शेतकरी बंधुंनो आता तुमच्या गावातील कृषी सेवा केंद्रामध्ये किती खत साठा उपलब्ध आहे हे तुम्ही तुमच्या मोबाईलवर तपासू शकता. खत साठा उपलब्ध असून देखील खत दिले जात नसेल तर त्या कृषी सेवा केंद्रावर आता गुन्हा दाखल होणार आहे.
कृषी सेवा केंद्रामध्ये बी बियाणे खते व औषधी इत्यादीसाठी शेतकरी बांधवांची बऱ्याच वेळेस अडवणूक होऊ शकते. तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुमची देखील बी बियाणे खते इत्यादीसाठी अडवणूक होत असेल तर तुम्ही ९८२३९१५२३४ या क्रमांकावर फोन लावून संबधित कृषी सेवा केंद्राची तक्रार करू शकता.
शासनाकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरु असतात. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी शासन विविध योजना राबवीत असते. पेरणीसाठी लागणारे बी बियाणे, खते यांचे दर शासनाने ठरवून दिलेले असतात.
परंतु काही कृषी सेवा केंद्रावर शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त दराने बी बियाणे किंवा खतांची विक्री केली जाते यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक होते.
बी बियाणे किंवा खते असून देखील शेतकऱ्यांना चढ्या भावाने विकली जात असेल किंवा शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असेल तर अशा कृषी सेवा केंद्राची तक्रार शेतकरी ९८२३९१५२३४ या क्रमांकावर फोन लावून करू शकतात.
खत साठा उपलब्ध असून अडवणूक करणाऱ्या कृषी केंद्राचा परवाना होणार रद्द.
एखाद्या कृषी सेवा केंद्रामध्ये रासायनिक खतांचा साठा उपलब्ध असून देखील दुकानदार देत नसेल तर तुम्ही लगेच तो साठा तुमच्या मोबाईलवर बघू शकता.
यासाठी कृषी विभागाच्या वतीने एक लिंक देण्यात आलेली आहे. अडवणूक जर झाली तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून शेतकरी बांधव संबधित दुकानदाराकडे किती खताचा साठा उपलब्ध आहे हे बघू शकतील आणि कृषी विभागाकडे अडवणूक करणाऱ्या कृषी सेवा केंद्राची तक्रार करू शकतील.
कृषी सेवा केंद्रांनी शेतकऱ्यांना जर बनावट बियाणे, खते, कीटकनाशके इत्यादी विक्री केल्यास अशा कृषी सेवा केंद्राचा परवाना रद्द होऊन त्यांच्यावर गुन्हा नोंदविला जावू शकतो.
शेतकरी बांधवाना अनेक संकटाचा सामना करावा लागतो. शेतीसाठी बियाणे तसेच खते खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नसतात. अशावेळी शेतकरी बांधव बँकेचे कर्ज असो कि मग सावकाराकडून व्याजाने काढलेले पैसे असो. हे पैसे पैसे आणून बी बियाणे, खते आणि इतर शेतीसाठी अवश्य असणाऱ्या निविष्ठा खरेदी करत असतात.
एवढे करूनही बी बियाणे खरेदी करण्यासाठी कृषी सेवा कांद्राकडून शेतकऱ्यांची अडवणूक झाल्यास त्यांना यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागतात. ठरविलेल्या किमतीपेक्षा आपण जास्त पैसे दुकानदारास देत आहोत हि भावना शेतकऱ्यांच्या मनामध्ये यामुळे कुठेतरी शेतकरी बांधवाला टोचल्यासारखे होते परंतु पर्याय राहत नाही.
कृषी विभागाच्या वतीने हि जि लिंक देण्यात आलेली आहे ती जालना जिल्ह्यासाठी आहे हे सर्वप्रथम वाचकांनी लक्षात घ्यावे. तुम्ही जर इतर जिल्ह्यातील असाल तर त्यासाठी वेगळी प्रणाली असू शकते. यासाठी तुम्ही तुमच्या तालुक्यातील कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधू शकता.
चला तर आता जाणून घेवूयात तुमच्या गावातील कृषी सेवा केंद्रामध्ये किती साठा शिल्लक आहे ते कसा बघावा हे जाणून घेवूयात.
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण फक्त जालना जिल्ह्यातील कृषी केंद्रावरील साठा पाहू शकता,ईतर जिल्ह्यातील साठा बघण्यासाठी आपण आपल्या जिल्हा कृषी कार्यालयाला भेट देऊन मिळवू शकता.
https://adojalnafertilizer.blogspot.com/?m=1