तलाठी भरती २०२३ सर्व जिल्ह्यांचा निकाल व कागदपत्र तपासणी वेळापत्रक जाहीर, “ही” कागतपत्रे तयार ठेवा -Talathi Bharti Result 2023, Cut Off Marks And Merit List

तलाठी भरती २०२३ सर्व जिल्ह्यांचा निकाल व कागदपत्र तपासणी वेळापत्रक जाहीर, “ही” कागतपत्रे तयार ठेवा -Talathi Bharti Result 2023, Cut Off Marks And Merit List

 





1)Beed Talathi Bharti Result: Talathi Recruitment – 2023 The following selected candidates in District Beed are advised to attend at District General Hospital Beed as per following schedule for medical examination through District Surgeon.


तलाठी पदभरती२०२३ जिल्हा बीड मधील निवड यादीतील खालील नमुद उमेदवार यांना सूचित करण्यात येते की, जिल्हा शल्य चिकीत्सक यांचे मार्फत वैद्यकीय तपासणी करणेचे अनुषंगाने पुढील वेळापत्रकानुसार जिल्हा सामान्य रुग्णालय बीड येथे उपस्थित रहावे.

 

 

2)Gondia Talathi Document Verification Date

Talathi Bharti Result 2023: Pursuant to the above Talathi Recruitment Examination 2023, the selection list and waiting list of the candidates under consideration have been published on the website www.gondia.nic.in on 23.01.2024 and the original educational documents and all other necessary documents of the candidates have been checked before the District Selection Committee. Talathi Recruitment 2023 – Document Verification Date 21/02/2024 at 11:00 AM. Know more details at below:

 

उपरोक्त तलाठी पदभरती परीक्षा 2023 च्या अनुषंगाने विचाराधीन उमेदवारांची निवड यादी प्रतिक्षाधीन यादी www.gondia.nic.in या संकेत स्थळावर दिनांक 23.01.2024 रोजी प्रसिध्द करण्यात आली असून जिल्हा निवड समिती समक्ष उमेदवारांचे मूळ शैक्षणीक कागदपत्रे इतर आवश्यक सर्व दस्तऐवज तपासणी दि. 05/02/2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे उपस्थित राहण्याकरीता विचाराधीन उमेदवारांना तसेच प्रतिक्षाधीन उमेदवारांना दुरध्वनीव्दारे तसेच -मेल व्दारे या कार्यालयाकडून सूचित करण्यात आले होते. दिनांक 05/02/2024 रोजी जिल्हा निवड समिती समक्ष झालेल्या मूळ शैक्षणीक कागदपत्रे इतर आवश्यक सर्व दस्तऐवजांच्या तपासणीकरीता उक्त वर नमूद .क्र. 1 ते 2 7 वरिल विचाराधीन .क्र. 3 ते 6 .क्र. 8 ते 9 वरिल प्रतिक्षाधीन उमेदवार अनुपस्थित असल्याने त्या उमेदवारांना शेवटची संधी देण्यात येत असून दिनांक 21 फेब्रुवारी, 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हा निवड समिती मार्फत अनुपस्थित असलेल्या उमेदवारांच्या मुळ कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे.

 

तरी उक्त उमेदवारांनी जाहिरातीत नमूद सर्व मुळ कागदपत्रे, फॉर्म भरल्याची प्रत, चालान प्रत तसेच इतर आवश्यक दस्तऐवजांसह (सर्व मुळ कागदपत्रासह) तसेच सर्व कागदपत्रांची छायांकित प्रत साक्षांकित सह दिनांक 21.02.2024 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे चुकता उपस्थित राहावे. उक्त दिनांक 21/02/2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे कागदपत्रे / दस्तऐवज पडताळणी/तपासणी करीता गैरहजर राहिल्यास सदरील गैरहजर उमेदवार निवड सुचितील आपले स्थान गमावून बसतील गैरहजर राहणाऱ्या उमेदवारांना निवड प्रक्रिये संबंधात कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही किंवा हक्क सांगता येणार नाही, याची नोंद घेण्यात यावी. का.टि. मा. जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने.


तलाठी पदभरती 2023 – कागदपत्रे पडताळणी दि. 21/02/2024 सकाळी 11:00 वा.

तलाठी पदभरती 2023 – कागदपत्रे पडताळणी दि. 21/02/2024 सकाळी 11:00 वा.

14/02/2024

21/02/2024

पहा (277 KB) 





3)Talathi Bharti Hingoli Document Verification Date 

जिल्हाधिकारी, हिंगोली यांचे आस्थापनेवरील तलाठी संवर्गातील रिक्त पदांची राज्य परीक्षा समन्वयक तथा अपर जमाबंदी आयुक्त आणि अतिरीक्त संचालक, भुमी अभिलेख महाराष्ट्र राज्य, पुणे यांची जाहिरात क्र. तलाठी भरती/प्र.क्र.45/2023 दि. 26.06.2023 अन्वये प्रसिध्द करण्यात आलेली होती. त्यानुसार TCS कंपनीमार्फत (Computer Based Test) परिक्षा घेण्यात आलेली होती. त्यानंतर प्र. राज्य परीक्षा समन्वयक तथा अपर जमाबंदी आयुक्त आणि अतिरीक्त संचालक, भुमी अभिलेख महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र. तलाठी भरती/कावी/16/2024 दि. 12.01.2024 नुसार मसुदा स्वरुपात निवड प्रतिक्षा यादी उपलब्ध करुन देण्यात येवून तलाठी पदभरती संदर्भात शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय / परिपत्रकानुसार पुढील कार्यवाही करणेसाठी सुचित करण्यात आले होते. उक्त निवड प्रतिक्षा यादी मसुदा प्राप्त झाल्या नुसार जिल्हा निवड समितीची दिनांक 19.01.2024 रोजी बैठक घेवून निवड प्रतिक्षा यादी दिनांक 23.01.2024 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
प्रभारी राज्य समन्वयक तथा अप्पर जमाबंदी आयुक्त, आणि अतिरीक्त संचालक, भुमी अभिलेख महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे निर्देशानुसार प्रसिध्द करण्यात आलेल्या निवड प्रतिक्षा सुचीतील उमेदवारांनी जाहिरातीमध्ये नमुद केलेल्या निकषानुसार मुळ साक्षांकित कागदपत्रांची (दोन संच) पडताळणीसाठी खालील दिनांकास उपस्थित राहावे.