गावात कूणा-कूणाला विहिर मंजूर झाल्या पहा

गावात कूणा-कूणाला विहिर मंजूर झाल्या पहा

 





Well Subsidy List : आपल्या गावातील विहिरीसाठी मंजूर लाभार्थी यादी कशी पाहिजे ते आज आपण जाणून घेणार आहोत. नरेगाच्या माध्यमातून विहीर खोदण्यासाठी चार लाख रुपये अनुदान दिले जाते.

 प्रत्येक गावातून प्रतिवर्षी 20 विहिरी मंजूर केल्या जातात.  महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून विहिरीसाठी चार लाख रुपये अनुदान दिले जाते.

 विहिरीसाठी ग्रामपंचायत मध्ये  अर्ज करावा लागतो.  यानंतर ग्रामपंचायत ठरावांमध्ये नाव समाविष्ट केले जाते.

 ग्रामपंचायत ने घेतलेल्या ठरावांमध्ये लाभार्थ्याचे नाव समाविष्ट झाल्यानंतर लाभार्थ्याला त्याच्या नावे विहिरीचा प्रस्ताव भरून द्यावा लागतो.

विहिरीचा प्रस्ताव भरून देण्यासाठी खालील कागदपत्रे जोडावी लागतात

• सातबारा  व आठ अ  झेरॉक्स प्रत

• आधार कार्ड  झेरॉक्स

• बँक पासबुक 

• जॉब कार्ड 

• जात प्रमाणपत्र आवश्यक असल्यास

आपल्या गावची विहिरीसाठी मंजूर लाभार्थी यादी Well Subsidy List  खालील प्रमाणे पहा

 सर्वप्रथम गुगलमध्ये नरेगा ग्रामपंचायत Narega Grampanchayat असे सर्च करा

 यानंतर नरेगाची वेबसाईट ओपन होईल.  त्यानंतर ग्रामपंचायत हा पर्याय निवडावा व आपले राज्य महाराष्ट्र निवडावे.

 तुमच्यासमोर खालील पद्धतीने पेज ओपन होईल.

यामध्ये आर्थिक वर्ष जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत निवडून घ्यावे.  यानंतर तुमच्यासमोर पुढील प्रमाणे पेज ओपन होईल

यामध्ये तुम्हाला लिस्ट ऑफ वर्क या पर्यायावर क्लिक करायचे आहे.  येथे तुम्हाला तुमच्या गावातील प्रत्येक आर्थिक वर्षांमध्ये कोणकोणती कामे मंजूर झाले याची यादी पाहायला मिळेल.