शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी : MahaDBT शेती योजना लॉटरी लागली ! हे एक काम ७ दिवसांत करावं लागणार नाहीतर होईल नुकसान…

शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी : MahaDBT शेती योजना लॉटरी लागली ! हे एक काम ७ दिवसांत करावं लागणार नाहीतर होईल नुकसान…

 




नमस्कार शेतकरी मित्रानो केंद्र सरकार आणि राज्य सरकार विविध घटकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना या आखल्या जातात व त्या अमलात देखील आणल्या जातात. यांच्या संबंधित जर आपण कृषी क्षेत्राचा विचार केला तर कृषी क्षेत्रासाठी देखील केंद्र आणि राज्य असे दोन्हीही मिळून अनेक प्रकारच्या शासनाच्या योजना आहेत.

परंतु या अगोदरची स्थिती पाहिली तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बंधूंना अनेक प्रकारचे दिव्यातून आणि वेगवेगळ्या प्रक्रियांमधून जावे लागत होते. त्यामुळे शेतकऱ्यांची या कटकटीतून मुक्तता करण्यासाठी शेती क्षेत्राशी संबंधित ज्या काही केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना आहेत या आता ‘एक शेतकरी एक अर्ज’ माध्यमातून महाडीबीटी पोर्टलद्वारे राबवल्या जातात.


बंधूंना कुठल्याही प्रकारच्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना  विविध प्रक्रियांमधून जावे न लागता त्यांना एकच पोर्टलच्या माध्यमातून या सगळ्या योजना उपलब्ध होतात. अशा महत्त्वपूर्ण महाडीबीटी पोर्टल योजनेच्या बाबतीत महत्त्वाचे अपडेट समोर आली असून त्यासंबंधीची आपण माहिती घेऊ.


महाडिबिटी लाॅटरी येथे पहा

महाडीबीटी पोर्टल योजनेच्या बाबतीत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

केंद्र आणि राज्य सरकारच्या कृषी क्षेत्रासाठी असलेल्या सर्व योजना या आता एक शेतकरी एक अर्ज या माध्यमातून बऱ्याच योजना राबवल्या जातात. शेतकरी बंधू या महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून अनेक योजनांसाठी अर्ज करतात आणि आता सध्या स्थितीत देखील अनेक अनेक योजनांचा लाभासाठी अर्ज केलेले असतील. महाडीबीटी पोर्टल लॉटरी लागली असून तुम्ही आता नावे पाहू शकता.


यामध्ये कृषी यांत्रिकीकरण योजना, शेतीसाठी लागणाऱ्या विविध सिंचन साधनांच्या विषयीच्या योजना इत्यादी व इतर महत्त्वाच्या घटकांसाठी त्या शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत व ते या योजनेसाठी निकषानुसार पात्र झाले आहेत, अशा शेतकऱ्यांना आता निवडीच्या बद्दलचे एसएमएस यायला सुरुवात झाली असून बऱ्याच जणांना काही नेटवर्क प्रॉब्लेम सारख्या काही तांत्रिक कारणांमुळे  वेळेत एसेमेस मिळू शकत नाहीत

या बाबीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यासाठी तुम्ही तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड तसेच तुमचा आधार क्रमांक आणि आवश्यक ओटीपीसह तुम्ही पोर्टल वर लॉग इन करून तुमची संबंधित योजनेमध्ये निवड झाली आहे की नाही हे तपासू शकतात.

महाडिबीटि लाॅटरी येथे पहा


यामध्ये आता जर नवीन नियमाचा विचार केला तर महाडीबीटी पोर्टलची लॉटरी लागल्यानंतर जे शेतकरी बंधू या योजनांसाठी पात्र होतात त्यांना सात दिवसांच्या आत मध्ये लागणारी आवश्यक कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करणे गरजेचे असते. परंतु सात दिवसाची मुदत संपल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे शक्य झाले नाही

तर संबंधित अधिकाऱ्यांच्या माध्यमातून गरज असलेले व संबंधित योजनेमध्ये लाभार्थी कमी असतील तर अशा लाभार्थ्यांसाठी मुदत वाढवून ती तीन दिवसांची देण्यात येते. परंतु तरीदेखील दर कागदपत्रे अपलोड केली गेली नाही तर अशा शेतकरी बंधूंचा अर्ज हा बाद ठरविला जातो. फक्त वेळेत माहिती न मिळाल्यामुळे तुमचे हे नुकसान होऊ शकते.


त्यामुळे तुम्हाला संबंधीचा काही संदेश प्राप्त झाला आहे की नाही हे अगोदर तपासणी गरजेचे असून जर संदेश आला नसेल तर तुम्हाला ते ऑनलाईन पद्धतीने देखील चेक करता येणे शक्य आहे. त्यासाठी तुम्हाला https://mahadbtmahait.gov.in/Home/Index या वेबसाईटवर जाणे गरजेचे असून यावर गेल्यानंतर तुमचा यूजर आयडी आणि लॉगिन पासवर्ड नमूद करून लॉगिन करणे गरजेचे आहे.


तुमच्याकडे यूजर आयडी किंवा पासवर्ड नसेल किंवा तुम्ही पासवर्ड विसरला असाल तुम्ही तुमचे आधार कार्ड व त्या आधार कार्ड रजिस्टर नंबरवर आलेल्या ओटीपीचा वापर करून देखील लॉगिन करणे शक्य आहे. लॉगिन केल्यानंतर जर तुम्हाला कळले की तुमची निवड झाली आहे.

महाडिबीटि लाॅटरी यादि येथे पहा


त्या ठिकाणी तुम्हाला एक संदेश पाहायला मिळेल. यामध्ये तुम्हाला ज्या घटकासाठी तुमची निवड झाली आहे त्या घटकाच्या संबंधित असलेली कागदपत्रे ही सात दिवसाच्या आत अपलोड करावी असा संदेश असेल किंवा तुम्ही  अर्ज केलेल्या ऑप्शन मध्ये गेल्यानंतर तुमचा जो काही अर्ज असेल त्या अर्जासोबत असलेल्या बाबीच्या समोर तुम्हाला विनर नावाचा एक पर्याय दिसतो.

त्यानंतर तुम्हाला ज्या घटकासाठी तुमची निवड झाली आहे त्याच्याशी संबंधित असलेली कागदपत्रे ही सात दिवसाच्या आत अपलोड करणे गरजेचे आहे. ही प्रक्रिया झाल्यानंतर यामध्ये बाबींसाठी असलेल्या लक्षांका नुसार तुम्हाला पुढे चालून त्याचे संमती पत्र दिले जाते.

परंतु त्यासाठी कागदपत्रे अपलोड करणे खूप गरजेचे असून नाहीतर तुम्हाला या योजनेमध्ये बाद केले जाण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे तुम्ही महाडीबीटी पोर्टल वर जाऊन लॉगिन करून तुमची निवड झाली असेल तर सात दिवसाच्या आत कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे आहे.


महाडिबीटि लाॅटरी यादित आपले नाव तपासा