अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी जाहीर.

अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी जाहीर.

 




अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी जाहीर तुमचे नाव आहे का यादीमध्ये.


जुलै-ऑक्टोबर २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी 2021 जाहीर 

झालेली आहे. बाधित शेतकऱ्यांना NDRF च्या तरतुदी नुसार पात्र अनुदान वाटप 

यादी आलेली आहे. तुम्ही ज्या जिल्ह्याचे रहिवासी असाल त्या जिल्ह्याच्या 

अधिकृत संकेतस्थळावर हि यादी तुम्हाला बघावयास मिळेल. शेतकरी बंधुंनो सध्या 

जी यादी प्रकाशित झालेली आहे ती औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील 

आहे. ज्या प्रमाणे सोयगाव तालुक्याची यादी या प्रकाशित करण्यात आलेली आहे 

अगदी अशाच प्रकारे इतर तालुक्यांच्या याद्या ह्या ज्याच्या त्याच्या 

जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येणार आहेत.

अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी 2021 खालीलप्रमाणे बघा.


Ø सगळ्यात अगोदर तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमधील क्रोम किंवा जे तुम्ही वापरत असाल ते ब्राउजर उघडा.

Ø ब्राउजरच्या सर्च बारमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव आणि एक्सटेन्शन gov.in हे टाका.

Ø उदाहरणार्थ https://aurangabad.gov.in/ हा वेब ॲड्रेस टाका त्यानंतर एंटर करा.

Ø वेबसाईटची भाषा इंग्रजी असेल तर स्क्रीनच्या उजव्या बाजूच्या कोपऱ्यामध्ये जावून मराठी करून घ्या.

Ø वेबसाईटच्या नेव्हिगेशन बारवर दस्ताऐवज हा पर्याय शोधा.

Ø दस्ताऐवज पर्यावर क्लिक करताच या ठिकाणी तुमच्या जिल्ह्याची जुलै-ऑक्टोबर २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना NDRF च्या तरतुदी नुसार पात्र अनुदान वाटप यादी या ठिकाणी तुम्हाला दिसेल तुम्ही ज्या जिल्ह्यातील असाल किंवा तालुक्यातील असाल त्या पर्यायासमोरील pdf आयकॉनवर क्लिक करा आणि हि यादी तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड करून घ्या.


उर्वरित जिल्ह्यातील अतिवृष्टीची नुकसान भरपाई लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे तरी  यादी शेतकर्यांनी आपआपल्या जिल्ह्याच्या संकेतस्थळावर जाऊन चेक करू शकता.