३० सप्टेंबरनंतरही २ हजारांच्या नोटा वैधच!

३० सप्टेंबरनंतरही २ हजारांच्या नोटा वैधच!

 






रिझर्व्ह बँकेचे स्पष्टीकरण, सर्वसामान्यांमध्ये संभ्रम

पीटीआय, नवी दिल्ली

दोन हजारांच्या नोटा चलनातून मागे घेण्यात येणार असल्या तरी त्यांचा वैध आणि विधिसंमत चलन म्हणून दर्जा कायम राहणार आहे, अशी माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली. तथापि, ३० सप्टेंबरपर्यंत नोटा बदलून किंवा बँकांमध्ये जमा न केल्यास काय होईल, याबद्दल काहीही स्पष्टपणे नमूद केलेले नसल्याने सर्वसामान्यांमध्ये संभ्रमाची स्थिती कायम आहे.

रिझर्व्ह बँकेच्या चलन व्यवस्थापनाचा भाग म्हणून दोन हजारांच्या नोटा मागे घेतल्या गेल्या असून वैध चलन म्हणून या नोटेचा दर्जा कायम राहणार असल्याने दास यांनी सोमवारी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे दोन हजारांची नोट पुढेही वस्तू व सेवा खरेदीसाठी वापरता येऊ

रिझर्व्ह बँकच नव्हे तर मूल्याच्या चलनी नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही.. आमच्याकडे नोटांचा मुबलक साठा आहे, त्यामुळे नोटा बदलून घेण्यासाठी घाई केली जाऊ नये.



शकते, असे ते म्हणाले. दास यांच्या मते, दोन हजारांच्या बहुतांश नोटा ३० सप्टेंबरपर्यंत परत येतील. अंतिम मुदत जवळ येईल तेव्हा बदलण्यात आलेल्या नोटांचे प्रमाण लक्षात घेऊन गरज पडल्यास

मुदत संपल्यानंतर ओळखपत्र लागणार?

२०१४मध्ये रिझर्व्ह बँकेने २००५ पूर्वी छपाई झालेल्या ५०० आणि १,००० रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेतल्या होत्या. १ एप्रिल २०१४च्या मुदतीनंतर नोटा वैध चलन म्हणून कायम राहतील, असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर १ जुलैपासून १० पेक्षा अधिक नोटा बदलण्यासाठी ग्राहकांना ओळखपत्र दाखविणे बंधनकारक करण्यात आले होते. या वेळीही वेगळे परिपत्रक काढून असाच निर्णय होण्याची शक्यता आहे.



मुदतवाढीचा निर्णयही घेतला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. परदेशात दीर्घकालीन दौरा अथवा कामासाठी गेलेल्या नागरिकांना येणाऱ्या अडचणींबाबत रिझर्व्ह बँक संवेदनशील


गव्हर्नर, रिझवर्क बैंक
    - शक्तिकांत दास,