Crop Insurance : पिक विम्याचा मार्ग मोकळा ! शासनाकडून विमा कंपन्यांना निधी वितरित, शासन निर्णय (GR) आला

Crop Insurance : पिक विम्याचा मार्ग मोकळा ! शासनाकडून विमा कंपन्यांना निधी वितरित, शासन निर्णय (GR) आला

 





Crop Insurance : मागील काही दिवसापासून शेतकऱ्यांसाठी चालू असलेला काळजी व महत्त्वाचा विषय म्हणजे पिक विमा होईल. आता शेतकऱ्यांसाठी पिक विमा संदर्भात एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे, मराठवाड्यासह संपूर्ण राज्यभरात सरासरीप्रमाणे पाऊस पडला नसल्यामुळे शेतकरी बांधवांची चिंता वाढलेली आहे. अशा परिस्थितीत विविध संघटना व शेतकऱ्यांकडून कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली जात आहे.

61 कोटी 92 लाख निधी मंजूर

खरीप हंगामासाठी ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा काढलेला असेल, अशा सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे; कारण लवकरच शासनाकडून शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई दिली जाणार आहे. यासाठी राज्याच्या हिशापोटी शासनाकडून विमा कंपन्यांना 61 कोटी 92 लाख 35 हजार 981 रुपये इतका निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचा विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. महाराष्ट्रातील ‘पाच विमा’ कंपन्याकडून जिल्हानिहाय शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम वितरित करण्यात येते. ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2023 मध्ये आपल्या पिकाचा विमा उतरवलेला होता, अशा शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाचा एकंदरीत हिसा मिळून पिक विमा कंपनीच्या नुकसानग्रस्तांना रक्कम वितरित केली जाणार आहे.

पावसाचा खंड व नुकसान भरपाई

यावर्षी राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पिकांचे मोठे नुकसान झाले, त्याचप्रमाणे मराठवाड्यातील इतर जिल्ह्यात पावसाचा खंड पडल्याने आलेल्या पिकाची सुध्दा नासाधूशी झाली; परिणामी भारतीय कृषी विमा कंपनीकडून आणि काही शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मिळावी यासाठी मागणी केली होती, या मागणीला अनुसरून भारतीय कृषी विमा कंपनीसह खाली देण्यात आलेल्या कंपन्यांना शासनाकडून निधी वर्ग केला जाणार आहे.

या विमा कंपन्यांना निधी वितरित

• भारतीय कृषी विमा कंपनी

• बजाज आलियांझ जनरल इन्शुरन्स कंपनी

• आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी

• एचडीएफसी इन्शुरन्स कंपनी

• युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी

राज्याचा हिस्सा संबंधित जिल्हानिहाय ठरवण्यात आलेल्या पिक विमा कंपन्यांना प्राप्त झाल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानी प्रमाणे विमा रक्कम पाठविण्यात येईल. खरीप पिकाचा विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी मिळणार याची आस लागलेली आहे ?


शासन निर्णय (GR) पाहण्यासाठी येथे क्लिक करा.