राज्यातील ४२ तालुक्यात दुष्काळी स्थिती, कृषी विभागाचा अहवाल, शेतकऱ्यांना कोणत्या सवलती मिळणार? जाणून घ्या

राज्यातील ४२ तालुक्यात दुष्काळी स्थिती, कृषी विभागाचा अहवाल, शेतकऱ्यांना कोणत्या सवलती मिळणार? जाणून घ्या

 




राज्यातील सुमारे ४२ तालुक्यांतील दुष्काळी परिस्थितीचा अहवला कृषी विभागाने मंत्रालयस्तरावर दिला आहे. या अहवालावरुन दुष्काळाची तीव्रता निश्चित केली जाणार आहे. ४२ तालुक्यांपैकी ४० तालुक्यांमध्ये तीव्र दुष्काळ घोषित होण्याची शक्यता आहे असे सूत्रांनी सांगितले.


राज्यात पंधरा जिल्ह्यांतील ४२ तालुक्यांतील दुष्काळी स्थितीचा अहवाल कृषी विभागाने मंत्रालयस्तरावर पाठविला आहे. त्यानुसार दुष्काळाची तीव्रता निश्चित केली जाणार असून, सुमारे चाळीस तालुके दुष्काळग्रस्त होण्याची शक्यता आहे. यापैकी चोवीस तालुक्यांमध्ये तीव्र, तर सोळा तालुक्यांत मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे कृषी विभागातील सूत्रांनी सांगितले.

मान्सूनचे विलंबाने आगमन आणि अनेक भागात सलग एकवीसपेक्षा अधिक दिवस पावसाने दिलेली ओढ; यामुळे अनेक तालुक्यांत दुष्काळाची स्थिती आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेच्या निकषानुसार सलग एकवीस दिवस पावसाचा खंड असलेल्या भागांमध्ये विमा कंपन्यांना नुकसान भरपाईच्या एकवीस टक्के रक्कम देण्याच्या सूचना कृषी आयुक्तांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हास्तरावर सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये पंधरा जिल्ह्यांत ४८ तालुक्यांमध्ये दुष्काळी स्थिती असल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला होता. कृषी विभागाने विभागीयस्तरावर दुष्काळाची तीव्रता तपासण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याचा अहवाल गेल्या आठवड्यात प्राप्त झाला असून, कृषी विभागाने अंतिम अहवाल मंत्रालयात पाठविला आहे. त्यावर राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.