Namo Shetkari Yojana Status : PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असलेल्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची नवीन वेबसाईट सुरू करण्यात आलेली असून आता सर्व शेतकऱ्यांना आपला हप्ता मिळालेला आहे किंवा नाही याची स्थितीत मोबाईलवर पाहता येणार आहे. त्याचप्रमाणे आपला हप्ता कोणत्या बँक खात्यात जमा झाला ? कधी जमा झाला ? यासंदर्भातील सविस्तर माहिती सुद्धा शेतकऱ्यांना त्याठिकाणी पाहता येईल.
नमो शेतकरी योजना वेबसाईट सुरू
महाराष्ट्र शासनाची शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी योजना म्हणजे नमो शेतकरी सन्मान निधी योजना नुकतीच या योजनेची घोषणा करून याची सुरुवात करण्यात आली आणि या योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पार्श्वभूमीवर राज्यशासनाकडून महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये देण्यासाठी नमो शेतकरी योजनेची सुरुवात करण्यात आली.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता राज्यातील 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे; परंतु शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता खराच आला का ? किंवा कोणत्या बँक खात्यात पैसे जमा झाले यासंदर्भातील बऱ्याच अडचणी होत्या, त्यामुळे आता शासनाकडून नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची स्थिती म्हणजेच स्टेटस पाहण्यासाठी नवीन वेबसाईट सुरू करण्यात आलेली आहे.
नमो शेतकरी योजनेच्या अर्जाची स्थिती शेतकऱ्यांना दोन पद्धतीने पाहता येईल. सर्वप्रथम रजिस्ट्रेशन क्रमांक टाकून किंवा मोबाईल क्रमांक टाकून, जर शेतकऱ्यांना रजिस्ट्रेशन क्रमांक माहिती नसेल, तर पीएम किसान सन्माननिधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आधार क्रमांक टाकून लाभार्थी आपला रजिस्ट्रेशन क्रमांक काढून आपल्या अर्जाची स्थिती तपासू शकतात; अन्यथा मोबाईल क्रमांक टाकून सुद्धा अर्जाची स्थिती पाहता येईल. याबद्दलची सविस्तर माहिती तुम्ही खालीलप्रमाणे पाहू शकता.
नमो शेतकरी योजना पहिल्या हप्त्याची स्थिती कशी तपासावी ?
• सर्वप्रथम शासनाकडून देण्यात आलेल्या नमो शेतकरी सन्मान निधीच्या नवीन वेबसाईटला भेट द्यावी लागेल – येथे क्लिक करा
• वेबसाईटवर आल्यानंतर त्याठिकाणी तुम्हाला Beneficiary Status हा पर्याय दिसेल, त्या पर्यायावर क्लिक करायचा आहे
• त्यानंतर एक नवीन पेज उघडेल, त्याठिकाणी तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक किंवा रजिस्ट्रेशन क्रमांक टाकून तुमच्या अर्जाची म्हणजेच हप्त्याचे स्थिती पाहू शकता
• पीएम किसान योजनेचा रजिस्ट्रेशन करतेवेळी जो मोबाईल नंबर दिलेला होता. तोच मोबाईल क्रमांक टाकून Get Data
• या बटणावर क्लिक करा
• पुढील काही वेळात तुम्हाला नमो शेतकरी महासन्मानिधी योजनेच्या हप्त्याची सविस्तर माहिती शेतकऱ्यांच्या नावासह, बँकेच्या नावासह व कोणत्या तारखेला वितरित करण्यात आलेला आहे, इत्यादी सर्व माहितीसह दाखवण्यात येईल.
शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या नमो शेतकरी योजनाच्या अधिकृत वेबसाईटमुळे शेतकऱ्यांना आता सहज व सोप्या पद्धतीने हप्त्याची स्थिती तपासता येणार आहेत. कारण बहुतांश शेतकऱ्यांना अडचणी होत्या. की आम्हाला आमचा हप्ता अद्याप मिळालेला नाही किंवा कोणत्या बँक खात्यामध्ये आमचा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे.