PM Kisan Yojana : किसान योजनेचे पैसे अजूनही खात्यात आले नसतील तर काय कराल? वाचा!

PM Kisan Yojana : किसान योजनेचे पैसे अजूनही खात्यात आले नसतील तर काय कराल? वाचा!

 





 

PM Kisan Samman Nidhi : पीएम किसान योजनेच्या 15 व्या हफ्त्याचे पैसे अद्यापही खात्यात आले नसतील तर शेतकऱ्यांनी लगेचच काही गोष्टी कराव्यात

 

 

PM Kisan 15th installment released : बऱ्याच प्रतीक्षेनंतर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 15 वा हफ्ता अखेर आला आहे. तब्बल ८ कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या बँक खात्यात सोमवारी प्रत्येकी २ हजार रुपये पोहोचले आहेत. एकूण १६ हजार कोटींहून अधिक रक्कम ट्रान्सफर झाली आहे.

 

ही योजना सुरू झाल्यानंतरचा हा 15 वा हफ्ता आहे. यापूर्वी १२ वेळा ही रक्कम शेतकऱ्यांना मिळाली आहे. मात्र, कधी-कधी काही तांत्रिक चुकांमुळं किंवा आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यामुळं हे पैसे खात्यात येत नाहीत. अशा वेळी लाभार्थ्यांना याची चौकशी करावी लागते व माहिती घ्यावी लागते.

 

तुमच्या खात्यात 15 वा हफ्ता आला का?

डिसेंबर-मार्चसाठीची २ हजार रुपयांची रक्कम तुमच्या खात्यात आली आहे की नाही, हे तुम्हाला पाहावं लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाइल किंवा लॅपटॉपवर पुढील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

  • सर्वात आधी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जा.
  • तिथं उजव्या बाजूला तुम्हाला 'फार्मर्स कॉर्नर'चा पर्याय मिळेल
  • तिथं 'लाभार्थी स्थिती' या पर्यायावर क्लिक करा. एक नवीन पान उघडेल.
  • नवीन पानावर आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक यापैकी कोणताही एक पर्याय निवडा. या २ क्रमांकांद्वारे तुम्ही तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे तपासू शकता.
  • तुम्ही निवडलेल्या पर्यायाची संख्या टाका. त्यानंतर 'Get Data' वर क्लिक करा.
  • इथं क्लिक केल्यानंतर, तुम्हाला सर्व व्यवहारांची माहिती मिळेल. तुमच्या खात्यात कोणता हप्ता कधी आला आणि कोणत्या बँक खात्यात जमा झाला हे कळू शकेल.

 

SMS आला नसेल तर काय कराल?

पीएम किसान योजनेअंतर्गत १२ कोटींहून अधिक शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. याचाच अर्थ अद्याप सुमारे ४ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोहोचले नसतील. ३१ मार्च २०२३ पर्यंत उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम येऊ शकते. तरीही, तुमच्या खात्यात पैसे येत असल्याचा एसएमएस तुम्हाला आला नसेल, तर तुमची ऑनलाइन स्थिती तपासा किंवा या नंबरवर संपर्क करा.

पीएम किसान टोल फ्री क्रमांक: १८००११५५२६६

पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक: १५५२६१

पीएम किसान लँडलाइन क्रमांक: ०११—२३३८१०९२, २३३८२४०१

पीएम किसान नवीन हेल्पलाइन: ०११ - २४३००६०६

पीएम किसानची आणखी एक हेल्पलाइन: ०१२०-६०२५१०९

ई-मेल आयडी: pmkisan-ict@gov.in