देशातील
तरुणांना स्वावलंबी बनवून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी राज्य आणि केंद्र
सरकारतर्फे विविध योजना राबवल्या जातात. त्याचबरोबर छोट्या-छोट्या व्यवसायांत
गुंतलेल्या लोकांवरही सरकार विशेष लक्ष देत आहे. त्यासाठी केंद्र सरकार योजना
राबवत आहे. केंद्राची पीएम स्वनिधी योजनाही त्यापैकीच एक आहे. या योजनेंतर्गत
रस्त्यावरील विक्रेत्यांना त्यांचे काम सुरू करण्यासाठी आणि त्यांचे काम
वाढविण्यासाठी केंद्र सरकार बिनव्याजी कर्ज देत आहे.
या योजनेचे
वैशिष्ट्य म्हणजे यासाठी तुम्हाला कोणत्याही विशेष कागदपत्रांची आवश्यकता नाही.
खासकरून रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे. यातील खास
बाब म्हणजे एकदा कर्जाची परतफेड केल्यानंतर, लाभार्थीला दुसऱ्यांदा कर्जाच्या
स्वरूपात कोणत्याही व्याजदराशिवाय दुप्पट रक्कम मिळू शकते. या योजनेअंतर्गत
घेतलेल्या कर्जाची रक्कम एका वर्षाच्या कालावधीत फेडता येते. याशिवाय, मासिक हप्त्यांमध्येही परतफेडचा पर्याय आहे.
केंद्र
सरकार या कर्जावर भरघोस सबसिडी देत आहे. यासोबतच कर्जदारांना कॅशबॅकही दिला जात
आहे. या योजनेची वैधता डिसेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
रस्त्यावरील विक्रेत्यांसमोरील आर्थिक समस्या दूर करून त्यांना स्वावलंबी बनवणे,
त्यांना डिजिटल पेमेंटसाठी प्रोत्साहन देणे हा या योजनेचा उद्देश
आहे. पीएम स्वनिधी योजना काय आहे, अर्ज कसा करावा, याच्या अटी-शर्ती आणि प्रक्रिया नेमकी काय आहे याबद्दल जाणून घ्या...
काय आहे
पीएम स्वनिधी योजना
ही केंद्र
सरकारची योजना आहे. छोट्या व्यवसायातील लोकांना आर्थिक साहाय्य करणे आणि
रस्त्यावरील विक्रेते, हातगाडी व्यावसायिकांचा व्यवसाय वाढवणे आणि त्यांच्या व्यवसायातील आर्थिक
समस्या दूर करणे हा याचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार 50 हजार रुपयांचे कर्ज विना व्याज देते. एका वर्षात जर ही रक्कम परत केली,
तर कर्जदार दुप्पट रक्कम कर्ज म्हणून घेऊ शकतो. तसेच, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही गॅरंटरची गरज भासणार नाही.
डिसेंबर 2024 पर्यंत गरजू लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
परंतु, एका कुटुंबातील एकच व्यक्ती पीएम स्वनिधी योजनेचा लाभ
घेऊ शकते.
काय आहेत
अटी आणि शर्ती?
- अर्जदार भारताचा रहिवासी असणे गरजेचे आहे.
- रस्त्यावरील विक्रेते या योजनेसाठी पात्र
असतील.
- कोरोना महामारीमुळे ज्यांच्या व्यवसायावर
परिणाम झाला आहे ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- रस्त्याच्या कडेला स्टेशनरी दुकाने आणि
छोटे कारागीर या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही
गॅरेंटरची गरज भासणार नाही.
- लाभार्थी कर्ज एकरकमी किंवा हप्त्याच्या
स्वरूपात जमा करू शकतात.
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
मतदार ओळखपत्र शिधापत्रिका पासबुकची झेरॉक्स पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
याशिवाय, केंद्राने या योजनेविषयी सर्वसाधारणपणे विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची
उत्तरे दिली आहेत. ती तुम्हाला या लिंकवर वाचता येतील.
पीएम
स्वनिधी योजनेसाठी अर्ज कसा कराल?
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात आधी केंद्राची अधिकृत वेबसाइट pmsvanidhi.mohua.gov.in वर
जा.
- होमपेजवर जाऊन Apply
Loan 10k/Apply Loan 20k/Apply Loan 50k वर क्लिक करा.
- या ठिकाणी तुमचा मोबाइल नंबर नोंदवा, तुमच्या मोबाइलवर SMSच्या
माध्यमातून एक OTP येईल.
- OTP पडताळणी झाल्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म समोर येईल.
- याचे प्रिंट आउट काढून घ्या.
- यानंतर संपूर्ण फॉर्म भरा, सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
- केंद्र सरकारने निश्चित केलेल्या स्वनिधी केंद्रांवर जाऊन फॉर्मसहित
सर्व आवश्यक कागदपत्रे जमा करा.
- पडताळणीनंतर स्वनिधी योजनेंतर्ग कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यात
येईल.
लक्षात ठेवा
यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे द्यायचे नाहीयेत. यामुळे कुणाच्या
भूलथापांना किंवा फसवणुकीला बळी पडू नका.