कुसुम सोलर पंप योजनेसाठी अर्ज सुरू या नवीन वेबसाईटवर असा करा अर्ज

कुसुम सोलर पंप योजनेसाठी अर्ज सुरू या नवीन वेबसाईटवर असा करा अर्ज

 





महाऊर्जा मार्फत राज्यामध्ये महाकृषि ऊर्जा अभियान पीएम कुसुम पटक योजनेच्या पुढील टप्प्याअंतर्गत सौर कृषिपंपांकरिता शेतकऱ्यांना महा ऑनलाईन पोर्टलवर अर्ज सादर करण्यासाठी अनलाईन पोर्टल दि. १७ मे २०२३ रोजी पासून सुरु करण्यात येत आहे. पीएम- कुसुम योजनेअंतर्गत शेतकन्यांना त्यांच्या शेतजमीन क्षेत्रानुसार व इतर पात्रतेच्या अटीनुसार ३ ५ ७.५ HP DC चे पारेषण विरहित सौर कृषिपंप स्थापित करण्यात येतात. त्याबाबत लाभार्थी हिस्सा खालीलप्रमाणे आहे.

तरी राज्यातील सर्व शेतकन्यांना महाकृषि ऊर्जा अभियान पीएम कुसुम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महाऊर्जा मार्फत करण्यात येत आहे. महाऊर्जा मार्फत जिल्हानिहाय उपलब्ध करून दिलेल्या कोटानुसार अर्ज प्राप्त झाल्यानंतर पोर्टल बंद करण्यात येईल. योजनेबाबतची सर्व माहिती व पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याबाबत सर्व माहिती ऊर्जा संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शेतकयांनी महाऊर्जाच्या संकेतस्थळावर अर्ज करावा व इतर कुठल्याही बनावट / फसव्या संकेतस्थळाचा वापर करू नये.

विरहित सौर कृषिपंप आस्थापित करण्यात येतात. त्याबाबत लाभार्थी हिस्सा खालीलप्रमाणे आहे

प्रवर्ग खुला (१० टक्के)
3 HP
5 HP
7.5HP
रु.१९.३८०/-
रु.२६,९७५/-
रु.37,440/-

अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (५ टक्के)
रु.9,690/-
रु.13,488/-
रु.18,720

अटल सौर कृषिपंप योजना-१ व २ आणि मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेमध्ये लाभ घेतलेले शेतकरी महाकृषि ऊर्जा अभियन पीएम-कुसुम घटक-ब योजनेसाठी पात्र नाहीत. त्यामुळे त्यांनी महाकृषि ऊर्जा अभियन पीएम- कुसुम घटक-ब योजनेच्या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरू नयेत. तरी सुद्धा अर्ज भरल्यास त्यांचा अर्ज रद्द करण्यात येईल. महाकृषि ऊर्जा अभियन पीएम- कुसुम घटक-ब योजनेअंतर्गत एका लाभार्थी शेतकऱ्याने एकाच सौर कृषिपंपाकरीता अर्ज सादर करावा. एकापेक्षा जास्त अर्ज सादर केल्यास इतर अर्ज रद्द करण्यात येईल…


तसेच असे निदर्शनास आले आहे की उपरोक्त योजनेअंतर्गत सौर कृषिपंपाचा लाभ घेतलेले शेतकरी सौर कृषिपंप काढून ठेवतात व लाभ घेतला नसल्याचे भासवून दुसरा सौर कृषिपंप महाकृषि ऊर्जा अभियन पीएम- कुसुम घटक व योजने अंतर्गत आस्थापित करुन घेतात. अशी बाब निदर्शनास आल्यास त्यांच्याकडील सौर कृषिपंप काढून घेण्यात येईल व त्यांनी भरलेली लाभार्थी हिस्सा रक्कम जप्त करण्यात येईल व अशा शेतकऱ्यांच्या विरुद्ध FIR करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.


आँनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक कर्