मागेल त्याला शेततळे
कोरडवाहू
शेतकर्यांना आपल्या शेतजमिनीवर पिके घेताना पाणी टंचाईची समस्या निर्माण होते.
काही शेतजमिनींवर विहिरीसुद्धा नसतात. मराठवाडा व विदर्भात परिस्थिती हलाखीची
असते. खान्देशातील जळगाव, धुळे व नंदुरबार हे जिल्हेदेखील या परिस्थितीतून सुटलेले नाहीत. पावसाच्या
पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतीसाठी पूरक व्यवस्था म्हणून ‘मागेल त्याला
शेततळे’ योजनेकडे पाहिले जाते.
येथे पहा - पीएम किसान हप्ता खात्यावर कधी पडणार
शेततळ्यांचा लाभ घेतांना वैयक्तिक व सामुदायिक अशा दोन प्रकारे लाभ घेता येतो.
सामुदायिक शेततळ्याचा लाभ घेताना लाभार्थ्यांनी रुपये १०० च्या बॉंडसह अर्ज सादर
करणे बंधनकारक असते. आत्महत्याग्रस्त व दारिद्र्यरेषेखालील शेतकर्यांना प्राधान्य
असल्यामुळे त्याविषयीचे प्रमाणपत्र अर्ज सादर करणे, ‘आपले सरकार’ वेब वर स्वत:ची प्रोफाईल तयार करणे व महा-ई
सेवा केंद्रातूनच ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. कोकण विभाग वगळता इतर
जिल्ह्याकरिता लक्ष्यांक, अर्जदार शेतकर्याकडे किमान १.५ एकर (०.६० हेक्टर) जमीन धारणा असणे गरजेचे
आहे. त्या अर्जदार शेतकर्याने यापूर्वी इतर कोणत्याही योजनेतून शेततळ्याचा लाभ
घेतलेला नसावा. तसेच त्याची जमीन तांत्रिकदृष्ट्या योग्य असावी व मागील पाच वर्षात
पैसेवारी ५०% पेक्षा कमी किमान एक वर्ष तरी घोषित झालेली असावी.
दारिद्र्यरेषेखालील कुटुंब व आत्महत्याग्रस्त वारसास व वय ज्येष्ठता यादीनुसार
पात्र लाभार्थ्यास प्राधान्य देण्यात आले आहे. किमान आकारमान इनलेट आऊटलेटसह १५
बाय १५ बाय ३ मी. ते ३० बाय ३० बाय ३ तसेच इनलेट आऊटलेट विरहित शेत तळ्यासाठी
आकारमान किमान १५ बाय १५ बाय ३ मी. ते २० बाय १५ बाय ३ मी. असणे बंधनकारक ठरवले
आहे. तसेच पात्र अनुदान रकमेव्यतिरिक्त उर्वरित सर्व खर्च लाभार्थ्याने स्वतः करणे
बंधनकारक राहील, असे काही निकष लावण्यात आले आहेत.
राज्य सरकार व केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत
असतात. त्यातलीच एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे ‘मागेल त्याला
शेततळे ‘योजना होय,ही योजना
फेब्रुवारी 2016 रोजी राज्य मंत्रिमंडळात मंजूर झाली. या
योजनेसाठी साधारणपणे दहा हजार कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आली.
येथे - घरकुल योजना , घर नाहि सरकार जागा देणार वाळू पण देणार
या योजनेचे एकमेव उद्दिष्ट असाही टंचाईग्रस्त भागामध्ये
पाण्याचा स्त्रोत निर्माण करणे होय. तसेच तेथील जमीन लागवडीकरीता आणण्याचे
उद्दिष्ट सरकारचे होते. यासाठी या योजनेचे आयोजन केले आहे. शेती उत्पन्नामध्ये
शाश्वत आणण्यासाठी तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उपयुक्त ठरते.
या योजनेअंतर्गत सर्वसाधारण सर्वात मोठ्या आकाराचे शेततळे 30×30×3 मीटर असून सर्वात कमी 15×15×3 इतक्या आकार
मानाचे असेल.
