महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात पाचवी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा येत्या १८ फेब्रुवारीपासून राज्यातील सर्व जिल्ह्यांत घेतली जाणार आहे. मंडळाने या परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी केले असून, विद्यार्थ्यांनी ते शाळेतून प्राप्त करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेचे प्रवेशपत्र मंडळाने संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून दिले आहेत. मुख्याध्यापकांनी प्रवेशपत्रांच्या प्रती काढून तत्काळ सर्व विद्यार्थ्यांना वितरित कराव्यात. सर्व परीक्षार्थी व पालकांनी शाळा मुख्याध्यापकांकडून प्रवेशपत्रे प्राप्त करून घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेतील दोन्ही गटांसाठी वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न असतील. प्रत्येक पेपरसाठी ए, बी, सी, डी संचाच्या प्रश्नपत्रिका देण्यात येतील.
MSCE Pune
Scholarship Admit Card Link – The Pre-Higher Primary Scholarship Examination (Class
V) and Pre-Secondary Scholarship Examination (Class VIII) will be conducted on
the same day on February 12 in all the districts of the state. The necessary
admit cards for this examination have been made available by the examination
board. The State Examination Council has instructed that all the school
principals should immediately distribute these admit cards to all the students
through the school login.
MSCE
Scholarship 5th & 8th Class Admit Card Download Print Online
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) येत्या १२ फेब्रुवारी रोजी एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी आवश्यक प्रवेशपत्रे परीक्षा परिषदेने उपलब्ध करून दिली आहेत. सर्व शाळा मुख्याध्यापकांनी शाळेच्या लॉगिनमधून ही प्रवेशपत्रे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत तत्काळ पोचवावीत, अशी सूचना राज्य परीक्षा परिषदेने दिली आहे.
या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी राज्यातील ५२ हजार ५२८ शाळांमधील पाचवीच्या पाच लाख ३२ हजार ५०८ विद्यार्थ्यांनी, तर आठवीच्या तीन लाख ६७ हजार ४४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. शिष्यवृत्ती परीक्षेची ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०२२पर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर शाळांना शाळा माहिती प्रपत्र आणि ऑनलाइन आवेदनपत्र भरण्यासाठी २० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता शिष्यवृत्ती परीक्षेची प्रवेशपत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
MSCE Pune Scholarship Admit Card Link