PM किसान योजना नवीन रजिस्ट्रेशन असे करा- PM Kisan New Registration

PM किसान योजना नवीन रजिस्ट्रेशन असे करा- PM Kisan New Registration

 




प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेच्या माध्यमातून भारतातील संपूर्ण शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांच्या नावे स्वतःची शेत जमीन आहे अशा शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये केंद्र शासनाच्या माध्यमातून दिले जातात. शेतकऱ्यांना 4 महिन्याला दोन हजार असे वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात

आज आपण या योजनेसाठी नवीन नाव नोंदणी कशी करायची याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तुम्ही जर शेतकरी आहात आणि तुमच्या नावावर जर जमीन आहे आणि तुम्ही अजून पर्यंत जर याचा लाभ घेतला नसेल तर या योजनेचा तुम्ही अवश्य लाभ घ्या कारण या योजनेच्या माध्यमातून वार्षिक 6 हजार रुपये मिळणार आहेत.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय काय लागतात हे देखील जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे व या योजनेसाठी नवीन पद्धतीने रजिस्ट्रेशन कोठे करावे नवीन रजिस्ट्रेशन केल्यानंतर किती दिवसांनी पैसे मिळतात याची संपूर्ण माहिती आपण खाली जाणून घेणार आहोत त्याकरिता A टू Z माहिती काळजीपूर्वक वाचा तरच तुम्हाला समजेल

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे ?

• आधार कार्ड ( मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक )

• रेशन कार्ड नंबर 12 अंकी ( तुमच्या गावातील रेशन धान्य दुकानात मिळेल )

• 7/12 उतारा

• 8/अ उतारा

• बँक पासबुक ची आवश्यकता नाही कारण तुमचे पेमेंट आधार पेमेंट मोड वरती येणार. तुमचे आधार कार्ड ज्या बँकेत NPCI ला  लिंक आहे त्याच बँकेत तुमचे पैसे येणार आहेत.



PM Kisan New Registration

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी नवीन नोंदणी करावी ?

• नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधि च्या ऑफिशियल वेबसाईट वरती जावं लागेल.

• नवीन नाव नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.

• तुम्हाला इथे दोन ऑप्शन दिसतील रुरल फार्मर रजिस्ट्रेशन आणि उर्बन फार्मर रजिस्ट्रेशन तुम्ही जर ग्रामीण भागातील असाल तर रुरल फार्मर रजिस्ट्रेशन वरती क्लिक करा तुम्ही जर शहरी भागातील असाल तर उर्बन फार्मर रजिस्ट्रेशन वरती क्लिक करा.

• त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्या तुमचं राज्य निवडा खाली दिलेला पासवर्ड टाकून घ्या.

• त्यानंतर गेट ओटीपी या बटणावर क्लिक करा.

• तुमच्या मोबाईल क्रमांक वरती एक ओटीपी येईल तो ओटीपी टाकून घ्या.

• त्यानंतर तुमचं राज्य निवडा , जिल्हा निवडा, सबडीसट्रिक मध्ये तुमचा तालुका निवडा ब्लॉकमध्ये पण तुमचा तालुका निवडा त्यानंतर तुमचं गाव निवडा.

• खाली तुम्हाला तुमचं नाव ऑटोमॅटिक दिसेल.

• तुमची जी कॅटेगिरी आहे ती सिलेक्ट करा.

• फार्मर टाईप मध्ये तुम्हाला जर 1 ते 2 एकर जमीन असेल तर स्मॉल सिलेक्ट करा 2 एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर other वरती क्लिक करा.

• त्यानंतर तुमच्या वडिलांचे नाव टाकून घ्या आईचे नाव टाकून घ्या.

• लँड रजिस्ट्रेशन आयडी मध्ये तुम्ही तुमचा ७/१२ उतारा डिजिटल काढून घ्या व त्यातील अल्पिंन नंबर टाकून घ्या.

• त्यानंतर तुमचा 12 अंकी रेशन कार्ड नंबर टाकून घ्या.

• त्यानंतर तुम्हाला प्रधानमंत्री मानधन योजना जर चालू करायचे असेल तर हो करा नसेल तर नाही करा.

• त्यानंतर तुमची शेती जर स्वतःच्या नावावरती असेल सिंगल ऑप्शन सिलेक्ट करा.

• तुमच्या शेतीची सर्व माहिती काळजीपूर्वक भरून घ्या.

• त्यानंतर खाली तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड ऑप्शन दिसेल.

• तुमच्या मोबाईल मधील डॉक्युमेंट तिथे अपलोड करा.

• त्यानंतर सबमिट या बटणावर क्लिक करा.

• तुमची नाव नोंदणी झाली आहे.

• नाव नोंदणी होण्यासाठी 45 दिवस ते 60 दिवसांचा कालावधी लागू शकतो.