ज्यांना घर नाही,त्यांना मिळणार घरकुल

ज्यांना घर नाही,त्यांना मिळणार घरकुल

 




महाविकास अभियान अंतर्गत मिळणार घरे.

२० नोव्हेंबर २०२१ या राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून महा आवास अभियान ग्रामीण २०२१-२२ सुरु होत आहे. तुम्हाला जर घर नसेल तर तुमच्यासाठी हि आनंदाची बातमी ठरू शकते कारण महा आवास अभियान ग्रामीण 2021-22’ सुरु होणार असल्याचा शासन निर्णय नुकताच महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे या संबधित माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री मंत्री हसन मुश्रीफ यांनी सुद्धा या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या महासंवाद या संकेतस्थळावर दिलेली आहे.

येथे पहा - शेतकऱ्यांना मिळणार 2000 ऐवजी 5000 रु

महा आवास अभियान ग्रामीण २०२१-२२ संदर्भातील ठळक माहिती.

सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाचे धोरण आहे आणि हेच धोरण महाराष्ट्र राज्याने स्वीकारलेले आहे त्यामुळे केंद्र पुरस्कृत        प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजनेप्रमाणेच खालील राज्यपुरस्कृत योजना सुद्धा राबविण्यात येत आहेत.

Ø रमाई आवास योजना.

Ø शबरी आवाज योजना.

Ø पारधी आवास योजना.

Ø आदिम आवास योजना.

Ø अटल बांधकाम कामगार आवास योजना.

Ø यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना.

वरीलप्रमाणे विविध गृहनिर्माण योजना राज्यात राबविण्यात येत आहेत. या योजनांना पूरक योजना म्हणून पंडित दिनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना तसेच अतिक्रमण नियमानुकूल करण्याची योजना सुद्धा राबविण्यात येत आहे.

येथे पहा - अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी जाहीर.

महा आवास अभियान ग्रामीण २०२१-२२ अंतर्गत खालील उपक्रम राबविण्यात येईल.

राज्य शासनाच्या या संदर्भात कोणते उपक्रम राबविण्यात येणार आहेत या संदर्भातील माहिती शासननिर्णयामध्ये देण्यात आलेली आहे. या जी आर मध्ये अगदी तपशीलवारपणे हि माहिती देण्यात आलेली आहे यापैकी काही ठळक मुद्दे आपण या ठिकाणी बघणार आहोत.

·         ग्रामीण भागातील गावकऱ्याकडे घर बांधकामासाठी जागा नसेल तर अशा लाभार्थ्यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थ सहाय्य योजनेमधून शासकीय जागा विनामुल्य उपलब्ध करून देणे.

·         कमी जागेत जास्त लाभार्थ्यांचा समावेश करण्यासाठी म्हणजेच ज्या लाभार्थ्यांकडे घरबांधकाम करण्यासाठी जागा उपलब्ध नाही अशा लाभार्थांसाठी प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये किमान एक या पद्धतीने बहुमजली इमारती व गृहसंकुले निर्माण करून लाभ मिळवून देणे.

·         घरकुलांचे जेवढे उद्दिष्ट असेल तेवढे पूर्ण करणे.

·         प्रलंबित घरकुले लवकरात लवकर पूर्ण करणे.

·         ग्रामीण गवंडी प्रशिक्षण पूर्ण करणे.

·         पहिल्या हप्त्याचे 100 टक्के वितरण.

·          डेमो हाऊसेस

·         विविध शासकीय योजनांशी कृती संगम

इत्यादी उपक्रम महा आवास अभियान ग्रामीण अंतर्गत राबविण्यात येणार आहेत.

येथे पहा - पिक विमा यादी २०२१

लाभार्थ्यांना घरकुल मिळावे यासाठी खालील सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Ø बहुमजली गृहसंकुले.

Ø भूमीहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देण्यासाठी लँण्ड बँक.

Ø वाळू उपलब्ध करुन देण्यासाठी सँण्ड बँक.

Ø वाळूला पर्यायी साहित्य वापरण्यासाठी प्रोत्साहन.

Ø किफायतशीर बांधकाम तंत्रज्ञान.

Ø रेन वॉटर हार्वेस्टींग.

Ø सौर उर्जा साधन व नेट बिलींग इ. चा वापर.




येथे पहा- घरकुल योजना यादी