नगरविकास खात्यातील ३ हजार ७२० पदांची भरती कधी सुरु होणार – Nagar Vikas Vibhag Maharashtra Bharti 2024

नगरविकास खात्यातील ३ हजार ७२० पदांची भरती कधी सुरु होणार – Nagar Vikas Vibhag Maharashtra Bharti 2024

 





Nagar Vikas Vibhag Maharashtra Bharti 2024 – The Maharashtra government is recruiting 75,000 vacancies. Advertisements for vacant posts of various departments are being published and the recruitment process is being done for the vacant posts. As many as 3,720 posts in Group ‘C’ and Group ‘D’ categories are vacant in nagar parishads and nagar panchayats under the Directorate of Urban Development and Nagar Parishad Administration under Nagar Vikas Vibhag Maharashtra Bharti 2024. However, the recruitment process for these vacant posts is yet to begin. Therefore, there is a demand that the recruitment process should be started before the model code of conduct.

 

महाराष्ट्र शासन ७५ हजार रिक्त पदांची भरती करत आहे. विविध विभागांच्या रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध होत असून रिक्त पदे भरती प्रक्रिया होत आहे. असे असताना नगरविकास व नगर परिषद प्रशासन संचालनालयअंतर्गत येणाऱ्या नगरपरिषद आणि नगरपंचायतमधील गट ‘क’ व गट ‘ड’ वर्गातील ३,७२० पदे रिक्त आहेत. मात्र, अद्यापपर्यंत या रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे आचारसंहितेपूर्वी ही भरती प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी होत आहे.

 

याबाबत कोकण विभाग कृषी पदवी व पदविकाधारक संघर्ष समितीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन दिले आहे. या वर्गातील जाहिरात एकदाही प्रसिद्ध झाल्या नाहीत. गेल्या ८ ते ९ वर्षांत या विभागात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे कामकाजावर मोठा परिणाम होत आहे. याची दखल घेऊन नगरविकास व नगर परिषद प्रशासन संचालनालयाअंतर्गत येणाऱ्या नगरपरिषद व नगरपंचायतमधील गट ‘क’ वगट ‘ड’ वर्गातील जाहिरात तातडीने प्रसिद्ध करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

 

अभ्यासक्रम व शैक्षणिक अर्हता जून-जुलै महिन्यात जाहीर करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दि. ११ जानेवारी रोजी ट्वीट करून नगरपरिषद व नगरपंचायत विभागातील गट ‘क’ व गट ‘ड’ वर्गातील ३,७२० पदाची भरती करण्यात येईल, असे जाहीर केले होते. असे असतानाही संबधित विभागाने आजपर्यंत या विभागाची जाहिरात प्रसिद्ध केलेली नाही.लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच जाहीर होण्याची शक्यता असल्याने त्याआधी तातडीने नगरपरिषद व नगरपंचायत विभागातील गट ‘क’ व गट ‘ड’ वर्गातील ३७२० पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी, अशी आहे. विनंती संघर्ष समितीने केली.

 

राज्याचे मुख्यमंत्री यांनी ३७२० पदाची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल, असे जानेवारी २०२३ मध्ये जाहीर केले होते. या विभागाद्वारे येणाऱ्या जाहिरातीचा अभ्यासक्रमही जून महिन्यात जाहीर केला होता; मात्र आजपर्यंत ही जाहिरात प्रसिद्ध झाली नसून लोकसभा आचारसंहिता लागण्याआधी ही जाहिरात प्रसिद्ध करा, अशी मागणी आम्ही केली आहे, अशी माहिती संघर्ष समितीचे विकास धोत्रे यांनी दिली.