा ठेवणाऱ्या तलाठी त्यांची गरज किती असते. हे त्यांच्या अनुपस्थितच कळते अशीच परिस्थिती जारावंडी परिसरात पाहायला मिळते अशात महसूल नोंदी व कर वसुली, सातबारा उतारा देण्यासह ऑनलाईन कामकाज, अवैध गौण खनिजविरोधातील कारवाई आदि महत्वाचे कामे मार्गी लावणारा तलाठी गावाच्या कामकाजाचा कणा असतो. महसूलचे मूळ काम सोडून संजय गांधी निराधार योजना,निवडणुक,पुरवठा विभाग,पिकासह विविध पंचनामे, सर्वेक्षण अशा विविध अतिरिक्त कामांचे ओझे झाले आहेत अश्यात परिसरात एकच तलाठी असल्याने अनेक नागरिकांना शासनाच्या योजना पासून वंचित राहावे लागत आहे तरी रिक्त असलेल्या साज्यांमध्ये तलाठ्यांची पदे लवकरात लवकर भरावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

