जागतिक युवा कौशल्य दिन, दि.15.07.2021 रोजी शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत (Craftsman Training Scheme) ऑगस्ट 2021 सत्रासाठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रीयेव्दारे प्रवेश अर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संकेतस्थळावर उपलब्ध “माहितीपुस्तिका - प्रवेश पध्दती, नियमावली व प्रमाणित कार्यपध्दती” सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक अभ्यासावी. प्रवेश प्रक्रीयेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक शासकीय व खाजगी औ.प्र. संस्थांमध्ये दि.16.07.2021 पासुन रोज सकाळी 10.00 ते 11.00 या वेळेत नि:शुल्क मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे. प्रवेश पध्दती, नियमावली, प्रवेश संकेतस्थळाबाबत तांत्रिक व तद्नुषंगिक शंका असल्यास नजिकच्या शासकीय औ.प्र. संस्थेस संपर्क साधावा अथवा संबंधीत प्रादेशिक कार्यालयाच्या मदत कक्षास प्रवेश संकेतस्थळावर देण्यात आलेल्या दुरध्वनी क्रमांकावर सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत संपर्क साधावा.