कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना 2023, असा करा ऑनलाईन अर्ज; Kadba Kutti Yojana 2023

कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना 2023, असा करा ऑनलाईन अर्ज; Kadba Kutti Yojana 2023

 




शासनाकडून शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना शेती करत असताना मशागतीची व इतर कामे सोयीस्कर व सोप्यापद्धतीने करता यावीत. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून शासनामार्फत कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना महाराष्ट्र (Subsidy Scheme) राज्यासाठी सुरू करण्यात आली.

आधुनिक काळातसुध्दा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर गाई, म्हशी, शेळ्या किंवा इतर पाळीव पशु, प्राणी असतात. शेतकरी शेतीसोबत जोडधंदा म्हणून किंवा जमिनीसाठी शेणखत, दूधदुपत होईल हा विचार करून पशुचा, जनावरांचा सांभाळ करत असतो.

ज्या शेतकऱ्यांकडे गाय, म्हैस, शेळी अशी गोरे-ढोरे असतील, त्यांना जनावरांना चारा-पाणी व्यवस्थित करावा लागतो. जनावरांना चारा कापून घालताना शेतकऱ्यांना खूप कष्ट करावे लागते. तुम्हीसुद्धा एक शेतकरी असाल व तुमच्याकडे गुर-ढोर असतील, तर चारापाणी करण्यासाठी शासनाकडून कडबा कुटी मशीन म्हणजेच chaff Cutter machine अनुदान तत्त्वावर दिली जाते.

कडबा कुट्टी मशीनचे खूप फायदे (Benefits) आहेत. जनावरांसाठीचा चारा या मशीनच्या साह्याने जलद गतीने व नासाडी न होता कापता येतो, त्याचप्रमाणे यंत्राच्या साह्याने चाऱ्याची कापणी केल्यामुळे चारा बारीक कापण्यात येतो; परिणामी जनावरांना खाण्यास सोपे व सहज होते.


कडबा कुट्टी मशीन अनुदान व किंमत (Chaff Cutter Price & Subsidy)

कडबा कुट्टी मशीनची किंमत (Price) सामान्यता: 10 हजारापासून 40 हजारापर्यंत आहे. शेतकऱ्यांची जनावरांची क्षमता, कडबा कापण्याची गती (3HP,5HP) यानुसार कडबा कुट्टी मशीनची किंमत ठरवली जाते. कडबा कुट्टी मशीनमध्ये मानवचलित व स्वंयचलित अशा दोन यंत्राचे प्रकार आहेत. मानवचलित स्वस्त, तर स्वयंचलित कडबा कुट्टी यंत्र महागडे असतात.

कडबा कुटी मशीनसाठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, महिला व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 50 टक्के 20 हजार रुपयांच्या मर्यादेपर्यंत अनुदान दिलं जातं, तर इतर शेतकऱ्यांना ही अनुदान मर्यादा 16 हजार रुपयापर्यंत आहे.

कडबा कुट्टी अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्र (Documents)

• शेतकऱ्यांचा आधारकार्ड (Aadhar)

• बँक पासबुक झेरॉक्स (Bank Passbook)

• जातीचा दाखला (आवश्यक असल्यास)

• जमिनीचा 7/12 उतारा

• 8अ उतारा

• पिकांची माहिती

• GST बिल, कोटेशन, हमीपत्र, करारनामा (लॉटरी लागल्यानंतर)



कडबा कुट्टी मशीनसाठी अर्ज कसा करावा ? (Chaff Cutter Online Application)

कडबा कुट्टी मशीन अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान मिळवण्यासाठी Online Application Form भरावा लागतो. फॉर्म भरल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड केली जाते. निवड केल्यानंतर आवश्यक ती कागदपत्र महाडीबीटी पोर्टलवर अपलोड करून कृषी सहाय्यक व कृषी अधिकारी यांच्याकडून पडताळणी केली जाते व शेतकऱ्यांना कडबा कुटी मशीन अनुदान दिलं जात.



शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला कडबा कुट्टी मशीन अनुदानाचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला MahaDBT Farmer Portal ला भेट द्यावी लागेल. त्या ठिकाणी नवीन नोंदणी करून कृषी यांत्रिकीकरण या घटकांतर्गत खालीलप्रमाणे अर्ज करावा लागेल.

• महाडीबीटी पोर्टल वर नोंदणी करून लॉगिन केल्यानंतर तुमच्यासमोर अर्ज करा असा पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करा.

• त्यानंतर तुमच्यासमोर तीन उपघटक दिसतील, कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने व सुविधा, फलोत्पादन. यापैकी कृषी यांत्रिकीकरण या समोरील बाबी निवडा या बटणावर क्लिक करा.

• आता योजना निवडण्यासाठी मुख्य प्रक्रिया सुरू होईल या ठिकाणी अशाप्रकारे पर्याय निवडा. कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य > मनुष्य चलित अवजारे > फॉरेज ग्रॉस अँड स्ट्रॉ / रेसिडू मॅनेजमेंट (कटर/श्रेडर) > चाफ कटर

• वरीलप्रमाणे पर्याय निवडल्यानंतर जतन करा या बटणावर क्लिक करा.

• जर तुम्ही नवीन शेतकरी असाल व नोंदणी करून सर्वप्रथम कृषी यांत्रिकीकरण या घटकांतर्गत अर्ज करत असाल तर तुम्हाला २३.६० पैसे इतकी रक्कम ऑनलाईन पद्धतीने भरावी लागेल.

• जर तुम्ही यापूर्वी कृषी यांत्रिकीकरण या घटकांतर्गत अर्ज केलेला असेल, तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा शुल्क लागणार नाही.


आँनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा