कधीकधी ऑनलाईन सातबारा उतारा आणि हस्तलिखित सातबारा
उतारा यांतील माहितीत फरक किंवा तफावत असल्याचं आपल्या लक्षात येतं. दोन्ही
उताऱ्यांतील नावं,
क्षेत्र यात तफावत आढळून येते. त्यामुळे ही माहिती दुरुस्त करणं
गरजेचं असतं.
आता महाराष्ट्र
सरकारच्या ई-हक्क प्रणालीद्वारे यात दुरुस्ती करता येणार आहे. यासाठीचा ऑनलाईन
अर्ज घरबसल्या तलाठी कार्यालयाला पाठवता येणार आहे.
तो कसा त्याचीच
माहिती आपण पाहणार आहोत.
ऑनलाईन
अर्ज कसा करायचा?
अर्ज करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांत आधी bhulekh.mahabhumi.gov.in
असं सर्च करायचं आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची
वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल.
या
पेजवर तुम्हाला खालच्या बाजूला एक सूचना दिसेल.
"जर आपण पाहिलेल्या ऑनलाईन ७ /१२ मधील
माहितीमध्ये व हस्तलिखित ७/१२ मधील माहितीमध्ये चूक अथवा तफावत आढळून आल्यास आपण
अशा दुरुस्तीसाठी ऑनलाईन पद्धातीने तलाठी यांचेकडे ई-हक्क प्रणालीद्वारे अर्ज
पाठवू शकता."- अशी ही सूचना आहे.
या
सूचनेतील pdeigr.maharashtra.gov.in या लिंकवर क्लिक केलं की
तुमच्यासमोर 'पब्लिक डेटा एन्ट्री' नावानं
एक पेज ओपन होईल.
यावरील 'Proceed to login' या
पर्यायावर क्लिक केलं की तिथं तुम्हाला आधी तुमचं अकाऊंट सुरू करायचं आहे.
त्यासाठी 'Create new user' यावर क्लिक करायचं आहे.
इथं
तुम्हाला सुरुवातीला तुमचं पहिलं नाव, मधलं नाव आणि आडनाव
टाकायचं आहे. त्यानंतर लॉग-इन डिटेल्समध्ये Username टाकून check
availability या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पासवर्ड
टाकून तो परत एकदा टाकायचा आहे. मग Security Questions मध्ये
एक प्रश्न निवडून त्याचं उत्तर द्यायचं आहे.
तीन ते चार प्रश्न असतात, सोपे असतात. जसं की तुमच्या आईचं नाव...इत्यादी.
ही माहिती भरून झाली की पुढे मोबाईल नंबर, ईमेल आयडी, पॅन कार्ड नंबर आणि पिन कोड टाकायचा आहे.
पिन कोड टाकला की देश, राज्य आणि जिल्ह्याचं नाव तिथं आपोआप
येईल. त्यानंतर Select Cityमध्ये तुम्हाला तुमचं गाव
निवडायचं आहे.
त्यानंतर
Address
Details मध्ये घर क्रमांक आणि गल्लीचं नाव किंवा घरावर काही नाव
असेल तर ते टाकू शकता.
सगळ्यांत शेवटी कॅप्चा टाकायचा आहे. इथं असणारे आकडे
किंवा अक्षरं जशीच्या तशी पुढच्या कप्प्यात लिहायची आहे आणि मग सेव्ह बटन दाबायचं
आहे.
त्यानंतर या पेजवर खाली 'Registration
Successfull. Please Remember Username & Password for Future Transaction.' (याचा अर्थ तुम्ही लॉग-इन करताना टाकलेलं युझर नेम आणि पासवर्ड कायम लक्षात
ठेवा असा आहे.)
असा लाल अक्षरातला मेसेज तुम्हाला दिसेल. त्यानंतर
तुम्हाला 'Back' या पर्यायावर क्लिक करून पुन्हा एकदा लॉग-इन
करायचं आहे. आता आपण नोंदणी करताना टाकलेलं यूझरनेम आणि पासवर्ड टाकायचा आहे.
कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग-इन म्हणायचं आहे.
त्यानंतर
'Details'
नावाचं एक पेज तुमच्यासमोर उघडेल. इथं Registration,
Marriage, e-filing, 7/12 mutations असे वेगवेगळे पर्याय तुम्हाला
दिसतील. याचा अर्थ इथं तुम्हाला या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
आता आपल्याला सातबारा दुरुस्ती करायची आहे, तर '7/12 mutations' वर क्लिक करायचं आहे.
