प्रधानमंत्री किसान सन्मान योजनंअंतर्गत गाव पातळीवर कृषी मित्रांच्यामार्फत लाभार्थ्यांची भौतिक तपासणी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सामाजिक अंकेक्षण केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे गाव पातळीवर लाभार्थ्यांच्या याद्याही प्रसिध्द करण्यात येणार आहेत.
कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनंेतर्गत प्रलंबित डाटा दुरुस्तीसाठी शिबिर आयोजित करणे, योजनेच्या लाभार्थ्यांची भौतिक तपासणी करणे व अपात्र लाभार्थ्यांकडून दिलेला लाभ वसूल करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. या योजनंेतर्गत लाभार्थ्यांचे सामाजिक अंकेक्षण केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे गाव पातळीवर लाभार्थ्यांच्या याद्या प्रसिध्द करुन गावपातळीवरील प्रमाणपत्र घेऊन महसूल विभाग, ग्रामविकास विभाग व कृषी विभागाच्या समन्वयाने जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात पूर्ण करण्यात येणार आहे.
योजनंेतर्गत प्रलंबित अर्जांच्या डाटा दुरुस्तीचे काम करण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांना एनआसी मार्फत संदेश पाठवून त्यांचा अर्ज कोणत्या कारणास्तव प्रलंबित आहे याबाबत कळवण्यात येणार आहे. डाटा दुरुस्तीचे काम पूर्ण करुन पात्र लाभार्थ्यांना तत्काळ लाभ देण्यासाठी मार्च महिन्यातील चौथ्या शुक्रवारी गावपातळीवर तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्या उपस्थितीत शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. त्यामध्ये पात्र लाभार्थ्यांचा डाटा दुरुस्त करण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी प्राप्त होणाऱ्या रकमेतून मानधन देवून योजनेतील लाभार्थ्यांची भौतिक तपासणी गाव पातळीवर कृषी मित्रांच्यामार्फत करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
भौतिक तपासणी केल्यानंतर याबाबतची पडताळणी तलाठी, कृषीसेवक व ग्रामसेवक यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. भौतिक तपासणीचे अर्ज तहसील कार्यालयात जमा करुन तपासणी १०० टक्के पूर्ण करण्याच्या सूचना आहेत. आयकर व इतर कारणामुळे अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून दिलेला लाभ वसुलीचे काम जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली महसूल विभागाकडून करण्यात येत आहे. हा निधी केंद्र शासनास जमा करण्यात येत आहे.
१३ हजारांवर शेतकऱ्यांकडून वसुली सुरू
जिल्ह्यात ४ लाख ६२ हजार २८० शेतकऱ्यांपासून योजनेची अंमलबजावणी सुरु झालेली आहे. आतापर्यंत प्रत्येकी २ हजाराप्रमाणे आठ हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आलेले आहेत. केंद्र शासनाकडून जिल्हा प्रशासनाला १३ हजारावर आयकरदात्या शेतकऱ्यांची यादी पाठवण्यात आलेली आहे. त्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा लाभ मिळण्यासाठी अपात्र ठरवण्यात आलेले आहे. या शेतकऱ्यांनी १२ कोटी ४८ लाख ५२ हजार रकमेचा लाभ घेतलेला आहे. या शेतकऱ्यांकडून महसूल विभागाकडून वसूली करण्यात येत आहे. आतापर्यंत सहा कोटींवर वसूल झाले आहेत.
पीएम किसान फिजिकल व्हेरिफिकेशनमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदी आणि त्यांचे करदाते, कोणत्याही विभागातील अधिकारी कर्मचारी आणि राजकारणी आणि डॉक्टर, वकील इत्यादींची तपासणी केली जाते. तपासणीअंती अपात्र आढळल्यास येणारे हप्ते थांबवून आतापर्यंत जाहीर झालेले हप्ते वसूल करण्याची कारवाई केली जाते.
म्हणजेच, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या भौतिक पडताळणीमध्ये, फॉर्म भरताना दिलेल्या माहितीची भौतिक पडताळणी केली जाते! म्हणजेच शेतकऱ्याने दिलेली माहिती चुकीची असल्याचे आढळून आल्यास त्याला अपात्र घोषित केले जाते!
PM Kisan Physical Verification योजनेचा उद्देश?
PM किसान सन्मान निधी योजनेंतर्गत, सरकार वेळोवेळी Pm Kisan Ekyc इत्यादींचा वापर करून लाभ मिळवणाऱ्या शेतकऱ्यांचे तपशील स्पष्ट करण्यासाठी आणि अपात्र लोकांना योजनेतून बाहेर काढण्यासाठी वेळोवेळी करते.
पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रत्येक गावातील सुमारे ५% शेतकऱ्यांची प्रत्यक्ष पडताळणी कृषी अधिकाऱ्यांमार्फत करायची आहे. या 5% शेतकऱ्यांची नावे यादृच्छिकपणे आणि संगनमताच्या शक्यतेच्या आधारे निवडली जातील.
लागणारी कागदपत्रे
१) आधार कार्ड
२) बँक पासबुक
३) सात बारा उतारा
४) 8 अ उतारा
टीप -
भौतिक तपासणी हि बोगस शेतकरी शोधण्यासाठी केली जात आहे.
फॉर्म डाऊनलोड करून पूर्णपणे भरून त्याला कागदपत्रे जोडून आपल्या कृषी सेवकाकडे जमा करावा.