ठिबक, तुषार सिंचनला 80% अनुदान GR आला Drip Subsidy maharashtra

ठिबक, तुषार सिंचनला 80% अनुदान GR आला Drip Subsidy maharashtra

 



ठिबक, तुषार सिंचनला 80% अनुदान GR आला

 

राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने अवर्षणप्रवण क्षेत्र तसेच आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त जिल्ह्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन

योजना राबविण्यास दि १९.ऑगस्ट २०१९, रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली होती .तद्नंतर सदर योजना सन २०२१-२२ पासून राज्यातील उर्वरित तालुक्यांमध्ये देखील राबविण्याचा निर्णय दि १८ नोव्हेंबर २०२१,रोजीच्या शासन निर्णयान्वये शासनाने घेतला आहे.

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत राज्यातील अल्प व अत्यल्प भू-धारक शेतकऱ्यांना ५५% आणि इतर शेतकऱ्यांना (५ हेक्टरच्या मर्यादेत) ४५% अनुदान देण्यात येते. सदर अनुज्ञेय अनुदानाशिवाय मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचनयोजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भू-धारक शेतकऱ्यांना २५ % आणि इतर शेतकऱ्यांना ३०% पूरक अनुदान देऊन सूक्ष्म सिंचनासाठी अनुक्रमे ८०% व ७५% एकूण अनुदान देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे.

Drip Subsidy maharashtra 2022

सन २०२१-२२ मध्ये प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचन संच बसविलेल्या शेतकऱ्यांना पूरक अनुदान देण्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत रु.२०० कोटी निधी आयुक्त (कृषि) यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, त्यास अनुसरुन शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे.  या योजनेंतर्गत लाभार्थी निवडीची तसेच अनुदान वितरणाची प्रक्रिया महा-डीबीटी व PMFS प्रणालीव्दारे करण्यात यावी.

या शासन निर्णयान्वये वितरीत केलेला निधी सन २०२१-२२ मध्ये सूक्ष्म सिंचन संच बसविलेल्या लाभार्थ्यांना पूरक अनुदान देण्याकरिता विनियोगात आणावा. सदर वितरीत निधी कोषागारातून आहरित करण्याकरिता आयुक्त (कृषि) यांना नियंत्रक अधिकारी व सहाय्यक संचालक(लेखा-१), कृषि आयुक्तालय यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. सदर योजनेची अंमलबजावणी करताना प्रधान मंत्री

कृषी सिंचन योजनेच्या मार्गदर्शक सूचनांचे व संदर्भ क्र १. येथील शासन निर्णयातील अटी व शर्तीचे पालन करावे. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौ. सं. क्र.३४२/व्यय-१, दि.२१ डिसेंबर, २०२१ अन्वये प्राप्त मान्यतेस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२२०१० १७१८ ४९४०१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षंकित करुन काढण्यात येत आहे.