सरकारी नोकरी करू इच्छिणार्‍यांसाठी खूशखबर 1 जून ते 15 आँगस्ट पर्य्ंत 75 हजारची पदभरती

सरकारी नोकरी करू इच्छिणार्‍यांसाठी खूशखबर 1 जून ते 15 आँगस्ट पर्य्ंत 75 हजारची पदभरती

 






The state government is going to recruit 75

thousand posts from June 1 to August 15.... The government has prepared an action plan for this...More than fifty three lakh posts are vacant under 43 departments of the state government... Therefore, a plan has been prepared for the recruitment of 75 thousand posts, two and a half 75 thousand posts are going to be filled in months... Advertisements are going to be released for this. TCS, IBPS companies have been appointed for recruitment of Group-B, C and Group-D posts outside the purview of Public Service Commission...


राज्य सरकार 1 जून ते 15 ऑगस्टपर्यंत 75 हजार पदांची भरती करणार आहे.... यासाठी सरकारने कृती आराखडा तयार केलाय...राज्य शासनाच्या 43 विभागांतर्गत पावणेतीन लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत...त्यामुळे 75 हजार पदांच्या भरतीसाठी आराखडा तयार केला असून, अडीच महिन्यांत 75 हजार पदं भरली जाणार आहेत... यासाठी जाहिराती प्रसिद्ध होणार आहे. लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट- ब, क आणि गट - ड पदभरतीसाठी टीसीएस, आयबीपीएस या कंपन्यांची नियुक्ती करण्यात आलीय... सध्या महसूल, कृषी, शालेय शिक्षण, ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य व गृह, जलसंपदा या विभागात पदं रिक्त आहेत...त्यामुळे इच्छुकांसाठी सरकारी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे....



१. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात अंदाजे ७५ हजार सरळसेवा कोट्यातील पदे भरण्याचा शासनाने निर्धार केला असून दि.१५ ऑगस्ट, २०२३ पूर्वी सदर पदे भरावयाची आहेत. ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील आरोग्य व इतर विभागातील संवर्गाच्या पदभरतीचा कालबद्ध कार्यक्रम विभागाच्या अनुक्रमे दि. २१ ऑक्टोबर, २०२२ व दि. १५ नोव्हेंबर, २०२२ च्या शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात आला होता. सदर जाहिरातीद्वारे सर्व जिल्हा परिषदांतील विविध संवर्गातील एकूण १८,९३९ पदे भरली जाणार आहेत.

२. विभागाच्या दि.१६ मार्च, २०२३ च्या शासन निर्णयान्वये दि. ३१ डिसेंबर, २०२३ पर्यंत जिल्हा परिषद सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत दोन वर्षे इतकी शिथिलता देण्यात आलेली आहे.

३. तसेच, माहे मार्च, २०१९ च्या जाहिरातीप्रमाणे यापूर्वी अर्ज केलेले/भरलेले आहेत, अशा सर्व उमेदवारांना दि.३१ डिसेंबर, २०२३ पर्यंत जिल्हा परिषद सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींकरिता अर्ज करण्यास पात्र करण्यात आले आहे. तसेच, मार्च, २०१९ च्या जाहिरातीप्रमाणे सदर पदांसाठी असलेली शैक्षणिक अर्हता ही पुढील फक्त एका परीक्षेसाठी कायम ठेवण्यात आली आहे.
४. त्यानुसार सर्व जिल्हा परिषदांतील रिक्त पदांची बिंदुनामावली अंतिम करण्याचे काम पूर्ण झालेले आहे. तथापि, सामान्य प्रशासन विभागाच्या दि. २१ नोव्हेंबर, २०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये दिलेल्या निर्देशानुसार परीक्षा टी.सी.एस./ आय.बी.पी.एस. या कंपन्यांद्वारे ऑनलाइन पद्धतीने घ्यावयाच्या आहेत. त्यानुसार, IBPS कंपनीसोबत बैठका घेऊन MOU अंतिम करण्यात आला आहे. सद्यस्थितीत, आय.बी.पी.एस. कंपनीतर्फे सदर MOU वर स्वाक्षरी करून संबंधित जिल्हा परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी याचे स्वाक्षरी करण्याकरिता सर्व नोडल अधिकारी तथा उप आयुक्त (आस्थापना), विभागीय आयुक्त कार्यालय यांचे कार्यालयास पाठविण्यात आलेला आहे. त्यानुसार जि. प. स्तरावर MOU वर स्वाक्षऱ्या होऊन येत्या आठवड्यात MOU करण्याची कार्यवाही पूर्ण होईल.


५. तसेच, Application Portal विकसित करण्याचे काम आय. बी. पी. एस. कंपनी स्तरावर सुरु करण्यात आले असून, त्यासाठी लागणारा जाहिरातीचा नमुना, रिक्त पदांची आरक्षण प्रवर्ग निहाय माहिती व वयोमर्यादा व शैक्षणिक अर्हतेबाबतची माहिती आय.बी. पी. एस. कंपनीस देण्याबाबत सर्व नोडल अधिकारी तथा उप आयुक्त (आस्थापना) यांना कळविण्यात आले होते. तरी, सदर माहिती तात्काळ कंपनीस पाठविण्यात यावी, जेणेकरून Application Portal विकसित करणे सुलभ जाईल.
६. तसेच, सदर कंपन्यांची एकाच वेळी परीक्षा घेण्याची क्षमता वर्धन करिता सदर कंपन्यांना शासनाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक प्रणाली भाडेतत्वावर उपलब्ध करून देण्याची शिफारस सचिव समितीने केली आहे. त्यानुसार विभागाच्या दि.१७.०२.२०२३ च्या शासन पत्राद्वारे उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि कौशल्य, विकास व उद्योजगता विभागास कळविण्यात आलेले आहे.
तथापि, या परीक्षेच्या आयोजनाबाबत परीक्षार्थींनी यासंदर्भात चौकशी केली असता जिल्हा परिषदेकडून दिशाभूल करणारी माहिती दिली जात असल्याचे समजते आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. तसेच, गेल्या चार वर्षापासून पदभरती झाली नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. ही बाब विचारात घेता पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.
 ७.अ. सर्व जिल्हा परिषदांनी सदर पदभरतीबाबत संक्षिप्त टिप्पणी /प्रेसनोट तयार करावी ज्यामध्ये शासनस्तरावर सदर पदभरतीसाठी झालेली कार्यवाही, जिल्हा परिषद स्तरावर करण्यात आलेली कार्यवाही व पदभरतीबाबतची सद्यस्थिती याचा अंतर्भाव असावा. तसेच, आगामी परीक्षा घेण्याबाबत चा Action Plan असावा. सदर प्रेसनोट कार्यालयाच्या दर्शनीय भागात लावावी, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना याबाबतची माहिती मिळू शकेल.

आ. सर्व जिल्हा परिषदांनी सदर पदभरतीची माहिती व शंका निरसन करण्याकरिता हेल्पलाईन क्रमांक सुरु करावा व सदर हेल्पलाईन क्रमांक आगामी पदभरती परीक्षा होऊन त्यातील यशस्वी विद्यार्थ्यांना नियुक्ती मिळेपर्यंत कार्यालयीन वेळेत नेहमी सुरु ठेवण्यात यावा. इ. पदभरती विषयास सर्वोच्च प्राथमिकता देण्यात येवून, याबाबतच्या कार्यवाहीस कोणताही विलंब होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. असे महाराष्ट्र  शासनाचे उप सचिव यांनी राज्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा सर्व यांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.



अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा