शेतकऱ्यांना मिळणार 2000 ऐवजी 5000 रु

शेतकऱ्यांना मिळणार 2000 ऐवजी 5000 रु

 






अर्थात पीएम किसान योजना.. मोदी सरकारची महत्वाकांक्षी योजना. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी (2 हेक्टरपेक्षा कमी शेती) 2019 मध्ये मोदी सरकारने ही योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत प्रत्येकी 2000 रुपये 3 हप्त्यांत शेतकऱ्यांच्या खात्यांवर वर्ग केले जातात.

मोदी सरकारने आतापर्यंत पीएम किसान योजनेचे 9 हप्ते दिले असून, येत्या डिसेंबरमध्ये 10वा हप्ता जमा होणार आहे. मात्र, या हप्त्यात शेतकऱ्यांना दोन हजार रुपये नव्हे, तर पाच हजार रुपये मिळणार आहेत. हे अतिरिक्त पैसे शेतकऱ्यांना कसे मिळणार आहेत, याबाबत जाणून घेऊ या..

मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी दुसरी एक योजना सुरु केलेली आहे.. पीएम किसान मानधन योजना असे त्याचे नाव.. या योजनेच्या माध्यमातून वयाच्या साठीनंतर शेतकऱ्यांना पेन्शन दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत दर महिन्याला शेतकऱ्यांना 3000 रुपये पेन्शन मिळणार आहे.

देशातील अनेक राज्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक (vidhansabha Election 2022) होणार आहे. त्यात उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि पंजाब (Punjab) सारख्या मोठ्या राज्यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशात भाजप (BJP) सत्तेत आहे तर पंजाबमध्ये काँग्रेसची (Congress) सत्ता आहे. अशात उत्तर प्रदेशात सत्ता कायम ठेवण्यासाठी आणि पंजाबमध्ये काँग्रेसला सत्तेतून बेदखल करण्यासाठी भाजपनं जोरदार तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे

पंतप्रधान किसान सन्मान निधीचा (PM Kisan Samman Nidhi) पुढील हप्ता 15 डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 ऐवजी 5000 रुपये जमा येऊ शकतात, असा कयास लावण्यात येत आहे. मात्र, अद्याप सरकारने घोषणा केलेली नाही

मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकार शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपयांऐवजी 12,000 रुपये तीन हप्त्यात देऊ शकते. याशिवाय 2024 पासून पीएम किसान सम्मान निशीच्या रकमेत दुप्पट वाढ होण्याची शक्यता आहे. याबाबत गेल्या तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. बिहारचे कृषीमंत्री अमरेंद्र प्रताप सिंह यांनी दिल्लीत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट घेतली, तेव्हापासून या चर्चेला बळ मिळालं आहे. याचा अर्थ केंद्र सरकार लवकरच याबाबत निर्णय घेऊन शेतकऱ्यांना खूशखबरी देऊ शकते

दरम्यान, आतापर्यंत केंद्र सरकारने देशातील 11.37 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 1.58 लाख कोटी रुपये ट्रान्सफर केले आहेत. केंद्र सरकार येत्या 15 डिसेंबरपर्यंत पीएम किसान सम्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Scheme) 10 वा हप्ता देण्याची तयारी करत आहे. सरकारने 25 डिसेंबर 2020 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर केले होते.

वयाच्या 60 वर्षानंतर मिळणार पेन्शन:

केंद्र सरकारच्या पीएम किसान मानधन योजनेंतर्गत वयाच्या साठीनंतर शेतकऱ्यांना पेन्शनचा लाभ मिळणार आहे. या अंतर्गत दर महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. (Farmers will now get Rs 5,000 instead of Rs 2,000 “PM Kisan Samman Nidhi Yojana”)

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पीएम किसान मानधन पेन्शन योजनेत नोंदणी करणे बंधनकारक आहे. या योजनेसाठी 18 ते 40 वयोगटातील कोणतीही व्यक्ती नोंदणी करू शकणार आहे. पीएम किसान योजनेंतर्गत देशातील शेतकऱ्यांना तीन हप्त्या मध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यात येतात.

या योजनेतील लाभार्थ्याच वय हे साठ वर्षाहून जास्त असेल आणि त्याने पीएम किसान मानधन पेन्शन योजनेत नोंदणी केली असेल तर, त्याला प्रत्येक हप्त्यात अतिरिक्त तीन हजार रुपये देण्यात येणार आहेत. म्हणजे आधी दोन हजारांचा हप्ता मिळायचा, तो आता पाच हजार रुपयांचा राहणार आहे.

या योजनेत नोंदणी करण्यासाठी खालील कागदपत्रे लागतात.

  • आधार कार्ड
  • ओळख पत्र
  • वयाचा दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • बॅंक पासबुक
  • मोबाईल क्रमांक
  • पासपोर्ट साईजचा एक फोटो

इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.