या जिल्ह्यात शिलाई मशीन, पिठाची गिरणी साठी नवीन अर्ज सुरू, येथे अर्ज करावा लागणार

या जिल्ह्यात शिलाई मशीन, पिठाची गिरणी साठी नवीन अर्ज सुरू, येथे अर्ज करावा लागणार

 






उपरोक्त संदर्भीय विषयान्वये महिला बालकल्याण विभाग जिल्हा परिषद बुलडाणा अंतर्गत जिल्हा परिषद सेस 2023-24 अंतर्गत वैयक्तीक लाभाच्या योजना (DBT) द्वारे राबविन्यासाठी अटी शर्तीच्या अधिन राहुन ग्रामिण भागातील महिला मुली यांचे कडुन अटी शर्ती नुसार दिनांक 09/02/2024 ते 22/02/2024 या कालवधी अर्ज घ्यावायाचे आहे. योजनांचे नाव खालील प्रमाणे आहे.

 

1. ग्रामिण भागातील अपंग महिला मुलींना पिठाची चक्की पुरविणे.
2.
ग्रामिण भागातील महिला मुलींना पिक्को फॉल मशिन पुरविणे.
या योजनांशी संबधित अटी शर्ती सोबत जोडण्यात आलेल्या आहेत. सोबतच अर्जाचे प्रारुप जोडलेले आहे. अटी शर्तीची पुर्तता करणारे पात्र अर्जच प्रकल्प स्तरावर घेण्यात यावेत पडताळणी करुन दि. 23/02/2024 रोजी अर्जासह विहीत नमुन्यातील Soft Copy Hard Copy या कार्यालयास सादर करावी.

शर्ती अटी

. अर्जदार यांच्या कुटुंबाचे उत्पन्न ,२००००/ चे आत असावे यासाठी तहसीलदार यांचे प्रमाणपत्र / दाखला सन २०२२-२३ या वर्षाचे जे मार्च २०२४ पर्यन्त वैध असेत ते जोडावे. अर्जासोबत उत्पनाचा प्रमाणपत्र / दाखला नसल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
. अर्जदार हे ग्रामिण भागातील रहिवाशी असावा.
. अर्जदार हे शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटुंबातील असल्यास प्राधान्य त्यासाठी अर्जदार यांनी सक्षम अधिकारी यांचे प्रमाणपत्र अर्जा सोबत जोडावे.
. जिल्हा परिषद सेस अंतर्गत पिठाची चक्की या योजना साठी फक्त अपंग महिला यांनीच अर्ज करावा. अर्जदाराने या पूर्वी सदर योजनेचा लाभ जिल्हा परिषद च्या इतर विभाग अगर या विभागा कडुन मागील वर्षात लाभ घेतलेला नसावा योजनेचा लाभ घेतल्याचे दिसुन आल्यास त्या बाबतची वसुली संबधित लाभार्थी यांच्या कडुन केली जाईल.

. अर्ज परीपूर्ण असावा अपूर्ण अर्ज / विनास्वाक्षरी सादर केलेले अर्ज यांचा विचार केला जाणार नाही. किंवा त्या चाबत कोणताही पत्र व्यहार केला जाणार नाही.
. लाभार्थी ही ग्रमिण भागातील असावी तीचे वय १७ ते ४५ असावे अर्ज सादर करण्याच्या दिवशी १७ पेक्षा कमी ४५ पेक्षा जास्त नसावे.
. मुदतीच्या आत प्राप्त होणान्या अर्जाचाच लाभार्थी निवडी करिता विचार केला जाईल. उशिरा प्राप्त होणाऱ्या अर्जाचा कोनत्याही परिस्थीती मध्ये विचार केला जाणार नाही.
. निधीच्या उपलब्धते नुसार योजनेचा लाभ दिला जाईल त्या मुळे प्रत्येक प्रात्र लाभार्थी यांना लाभ मिळेलच असे नाही या बाबत लाभार्थी निवडीचा संपूर्ण अधिकार हा महिला बालकल्याण समिती जिल्हा परिषद बुलडाणा यांनाच असेल.
. लाभार्थी अपंग असल्यास प्राधान्य (सोबत प्रमाणपत्राची प्रत जोडावी अपंग लाभार्थी यांना शासन निर्णया नुसार सुट.) १०. लाभार्थी लाभ घेत आहे त्याच्या नावाने वैयक्तिक बैंक बचत खाते असावे ते राष्ट्रीय कृत बँकेचेच असावे त्या बचत खात्याला
लाभार्थ्यांचे आधार नंबर लिंक केलेला असावा (IFSC कोड नमुद असावा) ११. अर्जदाराचे कुटुंचातील कोणतीही व्यक्ति शासकिय सेवेत / निमशासकिय सेवेत / जिल्हा परिषद / पंचायत समिती / ग्राम पंचायत सदस्य नसावी या बाबत ग्रामसेवक यांचा दाखला अर्जा सोबत जोडण्यात यावा.
१२. अर्जासोबत लाभार्थी यांनी खालील कागदपत्रे स्वतः सांक्षाकित करुन या प्रमाणे जोडण्यात यावीत.
. अर्जदार यांचा वयाचा दाखला / TC झेराक्स प्रत.
. अर्जदाराचा उत्पन्न दाखला किंवा कुटुंबातील व्यक्तीचा उत्पन्न दाखला असल्यास सोबत राशनकार्ड झेराक्स आवश्यक.
. अर्जदार शेतकरी आत्महत्या ग्रस्त / अपंग / विधवा/दारीद्द्र रेषा खालील असल्यास त्या बाबतचे प्रमाणपत्र.
. आधार कार्ड झेराक्स प्रत.
. बैंक बचत खात्याचे पुस्तकाचे पहिल्या पानाची झेराक्स प्रत IFSC कोड नमुद असावा.
. इलेक्ट्रीक बील (विज बीलाची प्रत आवश्यक)

 

 Download Mahila Bal Vikas Vibhag Application Form 2024