Zill Parishad Bharati 2023 : जिल्हा परिषद महाभरती ; 16000 रिक्त जागा

Zill Parishad Bharati 2023 : जिल्हा परिषद महाभरती ; 16000 रिक्त जागा

 





ग्रामविकास विभाग अंतर्गत जिल्हा परिषदेमध्ये गट क च्या महाभरतीचा शासनाने  निर्णय घेतलेला आहे.

या भरतीमध्ये (गट ड आणि वाहन चालकाचे) पदे वगळता इतर पदे सर्व भरली जाणार आहेत.

सर्व पदांचा वेळापत्रक आणि शासन निर्णय आज जारी करण्यात आला त्याविषयी या लेखांमध्ये माहिती पाहणार आहोत.

GR शासन निर्णयानुसार ग्रामविकास विभाग, वित्त विभाग, सामान्य प्रशासन विभाग आणि आरोग्य विभागाची गट क संवर्गाची पदे भरली जाणार आहेत.


ही पदभरती 15 ऑगस्ट 2023 पर्यंत करण्यात येणार आहे, याबाबत शासन निर्णय देखील आलेला आहे. गट ड वगळता उर्वरित रिक्त पदांपैकी 80 टक्के पदे भरण्यास परवानगी दिली आहे ही पदभरती राज्याच्या 34 जिल्ह्यांमध्ये होणार आहे.

शासन निर्णयानुसार ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीत येथील जिल्हा परिषद अंतर्गत घटकांमधील सर्व संवर्गाच्या (वाहनचालक व गटसंवर्गातील पदे वगळून) पदभरती करण्याचा खालील प्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.

ग्रामविकास विभागाचे आकडेतील जिल्हा परिषद अंतर्गत घटकांमधील सर्व संवर्गाची पदे सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदाच्या 80% मर्यादेपर्यंत भरण्यास शासनाने मान्य केले आहे.

सदर मान्यता वित्त निर्देशानुसार विभागाच्या 15 ऑगस्ट 2023 पर्यंत लागू राहील,  त्या पुढील भरती प्रक्रिया वित्त विभागाचे शासन निर्णय 30 सप्टेंबर 2022 नुसार सुधारित आकृतीबंध शासनाने मान्य केल्यावरच करता येईल.


ZP जिल्हा परिषदेमधील घटकांमधील सर्व संवर्गाची गट ड व वाहनचालक पदे वगळून रिक्त पदे संवर्गनिहाय आरक्षण नियमानुसार निश्चित करून,जिल्हा परिषदेने त्यांच्या स्तरावर जिल्हा निवड मंडळामार्फत मार्फत भरण्याबाबत सुधारित कालबद्ध कार्यक्रम म्हणजे परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.





कोणत्या विभागात किती रिक्त जागा 

• महसूल विभाग – 2000

• ग्राम विकास विभाग – 10000

• आरोग्य विभाग – 3000

• इतर -1000



शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा