कृषी कर्ज मित्र योजना
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र शासनाच्या नवीन कृषी कर्ज योजने
संदर्भात या लेखामध्ये माहिती पाहणार आहोत. शेतकऱ्यांना वेळेत आणि सुलभरित्या कर्ज
उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने राज्यात ही योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेच्या
शासन निर्णयाची माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत. त्यामध्ये काय आहे ही योजना, या योजनेचे स्वरूप काय,
कृषी कर्ज मित्र नोंदणी प्रक्रिया, प्रकरण
करण्यासाठी सेवा शुल्काचा दर किती असणार, योजनेचा कालावधी
किती, निधीचा स्रोत व रक्कम किती, इत्यादी
सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आज या लेखात मिळणार आहेत. तसेच कृषी कर्ज मित्र
योजना GR PDF देखील तुम्हाला या लेखात पाहायला मिळणार आहे.
कृषी कर्ज मित्र योजनेचे उद्दिष्ट काय?
शेतकर्यांना कृषी कर्जाची उपलब्धता सहजतेने आणि कमीत कमी
वेळेत करून देणे आणि या द्वारे भांडवलाची गुंतवणूक वाढवून कृषी क्षेत्राचा विकास
करणे शेतकऱ्यांना कमीत कमी व्याजदरात विनाविलंब कर्ज उपलब्ध करून देणे.
सावकाराच्या जास्त व्याजाच्या कर्जापासून शेतकऱ्याची सुटका करणे.
कृषी कर्ज मित्र योजनेचे स्वरूप काय?
दरवर्षी खरीप व रब्बी हंगामामध्ये शेतकरी पीक कर्ज घेत
असतात. लागवडीखालील क्षेत्र व एकूण पीक कर्ज वाटप पाहिले असता, यात विषमता आढळून येते. कृषी क्षेत्रात भांडवलाचा ओघ व गुंतवणूक वाढवून
कृषी क्षेत्राच्या विकासात भर पाडणे आवश्यक आहे. निरीक्षण केल्यास तेच तेच
लाभार्थी वेगवेगळ्या बाबींसाठी कर्ज घेत असल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यांच्या
शेती क्षेत्रात विकास झालेला दिसून येतो. या व्यतिरिक्तशेतकरी ज्यांना कर्ज
घेण्याची इच्छा आहे, परंतु या कर्जाच्या प्रक्रियेचे ज्ञान
नसल्यामुळे आणि वेळेच्या अभावामुळे त्यांना कर्ज मिळणे शक्य होत नाही.
अशा इच्छुक आणि पात्र
शेतकऱ्यांना कृषी कर्ज सहज सुलभतेने त्यांच्या मागणीनुसार वेळेत उपलब्ध होण्यासाठी
त्यांना प्रशिक्षित स्वयंसेवकाची मदत देणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन कृषी
कर्ज मित्र यांच्या मदतीने गरजू आणि पात्र शेतकऱ्यांस ज्या बाबीसाठीचे कर्ज मिळवून
देणे आवश्यक आहे. अशी प्रकरणे कृषी कर्ज मित्र यांच्या सहाय्याने तयार करून
दिल्यास, शेतकऱ्यांना
वेळेत कर्ज उपलब्ध होईल.
कृषी मित्र यांना पैसे कसे मिळेल ?
अ)अल्प
मुदतीचे कर्ज
1) प्रथम पिक कर्ज घेणारा शेतकरी प्रति प्रकरण सेवाशुल्क दीडशे
रुपये
ब) मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज
नवीन कर्ज प्रकरण प्रति प्रकरण सेवाशुल्क अडीशे रुपये
खर्च प्रकरणाचे नूतनीकरण प्रति प्रकरण सेवा शुल्क दोनशे रुपये
कृषी कर्ज मित्र नोंदणी कशी करावी ?
कृषी मित्रांसाठी ऑनलाईन नोंदणी
कशी करावी
अ) कृषी कर्ज मित्र म्हणून सेवा देऊ
इच्छिणाऱ्या व्यक्तीने जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी ( अद्याप
कोणत्याही जिल्ह्याच्या संकेतस्थळावर नोंदणी साठी प्रकिया सुरू नाही.
ब) नोंदणी
झालेल्या इच्छुक व्यक्तींची यादी तयार करून त्यास कृषी समितीची मान्यता घेण्यात
येईल.
क) जिल्हा परिषदेकडील कृषी समितीस अंतिम निवडीचे अधिकार राहतील.
कर्ज मित्राचे काम काय ?
कृषी कर्ज मित्रांनी ज्या
शेतकऱ्यांना कृषी कर्जाची आवश्यकता आहे त्यांना भेट देऊन कर्ज प्रकरणाच्या
कार्यपद्धतीची सविस्तर
माहिती द्यावी लागणार आहे. कृषिकर्ज मित्र कृषी कर्जासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे गोळा करून
शेतकऱ्यांना संबंधी ने
कर्ज प्रकरण तयार करून
मंजुरीसाठी बँकेमध्ये सादर करेल. कृषी कर्ज मित्र हा बँक व
शेतकरी यांच्या मधील मध्यस्थीची
भूमिका ऐवजी सहाय्यक व
सल्लागाराची भूमिका बजावणार आहे याठिकाणी लक्षात घेण्यासारखा आहे मित्रांनो जो
कृषिकर्ज
मित्र आहे. हा फक्त भूमिकेत जाऊन मध्यस्थीची भूमिका नसून फक्त सहाय्यक व सल्लागाराची
भूमिका बजावणार आहे
कृषिकर्ज मित्रांनी पारदर्शी व
प्रामाणिकपणे शेतकऱ्यांचाही व सल्ला देणे याविषयीची बंधपत्र देणे आवश्यक राहील.
कृषी कर्ज मित्र योजनाचा कालावधी ?
सदर
योजनेचा कालावधी सन 2021 ते 2022 या आर्थिक वर्षामध्ये राहील आवश्यकतेनुसार योजनेचा कालावधी कमी करणे किंवा वाढविण्याचा अधिकार हा जिल्हा परिषदेला राहणार आहे.
कृषी कर्ज मित्र योजना
निधीचा स्त्रोत व रक्कम –
जिल्हा परिषद स्वनिधी २०२१-२२ च्या अंदाजपत्रकानुसार कृषी खर्चाची मर्यादा
उपाये १० लाख पर्यंत निश्तित केली गेली आहे
या योजनेची सत्यप्रतता जाणण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी खालील शासनाचा जी.आर. येथे पहा या बटणावर क्लिक करा आणि सविस्तर
पणे या योजनेची माहिती पहा.