90 % अनुदानावर मिनी ट्रॅॅक्टर लवकर करा अर्ज

90 % अनुदानावर मिनी ट्रॅॅक्टर लवकर करा अर्ज

 




मिनी ट्रॅक्टर योजना संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या 

जेणे करून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकेल. शेतीमध्ये 

विविध कामाठी ट्रॅक्टरचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणत केला 

जातो. विशेषता मिनी ट्रॅक्टरची मागणी सध्या खूप वाढलेली आहे

ट्रॅक्टरचा उपयोग शेतीमध्ये मोठ्या प्रमाणत होत असला 

तरी पावसाळा ऋतूमध्ये शेतामध्ये ट्रॅक्टरचा उपयोग करण्यास 

मर्यादा येते. त्यामुळे मिनी ट्रॅक्टर योजना संदर्भात अधिक 

माहिती जाणून घेतल्यास तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल.

या योनेसाठी कोणते अर्जदार पात्र असणार आहेत, अर्ज कोठे करावा लागणार आहे हि आणि इतर महत्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

अशावेळी तुमच्याकडे मिनी ट्रॅक्टर असेल तर त्याचा उपयोग अगदी शेतातील पिकांमध्ये विविध कामासाठी केला जावू शकतो.

मिनी ट्रॅक्टर शासकीय अनुदानावर देखील खरेदी करता येते. मिनी ट्रॅक्टर घेण्यासाठी शासनाकडून ९० टक्के अनुदान मिळते.

मिनी ट्रॅक्टर योजना अर्ज कसा करावा लागतो, कोणत्या व्यक्ती यासाठी पात्र असतात हे आपण या ठिकाणी अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

या योजनेंतर्गत 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्या ट्रॅक्टरसाठी लागणारी इतर साहित्य पुरवठा  करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

केवळ अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील अर्जदार या योजनेसाठी अर्ज करू शकतील.

मिनी ट्रॅक्टर  योजना अटी खालीलप्रमाणे

·         जे स्वयंसहाय्यता बचत असणार आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील नागरिक असावेत.

·         स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे.

·         बचत गटातील कमीत कमी 80% सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील असणे गरजेचे आहे.

·         मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने म्हणजेच आवश्यक असणारे साहित्य यांच्या खरेदीची जास्तीत जास्त मर्यादा रु. 3.50 लाख इतकी असेल,

·         स्वयंसहाय्यता बचत गटांनी वरील कमाल मर्यादेच्या रक्कमेच्या 10% स्वहिस्सा भरल्यानंतर 90% (कमाल रु. 3.15 लाख) शासकीय अनुदान अनुज्ञेय राहिल.

जाणून घ्या अर्ज कोठे करावा लागणार.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या व्यक्ती पात्र आहेत आणि या साठी कोणत्या अटी दिलेल्या आहेत हे आपण जाणून घेतलेले आहे. आता जाऊन घेवूयात कि या योजनेसाठी ऑनलाईन आज करण्यासठी कोठे अर्ज करावा लागतो.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या जिल्ह्याच्या समाज कल्याण कार्यालयास तुम्हाला भेट द्यायची आहे. या कार्यालयामध्ये तुम्ही ९० टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर खरेदी करू शकता.

मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी हे असतील पात्र  

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना काहीतरी उत्पन्नाचे साधन निर्माण व्हावे तसेच त्यांचे राहणीमान बदलावे या उद्देशाने हि योजना राबविली जात आहे.

 

योजनेचे नाव

मिनी ट्रॅक्टर  योजना

योजनेसाठी पात्र लाभार्थी

अनुसूचित जाती व नवबौध्द

अर्ज कोठे करावा

संबधीत जिल्ह्याचे समाज कल्याण कार्यालय

किती मिळणार लाभ

10% स्वहिस्सा भरल्यानंतर 90% (कमाल रु. 3.15 लाख