त्यानंतर तुम्हाला यूझरचा प्रकार निवडायचा आहे.
सामान्य नागरिक असाल तर 'User is Citizen' आणि बँकेचे कर्मचारी असाल तर 'User
is Bank' या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
एकदा यूझरचा प्रकार निवडला की त्यानंतर 'Process ' या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
त्यानंतर तुमच्यासमोर 'फेरफार अर्ज प्रणाली- ई-हक्क' नावाचे पेज ओपन होईल.
इथं सुरुवातीला गावाची माहिती भरायची आहे. जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचं आहे.
त्यानंतर
तुम्ही इथं पाहू शकता की, "तलाठ्याकडे ज्या फेरफार प्रकारासाठी अर्ज
करायचा आहे तो फेरफार प्रकार निवडा," असा मेसेज
तुम्हाला दिसेल.
आता आपल्याला सातबाऱ्यातील चूक दुरुस्त करायची आहे, त्यामुळे आपण "हस्तलिखित व संगणकीकृत सातबारामध्ये तफावत
दुरुस्तीसाठी करावयाचा अर्ज" हा पर्याय निवडला आहे.
त्यानंतर 7/12 मधील चूक दुरुस्त
करण्यासाठीचा अर्ज तुमच्यासमोर ओपन होईल. इथं तुम्हाला सुरुवातीला अर्जदाराची
माहिती द्यायची आहे. यात अर्जदाराचं नाव, वडील किंवा पतीचं
नाव आणि आडनाव, अर्जदाराचा ईमेल आणि मोबाईल नंबर टाकून 'पुढे जा' या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
त्यानंतर स्क्रीनवर आपला मसूदा अर्ज जतन केला आहे
असा मेसेज येईल आणि त्यासमोर अर्ज क्रमांक दिलेला असेल, या मेसेजखालील 'ओके' बटनावर
क्लिक करायचं आहे.
त्यानंतर खातेदाराचं पहिलं नाव किंवा खाते क्रमांक
टाकायचा आहे, सातबाऱ्यावरील खाते क्रमांक इथं टाकणं अपेक्षित
आहे.
त्यानंतर
'खातेदार शोधा' या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
त्यानंतर खातेदाराचं नाव निवडायचं आहे.
एकदा ते नाव निवडलं की संबंधित खातेदाराला कोणत्या
गट क्रमांकाचा सातबारा दुरुस्त करायचा आहे तो गट क्रमांक निवडायचा आहे.
त्यानंतर 'समाविष्ट करा' या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मग खातेधारकाच्या जमिनीची
सविस्तर माहिती तुम्हाला तिथं पाहायला मिळेल.
त्यानंतर ऑनलाईन सातबाऱ्यातील चूक निवडायची आहे. यात
सातबाऱ्यातील एकूण क्षेत्र व एकक दुरुस्त करणे, खातेदाराच्या नावात
दुरुस्ती करणे, खातेदाराचं क्षेत्र दुरुस्ती करणे या
पर्यायांपैकी एक पर्याय निवडायचा आहे.
खातेदाराच्या
नावात दुरुस्ती करणे हा पर्याय निवडला आहे.
त्यानंतर संगणकीकृत सातबारा वरील खातेधारकाचं नाव
तिथं दाखवण्यात आलं आहे.
त्यातील पहिलं, वडील, पतीचं किंवा आडनाव यापैकी ज्या नावात दुरुस्ती हवी असेल ते दुरुस्त नावं
तुम्ही इथं लिहू शकता.
त्याखाली तुम्हाला दुरुस्तीचा तपशील सविस्तर लिहायचा
आहे.
त्यानंतर 'पुढे जा' या पर्यायावर क्लिक करायचं आहे आणि कागदपत्रे जोडायची आहे. यात तुम्हाला
जुना हस्तलिखित 712 प्रत अपलोड करायची आहे आणि इतर जुने
फेरफार उतारे असतील तर ते जोडायचे आहेत आणि मग कागदपत्रे अपलोड करा या पर्यायावर
क्लिक करायचं आहे.
त्यानंतर तुम्हाला तिथं एक स्वयंघोषणपत्र दिसेल.
सदरच्या अर्जात दिलेली माहिती फक्त ऑनलाईन ७/१२
मध्ये दिसून येत असलेल्या त्रुटी / चुका दुरुस्त करण्यासाठी असून या अर्जाने मूळ
हस्तलिखित ७/१२ मधील त्रुटी/चुका दुरुस्त होणार नाही ह्याची मला जाणीव आहे. अर्जात
दिलेली माहिती योग्य व अचूक आहे- अशा आशयाचं हे पत्र असतं.
