Police Bharti 2024 Physical Exam Date – A total of 17,471 police posts are being recruited across the state of Maharashtra. For this, 17.76 lakh unemployed youth of the state have applied. It has come to light that most of the candidates, including those who have completed D.T.Ed. and B.Ed. with engineering degrees, are graduates. The physical test can usually take two-and-a-half to three months as the number of applications received for Maharashtra Police recruitment is high.Candidates Read the complete details given below on this page regarding the Police Bharti 2024
Police Bharti 2024 Physical Exam Date – A total of 17,471 police posts are being recruited across the state of Maharashtra. For this, 17.76 lakh unemployed youth of the state have applied. It has come to light that most of the candidates, including those who have completed D.T.Ed. and B.Ed. with engineering degrees, are graduates. The physical test can usually take two-and-a-half to three months as the number of applications received for Maharashtra Police recruitment is high.Candidates Read the complete details given below on this page regarding the Police Bharti 2024
महाराष्ट्र राज्यभरात १७ हजार ४७१ पदांची पोलिस भरती होत आहे. त्यासाठी राज्यातील १७ लाख ७६ हजार बेरोजगार तरुणांनी अर्ज केले आहेत. त्यात अभियांत्रिकी झालेल्या तरुण- तरूणींसह डीटीएड, बीएड झालेल्यांसह बहुसंख्य उमेदवार पदवीधर असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. महाराष्ट्र पोलिस भरतीसाठी प्राप्त अर्जांची संख्या जास्त असल्याने शारीरिक चाचणीसाठी साधारणत: अडीच ते तीन महिने लागू शकतात.
• उमेदवारांची मैदानी चाचणी झाल्यानंतर मुंबईसह राज्यभरातील सर्व उमेदवारांची एकाचवेळी लेखी परीक्षा घ्यायची की मुंबईची स्वतंत्र आणि इतर जिल्ह्यातील उमेदवारांची एकाचवेळी परीक्षा घ्यायची याचा निर्णय होणार आहे. मागील भरतीवेळी मुंबईची भरती स्वतंत्र झाली होती. यंदा तशाप्रकारेच घ्यायची की संपूर्ण राज्यभरातील उमेदवारांची एकाचवेळी लेखी परीक्षा घ्यायची याचा निर्णय आचारसंहितेनंतर होईल, अशी माहिती गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.
• राज्यातील बेरोजगारीचे दर्शन यापूर्वीच्या शासकीय विभागांच्या भरतीतून समोर आला आहे. जिल्हा परिषद, तलाठी भरतीत देखील जागांच्या तुलनेत दहापट अर्ज आले होते. आता पोलिस बॅण्डसमन या पदभरतीत एका जागेसाठी तब्बल ७८० उमेदवार रिंगणात आहेत. तुरुंग शिपाई या पदासाठी एका जागेकरिता २०६ तर पोलिस चालक पदासाठी एका जागेसाठी ११७ उमेदवार भरतीच्या मैदानात असणार आहेत. एकूणच या पोलिस भरतीत एका जागेसाठी १०२ उमेदवारांची परीक्षा होईल. मैदानी चाचणीत उत्तीर्ण झालेल्यांपैकी एका जागेसाठी दहा उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड होणार आहे.
• लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजेच ४ जूननंतर मैदानी चाचणीला सुरवात होईल. उन्हाची तीव्रता पाहून सकाळच्या सत्रातच मैदानी चाचणी होणार आहेत. साधारणत: दिवाळीपूर्वी लेखी परीक्षा होवू शकते. पण, विधानसभेच्या आचारसंहितेत किंवा कामकाजामुळे या परीक्षेला अडचणी येणार नाहीत, यादृष्टीने गृह विभागाकडून नियोजन सुरू आहे.
• लोकसभा निवडणूक व आचारसंहिता आणि पुन्हा सप्टेंबर- ऑक्टोबरमधील विधानसभा निवडणूक व आचारसंहिता, यावेळी बहुसंख्य पोलिस अधिकारी, कर्मचारी बंदोबस्तावर असतात. त्यामुळे भरतीसाठी मनुष्यबळ उपलब्धतेची अडचण येवू शकते. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूक सुरू होण्यापूर्वी गृह विभागाला सध्याची भरती उरकावी लागणार आहे अशी सद्य: स्थिती आहे.
• Police Bharti 2024 Physical Exam Date पदनाम रिक्त पदे अर्ज
• पोलिस शिपाई ९,५९५ ८.२२ लाख
• चालक १,६८६ १.९८ लाख
• पोलिस बॅण्डसमन ४१ ३२,०००
• एसआरपीएफ ४,३४९ ३.५० लाख
• तुरुंग शिपाई १,८०० ३.७२ ला
• मैदानी व लेखी चाचणीचे गुण एकत्रित केले जाणार असून, त्या दोन्ही चाचण्यांमध्ये सर्वाधिक गुण मिळविलेल्यांची मेरिट यादी प्रसिद्ध होईल. त्यानुसार पोलिस शिपायांची निवड होणार असून, चालक पोलिस शिपाई पदासाठी स्वतंत्रपणे वाहतुकीसंदर्भातील चाचणी उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीमुळे पोलिस अधिकारी- कर्मचारी बंदोबस्तावर आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी संपेल आणि त्यानंतर मैदानी चाचणी घेण्याचे नियोजन असल्याची माहिती गृह विभागाच्या प्रशिक्षण व खास पथके विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
• उन्हामुळे सकाळी ४ तासच मैदानी चाचणी – सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, शेवटच्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर २० मेनंतर मैदानी चाचणीला सुरवात करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून अनेक जिल्ह्यांतील तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त आहे. या पार्श्वभूमीवर दररोज सकाळी सहा ते १० या चार तासांतच मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांत पोलिस भरतीची लेखी परीक्षा एकाच वेळी होणार आहे. साधारणत: ३० ऑगस्टपूर्वी भरती प्रक्रिया संपविण्याचे नियोजन असून, ऑक्टोबरअखेर या भरतीत निवड झालेल्यांचे प्रशिक्षण सुरू होईल.
• भरती अर्जातून ७१ कोटींचे शुल्क जमा – पोलिस भरतीसाठी अर्ज करताना खुल्या प्रवर्गासाठी ४५० रुपये तर मागास प्रवर्गासाठी ३५० रुपयांचे शुल्क होते. सध्याच्या पोलिस भरतीसाठी राज्यभरातील १७ लाख ७६ हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यात काही उमेदवारांनी दोन-तीन अर्ज केल्याचीही उदाहरणे आहेत. अर्जाच्या शुल्कातून अंदाजे ७१ कोटी रुपये शासनाकडे जमा झाले आहेत.
Police Bharti 2024 Physical Exam Date पोलिस भरतीसंदर्भात ठळक बाबी…
• एकूण जागा – १७,४७१
• उमेदवारांचे अर्ज – १७,७६,०००
• अर्जातून जमा शुल्क – ७१.०४ कोटी
• मैदानी चाचणीचा वेळ – सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत