शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी विविध योजना राबवल्या जातात. योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला जातो.. त्याचा शेतकऱ्यांना मोठा लाभ होत असल्याचेही दिसते..
सरकारी योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी शासनाने ‘महाडीबीटी’ पोर्टल सुरु केले आहे.. कोणत्याही कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना या पोर्टलवर अर्ज करावा लागतो.. गेल्या काही दिवसांत या पोर्टलवर अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांची नावे लाॅटरी पद्धतीने जाहीर केली जातात..
‘महाडीबीटी फार्मर स्कीम’ (MahaDBT Farmer Scheme) अर्थात ‘एक शेतकरी- एक अर्ज’ योजनेच्या माध्यमातून कृषी योजनांच्या अनुदानासाठी व लाभासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या पोर्टलवर कृषी योजनांसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची लॉटरी जाहीर करण्यात आली आहे..
शेतकऱ्यांना कृषी योजनेसाठी लाॅटरी लागल्याचे, ते योजनेसाठी पात्र झाल्याचे मेसेज येत आहेत. तुम्हाला अर्ज करूनही ‘एसएमएस’ आला नसेल, तर पोर्टलवर चेक करता येईल.. याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..
पोर्टलवर असे करा चेक..!
• ‘महा डीबीटी फार्मर स्कीम’च्या पॉर्टलवर जाऊन युजर आयडी-पासवर्ड, आधार कार्ड किंवा ओटीपीद्वारे लॉगिन करू शकता.
• लॉगिन केल्यानंतर ‘तुम्ही विनर झाले आहात आणि कागदपत्रे अपलोड करावीत’ असा पर्याय दिसेल. यासह तुम्हाला ‘अर्जाच्या स्थिती’मध्ये अर्जापुढे ‘विनर’ असं दाखवले जाईल.
• अनेक शेतकऱ्यांना ‘एसएमएस’ येत असले, तरी पोर्टलवर बदल होण्यास 48 तासांचा अवधी लागतो.. त्यामुळे तुम्हाला लॉगिन करून चेक करावे लागेल.
आवश्यक कागदपत्रे
कृषी योजनेसाठी लाॅटरीत नाव असल्यास, सोमवारपासून (ता. 4) कागदपत्र अपलोड करण्यासाठी ‘ऑप्शन’ दाखवला जाईल. आवश्यक कागदपत्रे, सात-बारा, तसेच जी वस्तू खरेदी करायचीय, त्याचे कोटेशन अपलोड करावे लागेल. बँकेचे पासबुक आवश्यक आहे. ही सर्व कागदपत्रे मुदतीत भरणे अनिवार्य असते. तसा मेसेज आला असेल, तर लॉगिन करून पाहा. लॉगिन केल्यानंतर पर्याय दिसत नसेल, तर सोमवारपर्यंत वाट पाहा.