सगळ्यांत
शेवटी या पत्राच्या खालील सहमत आहे/Agree या पर्यायावर क्लिक
करायचं आहे. त्यानंतर सातबारा उताऱ्यातील नाव दुरुस्तीसाठीचा तुमचा अर्ज गावातल्या
तलाठी कार्यालयात सबमिट केला जाईल.
त्यानंतर तो चेक करून मंडळ अधिकाऱ्यांकडे पाठवला
जाईल. त्यांनी तो प्रमाणित केला की मग तुमच्या सातबारा उताऱ्यावर ती दुरुस्ती
नोंदवली जाते.
असा करा ऑनलाईन सातबारा दुरुस्ती अर्ज.
·
ब्राउजरच्या सर्च बारमध्ये टाईप करा https://bhulekh.mahabhumi.gov.in/ आणि सर्च करा किंवा तुम्ही डायरेक्ट https://pdeigr.maharashtra.gov.in/
हा वेब ॲड्रेस टाईप करा.
·
तुम्ही जर महाभूमी अभिलेख या वेबसाईटवर असाल तर पब्लिक डाटा
एण्ट्री या वेबसाईटची या वेबसाईटच्या एकदम खालच्या बाजूला लिंक दिलेली आहे त्यावर
क्लिक करा.
·
पब्लिक डाटा एण्ट्री या वेबसाईटवर आल्यावर या ठिकाणी काही
सूचना दिसतील त्या वाचून घ्या.
·
लॉगीन करण्यासाठी proceed to login या बटनावर क्लिक करा.
·
तुमच्याकडे युजर नेम आणि पासवर्ड असेल तर लॉगीन करा आणि
नसेल तर Create
new user account या बटनाला क्लिक करून नवीन नोंदणी करून घ्या.
·
लॉगीन केल्यानंतर या ठिकाणी अनेक पर्याय तुमच्या डॅशबोर्डला
दिसेल त्यापैकी 7
12 Mutations या पर्यायावर क्लिक करा.
·
select
role type मध्ये User is citizen या पर्यायावर
क्लिक करा.
तलाठ्याकडे ज्या फेरफार प्रकारासाठी अर्ज करायचा
आहे तो फेरफार प्रकार निवडा
·
या ठकाणी एक फॉर्म तुमच्या स्क्रीनवर येईल पहिल्या
पर्यायामध्ये तुमचा जिल्हा निवडा.
·
तुमचा तालुका निवडा.
·
त्यानंतर गाव निवडा.
आपल्या गावातील योजना लाभार्थी यादी
जशीही तुम्ही वरील माहिती निवडाल तुमच्या
कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर खालील पर्याय दिसतील.
·
इकरार.
·
बोजा चढविणे/ गहाण खत.
·
वारस नोंद.
·
बोजा कमी करणे.
·
मयताचे नाव कमी करणे.
·
हस्तलिखित व संगणीकृत सातबारामध्ये तफावत दुरुस्तीसाठी
करावयाचा अर्ज.
·
खातेदाराची माहिती भरणे.
·
वरील माहिती जतन करा.
वरील सर्व माहिती
भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या जमिनीच्या ८ अ चा खाते क्रमांक टाकायचा आहे आणि
खातेदार निवडा या बटनावर क्लिक करायचे आहे. जसे हि तुम्ही हि कृती कराल तर तुमच्या
कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर तुमच्या जमिनीची तपशील येईल.
सातबारा दुरुस्ती मधील प्रकार निवडा.
शेतकरी
बंधुंनो सातबारा दुरुस्तीचे खालील प्रकारे तीन प्रकार तुम्हाला दिसतील त्यापैकी एक
पर्याय निवडा.
·
सात बारा वरील एकूण क्षेत्र व एकक दुरुस्त करणे.
·
खातेदाराच्या नावातील दुरुस्ती करणे.
·
खातेदाराची क्षेत्र दुरुस्ती करणे.
वरील
प्रकार तुमच्या कॉम्प्युटर स्क्रीनवर दिसेल त्यापैकी एक प्रकार निवडा. हा सातबारा
दुरुस्ती ऑनलाईन अर्ज सादर करतांना तुम्हाला जुना हस्तलिखित सातबारा अपलोड करायचा
आहे. तर अशा प्रकारे तुमची तुमच्या सातबारा वरील चुकलेले नाव किंवा जमिनीचे
क्षेत्र कमी झाले असेल तर ते पूर्ववत करणे आणि इतर दुरुस्तीसाठी ऑनलाईन अर्ज करू
शकता.