30×30×3 मीटर
शेततळ्यासाठी रुपये 50,000 हजार इतके किमान अनुदान देण्यात आले आहे. 50 हजार पेक्षा जास्त खर्च झाल्यास उर्वरित रक्कम लाभार्थ्याने
स्वता: करावयाचे आहे. शेततळ्याची मागणी करण्यासाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावे
लागेल.
येथे पहा - पीएम किसान 2000 रु ऐवजी 5000 रु मिळणार
शेततळ्यासाठी
अटी / नियम
Ø कृषि विभागाचे कृषी सहाय्यक / कृषि सेवक
यांनी निश्चित केलेल्या ठिकाणी शेततळे घेणे बंधनकारक असेल.
Ø कार्यारंभ आदेश मिळाल्या पासून शेततळ्याचे
काम तीन महिन्यात पूर्ण करणे बंधनकारक राहील .
Ø लाभार्थींना स्वतःचे राष्ट्रीयकृत बँक / इतर
बँकेतील खाते क्रमांक संबंधित कृषी सहाय्यक /कृषी सेवक यांकडे पासबुकच्या झेरॉक्स
सह सदर करावा .
Ø कामासाठी कोणतीही आगाऊ रक्कम मिळणार नाही .
Ø शेततळ्याच्या बांधावर व पाण्याच्या
प्रवाहाच्या भागामध्ये स्थानिक प्रजातीच्या वनस्पतींची लागवड करावी .
Ø शेततळ्याची निगा व दुरुस्तीची जबाबदारी
संबंधित शेतकर्याची राहील
Ø पावसाळ्यात तळ्यात गाळ वाहून येणार नाही अथवा
साचणार नाही यासाठी व्यवस्था लाभार्थ्याने स्वत करावी .
Ø लाभार्थ्याच्या ७/१२ उताऱ्यावर शेततळ्याची
नोंद घेणे बंधनकारक आहे .
Ø मंजूर आकारमानाचे शेततळे खोदणे हे बंधनकारक
राहील.
Ø शेततळ्याला इनलेट आउटलेट ची सोय असावी .
Ø शेततळ्यासाठी प्लास्टिक अस्तरिकरण अर्जदाराला
स्वखर्चाने करावे लागेल.
येथे पहा - राशन दुकानात मिळणार इतर सामान
शेततळ्यासाठी लागणारे कागदपत्रे
Ø जातीचा दाखला
Ø ७/१२ चा उतारा
Ø ८ -अ नमुना (संबंधित शेतक-याचे ८ अ प्रमाणे
एकूण क्षेत्र)
Ø आत्महत्याग्रस्त्त कुटुंबाच्या वारसाचा
दाखला. (तलाठी)
Ø दारिद्र्य रेषेबाबतचा दाखला (ग्राम सेवक)
Ø स्वतःच्या स्वाक्षरीसह भरलेला अर्ज
Ø आधार कार्ड (उपलब्ध असल्यास)
Ø बँक पासबुक
येथे पहा - अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी
अर्जाची पद्धत खालीलप्रमाणे
1.
अर्ज भरण्यासाठी प्रोफाईल वरून लॉगिन करा व्यक्तिगत किंवा
सामूहिक शेततळे हा पर्याय निवडा त्यानंतर अर्ज दाखल करून एप्लीकेशन नंबर लिहून
ठेवा.
2.
उल्लेख केलेल्या कागदपत्रांचा पीडीएफ मध्ये अपलोड करून सबमिट
करा.
3.
डाऊनलोड केलेल्या फॉर्मवर सही करण्यासाठी जिथे जागा असेल
तिथे सही करा.
4.
तसेच दारिद्र रेषेखालील चा दाखला (असेल तर), आत्महत्याग्रस्त कुटुंबाचा वारस दाखला (असेल तर) सातबारा उतारा
चा उतारा इत्यादी कागदपत्रे स्कॅन करून ठेवा.
येथे पहा - पिक विमा यादी