Crop Insurance : क्रॉप इन्शुरन्स ॲपच्या माध्यमातून पिकाची नुकसान भरपाई नोंद ऑनलाईन कशी करावी ?

Crop Insurance : क्रॉप इन्शुरन्स ॲपच्या माध्यमातून पिकाची नुकसान भरपाई नोंद ऑनलाईन कशी करावी ?

 







Crop Insurance : केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांच्या शेती पिकांच नुकसान झाल्यास त्यांना आर्थिक मदत मिळावी, या अनुषंगाने प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) सुरू करण्यात आलेली आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील हंगामानुसार पिकांचा नुकसान झाल्यास शासनाकडून व इन्शुरन्स कंपनीकडून भरपाई म्हणून काही प्रमाणात मोबदला दिला जातो; परंतु यासाठी शेतकऱ्यांना नुकसान झालेल्या पिकाची नोंद करावी लागते.

पीक नुकसान भरपाई नोंद 2023

शेतकऱ्यांना विविध परिस्थितीत पीक नुकसान भरपाई दिली जाते. ज्यामध्ये अतिवृष्टी, पुर, अवकाळी पाऊस, अवेळी पाऊस, काढणी पश्चात व काढणीनंतर पिकांच नुकसान अशा विविध बाबींचा समावेश आहे. पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विहित मुदतीत म्हणजेच नुकसान झाल्यापासून पुढील 48 तासात ( वाढीव कालावधी मर्यादा 96 तास) नुकसान भरपाईची ऑनलाईन नोंद करावी लागते.

सदर लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत, की कश्याप्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आपण आपल्या मोबाईलवरून पिकाची झालेली नुकसान पीक विमा कंपनीकडे पाठवून नुकसान भरपाई मिळू शकतो. त्यासाठी तुम्हाला प्ले-स्टोरवरून Crop Insurance हा एप्लीकेशन डाउनलोड करून खालीलप्रमाणे नुकसान भरपाईची नोंद करावी लागेल.

Crop Insurance ॲपद्वारे नुकसान भरपाई ऑनलाईन नोंद

• सर्वप्रथम गुगल प्ले-स्टोअरवरून क्रॉप इन्शुरन्स नावाचा ॲप डाऊनलोड करा.

• त्यानंतर ॲप इन्स्टॉल करा, ॲप इंस्टॉल झाल्यानंतर ॲप उघडा.

• आता तुमच्यासमोर विविध प्रकारचे पर्याय दिसतील त्यामधील, Continue Without Login या पर्यायावर क्लिक करा.

• त्यानंतर पुढील टप्प्यामध्ये तुम्हाला परत 05 पर्याय दिसतील त्यामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा Crop Loss हा पर्याय निवडा.

• त्यानंतर पुढील टप्प्यात मूलभूत अशी माहिती भरून घ्या, ज्यामध्ये तुमचा मोबाईल क्रमांक, पेरणी हंगाम, इन्शुरन्स पॉलिसी क्रमांक इत्यादी माहिती भरून पुढील टप्प्यामध्ये तुमच्या नुकसान झालेल्या पिकाची सविस्तर माहिती भरून घ्या.

• माहिती भरत असताना नुकसान झालेल्या पिकाची फोटो काढून तुम्हाला अपलोड करावी लागते, फोटो काढून संपूर्ण अर्ज पडताळणी करून घ्या त्यानंतर अर्ज सबमिट करा.

• संपूर्ण अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक डोक्यात नंबर दिला जाईल, डॉक्टर क्रमांक पुढील कामासाठी सेव्ह करून ठेवा.

Crop Insurance ॲप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अशाप्रकारे तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने तुमच्या मोबाईलवरून शेतात झालेल्या पिकाची नोंद विमा कंपनीकडे पाठवून विहित मुदतीत पिक विमा मिळवू शकता.

Crop Insurance ॲपची वैशिष्ट्य

केंद्रशासनाकडून सुरू करण्यात आलेला क्रॉप इन्शुरन्स ॲप शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची ऑनलाईन नोंद करण्यासाठी, नोंद केलेल्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी त्याचप्रमाणे नव-नवीन कृषी क्षेत्रातील ताज्या बातम्याची माहिती प्राप्त करण्यासाठी खूपच लाभदायक आहे. या ॲपच्या माध्यमातून मागील काही वर्षात बऱ्याच शेतकऱ्यांनी पिकाच्या नुकसानीची नोंद करून मोठ्या प्रमाणावर नुकसान भरपाई मिळवलेले आहे