PM किसान योजना पती-पत्नी दोघांनाही मिळणार 6000 रु – PM kisan Yojana New Update

PM किसान योजना पती-पत्नी दोघांनाही मिळणार 6000 रु – PM kisan Yojana New Update

 




शेतकरी मित्रांनो आज आपण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजे ( Pm kisan yojana ) नवीन नियम जाणून घेणार आहोत. Pm Kisan Yojana New Update : पी एम किसान या योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकार आपल्या देशातील शेतकऱ्यांसाठी वार्षिक सहा हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये थेट जमा करते. परंतु या योजनेमध्ये केंद्र सरकारकडून आता बदल करण्यात आलेला आहे.

PM kisan Yojana New Update

यामध्ये अनेक प्रकारचे नवीन नियम जोडलेले आहेत. पी एम किसान योजना या योजनेच्या माध्यमातून आता पती-पत्नी या दोघांनाही प्रधानमंत्री किसान सन्माननीय योजनेचा लाभ मिळणार आहे असे जनतेकडून बोलले जात आहे परंतु हे खरे की खोटे याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या नवीन नियमानुसार पती व पत्नी दोघेही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.

जर एकाच घरातील पती किंवा पत्नी दोघेही या योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांच्याकडून घेतलेल्या पैशाची वसुली सरकारकडून केली जाईल. हे माहीत असून देखील अपात्र शेतकऱ्यांनी जर याचा लाभ घेतला तर तुम्ही जेवढे हप्ते घेतलेले आहेत ते सर्व हप्ते सरकारकडून वसूल करण्यात येतील व तुम्हाला ते पैसे सरकारला परत करावे लागतील.



PM किसान योजना नवीन नाव नोंदणी करण्यासाठी