महाराष्ट्र आरोग्य विभाग भरतीचे कागदपत्र पडताळणी वेळापत्रक जाहीर झाले असून खालील लिंक वरून आपण पूर्ण PDF बघू शकता. हि कागदपत्र पडताळणी ही दिनांक 16 ते 29 फेब्रुवारी 2024 दरम्यान होणार आहे. तसेच, या आधी आरोग्य विभागाने 02 फेब्रुवारी 2024 रोजी आरोग्य विभाग कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024 जाहीर केले होते व त्यानुसार कागदपत्र पडताळणी ही दिनांक 08 फेब्रुवारी 2024 रोजी झाली आहे.
आरोग्य सेवेतील गट-क व ड संवगातील रिक्त पदे भरण्याकरीता पात्र उमेदवारांची ऑनलाईन परिक्षा दिनांक ३०.११.२०२३ ते ०७.१२.२०२३ व १२.१२.२०२३ रोजी घेण्यांत आली होती. उपरोक्त संदर्भिय पत्राला अधिन राहून त्यासोबत प्राप्त झालेल्या गट-क व ड संवर्गातील निवड यादीत स्थान मिळविलेले उमेदवार नियुक्तीसाठी पात्र आहेत किंवा नाही, यासंबंधी कागदपत्रांची पडताळणी करुन पात्र उमेदवारांना गुणानुक्रमे नियुक्ती आदेश देण्याकरीता दिनांक १६ ते २९ फेब्रुवारी, २०२४ समुपदेशनाद्वारे कागदपत्रांची पडताळणी प्रक्रिया पार पाडण्याकरीता खालीलप्रमाणे कार्यालयाअंतर्गत व्यवस्था करण्यांत येत आहे.
आरोग्य विभाग कागदपत्र पडताळणी परीपत्रक