पीएम
किसान योजना पात्र अपात्र यादी
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KIsan) ही भारत सरकारच्या महत्त्वाच्या योजनांपैकी एक
आहे. या योजनेंतर्गत, २ हेक्टर (४.९ एकर) पेक्षा कमी जमीन असलेल्या लहान आणि अत्यल्प
भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करते. या योजनेंतर्गत सर्व शेतकऱ्यांना किमान
उत्पन्न आधार म्हणून प्रतिवर्षी रु. ६,०००/- रुपये मिळतात. १ डिसेंबर २०१८ पासून राबविण्यात
आलेली ही योजना
शेतकऱ्यांसाठी वरदान आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला प्रति वर्ष रु. ६,०००
तीन हप्त्यांमध्ये दिले जातात आणि मदतीची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली
जाते. म्हणजेच दर ४ महिन्यांनी २ हजारांची मदत शेतकऱ्याला दिली जात आहे.
PM-Kisan List शेतकरी योजनेचा ११ व हफ्ता लवकरच येणार आहे आणि त्यासाठी लागणारे
FTO जनरेट होणे सुरु झाले आहे आणि खालील यादीत आपण आपले नाव बघू शकता. जर
यादीत आपले नाव असेल तरच आपल्याला रु. २०००/- मिळणार आहेत तर लगेच स्क्रोल करून
खालील लिंकवर आपल्या पूर्ण गावाच्या लिस्ट मध्ये नाव बघून घ्या.
पीएम किसान योजने अंतर्गत वर्षाकाठी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात आणि यामध्ये
सर्वात मोठा बदल आता योजनेअंतर्गत करण्यात आलेला आहे. तो म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांना
केवायसी करणे बंधनकारक आहे आणि याची शेवटची मुदत ही केंद्राने जाहीर केलेले आहे. या
तारखेच्या आत केवायसी करणं बंधनकारक आहे. आणि याच बरोबर जे अपात्र शेतकरी होते अशा
अपात्र सर्व शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. तर यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांचे नाव
आहे आपलं तर नाव नाही ऑनलाईन पद्धतीने कसे चेक करायचा आहे. तसेच शेतकऱ्यांना पुढील
दोन हजार रुपये कधी मिळणार
आहे. याची लिंक खाली दिलेल्या मध्ये आहे.
या योजनेत नवीन नोंदणी करण्यासाठी
खालील कागदपत्रे लागतात.
- आधार कार्ड
- ओळख पत्र
- वयाचा दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- बॅंक पासबुक
- मोबाईल क्रमांक
- पासपोर्ट साईजचा एक फोटो
इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पीएम किसान
मानधन पेन्शन योजनेत शेतकऱ्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. 18 ते 40 वयोगटातील कोणीही
या योजनेसाठी रजिस्ट्रेशन करु शकतो.
पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास पात्र
शेतकऱ्यांसाठी नोंदणी सुरू आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाइटवर pmkisan.gov.in
भेट देऊन स्वतः अर्ज करू शकता. तुम्ही पीएम किसान योजनेचा लाभ
घेण्यासाठी आधीच अर्ज केला असेल. परंतु, आजपर्यंत तुमच्या
खात्यात पैसे आले नसतील, तर त्याची स्थिती जाणून घेणं
महत्त्वाचं आहे.
यादीत
असं चेक करा आपलं नाव-
1. आधी पीएम किसान (PM Kisan) च्या अधिकृत वेबसाइटवर https://pmkisan.gov.in/
ला भेट द्या.
2. उजव्या बाजुला ‘Farmers Corner’चा ऑप्शन
दिसेल.
3.‘Beneficiary List’च्या ऑप्शनवर क्लिक करा. नंतर नवीन पेज उघडेल.
4. नव्या पेजवर विचारलेली माहिती द्या. (उदा. राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव)
5. त्यानंतर Get Report वर क्लिक करा.
स्क्रिनवर तुम्हाला लाभार्थींची संपूर्ण यादी दिसेल.