बाल संगोपन योजना दर महा 1100 /- रू. Bal Sangopan Yojana

बाल संगोपन योजना दर महा 1100 /- रू. Bal Sangopan Yojana

 



बाल संगोपन योजना दर महा 1100 /- रू.

शासनाची बाल संगोपन योजना ज्या मुलांना आई किंवा वडील नसतील व ज्या मुलांना आई व 

वडील दोन्ही ही नसतील अशा बालकांना या योजनेचा लाभ मिळतो ० ते १८ वयोगटातील 

बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ मिळतो. एका कुटुंबातील दोन किंवा जास्त मुलांना ही लाभ दिला जातो.

 हा अर्ज करा - कडबा कुट्टी मशीनसाठी ७५ % अनुदान

या योजनेचा फायदा कोणाला होतो

  • अनाथ किंवा ज्यांच्या पालकांचा पत्ता लागत नाही, व जी दत्तक घेणे शक्य होत नाही अशी बालके
  • एक पालक असलेली व family crisis मध्ये असलेली बालके, मृत्यू, घटस्पोट, विभक्तीकरण, परित्याग, अविवाहित मातृत्व, गंभीर आजार, पालक रुग्णालयात असणे, इ. कारणामुळे विघटीत झालेल्या व एक पालक असलेल्या कुटुंबातील बालके, कुष्ठरोग व जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची बालके, एच आय व्ही ग्रस्त/ बाधित बालके, तीव्र मतीमंद  / multiple disability बालके, दोन्ही पालक अपंग आहेत अशी बालके.
  • पालकांमधील तीव्र बेबनाव, अति हेटाळणी व दुर्लक्ष, न्यायालयीन किंवा पोलीस तक्रार प्रकरणात अशी अपवादात्मक परिस्थितीतील (crises situation मधील ) बालके
  • शाळेत न जाणारे बाल कामगार (कामगार विभागाने सुटका व प्रमाणित केलेले)

 हे पहा - जनधन खातेधारकांना 2.30 लाखाचा लाभ

कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत…?

१)योजने साठी करावयाचा अर्ज व अर्जा सोबत
२)आधार कार्ड च्या झेराँक्स पालकांचे व बालकांचे
३)शाळेचे बोनाफाईड सर्टफिकेट
४)तलाठी यांचा उत्पन्नाचा दाखला.
५) पालकांचे मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र .(मृत्युचा दाखला)
६) पालकाचा रहिवासी दाखला.
७) मुलांचे बॅक पासबुक झेराँक्स.
८) मृत्यूचा अहवाल.
९) रेशन कार्ड झेराँक्स .
१०) घरा समोर पालका सोबत बालकांचा फोटो. ४ बाय ६ फोटो पोस्ट कार्ड मापाचा फोटो ( प्रत्येक मुलासोबत पालकाचा शेफरेट फोटो )
१०)मुलांचे पासपोर्ट फोटो 2
११)पालकाचे पासपोर्ट फोटो

हे पहा - पीएम किसान योजना अपात्र यादी

ही योजना मंजूर कोण करते ?

  • हा अर्ज मंजूर करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी असणारी बाल कल्याण समितीकडे सादर केला जातो व ती समिती अर्ज मंजुर करते.
  • जिल्हा परिषद शाळेत व महाविदयालय शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपला बोनाफाईट आत्ताच शाळेतून काढून ठेवावा
  • या योजनेचा लाभ घ्या व १८ वर्षापर्यंत बालकांच्या शिक्षणाच्या खर्चा साठी चिंता मुक्त व्हा.

हे पहा - ठिबक तुषार सिंचन 80 % अनुदान अर्ज सुरु 

 

किती रक्कम मिळते ?

एका मुलांसाठी ११०० रुपये प्रतिमहिना ( एका वर्षाला *१३२००/- रु मिळतात वय १८ पुर्ण होई पर्यत दर महिन्याला रक्कम मिळते.