नमो शेतकरी योजनेचा हफ्ता जमा होण्यास सुरुवात तुम्हाला जमा झाला का लगेच तपासा | Namo Samman Yojana Maharashtra

नमो शेतकरी योजनेचा हफ्ता जमा होण्यास सुरुवात तुम्हाला जमा झाला का लगेच तपासा | Namo Samman Yojana Maharashtra

 




Namo Samman Yojana Maharashtra राज्यभरातील सुमारे ८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हफ्ता आज बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे.या योजनेसाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना पैसे जमा होणार आहेत.शेतकऱ्यांना आता २००० रु.चा हफ्ता देण्यास देखील सुरवात झाली आहे याबद्दल सविस्तर माहिती पाहूया.

महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी महत्वाची असणारी योजना म्हणजेच नमो शेतकरी सन्मान योजना या योजनेचा आता पहिला हफ्ता २००० रु.शेतकऱ्यांच्या खात्यावर दिनांक २६ ऑक्टोबर २०२३ रोजी जमा केला जाणार आहे.या योजनेच्या पहिल्या हफ्त्यासाठी १७२० कोटी रु.निधी वितरीत करण्यात आला आहे.राज्यात ओढविलेल्या दुष्काळ परिस्थितीला तोंड देण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना सनासुदीत आर्थिक मदत देण्यासाठी नमो शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हफ्ता हा राज्यातील ८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी २००० रु.प्रमाणे दिला जाणार आहे.

योजनेचे नावनमो शेतकरी महासन्मान निधी योजनालाभ रक्कमवार्षिक ६००० रु.वितरीत निधी१७२० कोटी रु.लाभार्थी संख्या८५ लाख ६० हजार शेतकरी पैसे जमा होण्याची तारीख २६ ऑक्टोबर २०२३

नमो शेतकरी योजनेसाठी सरकारने वेगळी वेबसाईट बनवली नसल्याने अनेक शेतकरी त्यांना पैसे येणार का नाही हे पाहू शकत नाहीत.तसेच अनेकांना गावनिहाय पात्र यादी असेल किंवा बँकेचे नाव असेल अशा अनेक गोष्टी पाहताना अडचणी येत आहेत.परंतु नमो शेतकरी योजना हि संपूर्ण पीएम किसान योजनेशी संलग्न असल्याने या दोन्ही योजनेसाठी पीएम किसान याच वेबसाईट वर तुम्हाला अधिक माहिती पाहता येणार आहे.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हफ्ता गुरुवार दिनांक २६ ऑक्टोबर २०२३ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे.यानिमित्त मोठा कार्यक्रम आयोजित केला असून यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार,कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि राज्याचे सर्वच मंत्रिमंडळ उपस्थित होते.

या योजनेची लाभार्थी यादी खाली देण्यात आली असून गावनिहाय यादी असून यामध्ये नाव असणाऱ्या सर्वच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा पहिला हफ्ता दिला जाणार आहे.यासोबतच पीएम किसान सन्मान योजनेचा देखील येणारा हफ्ता यासर्व शेतकऱ्यांना दिला जाणार आहे.

नमो शेतकरी सन्मान योजनेचे पैसे जमा झालेले कसे पाहणार ?

• नमो शेतकरी योजनेचा स्टेटस पाहण्यासाठी वर दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जायचे आहे.

• त्यानंतर तुमचा Registration ID किंवा आधार नंबर टाकून तुम्हाला लॉगीन करायचं आहे.

• यानंतर ओपन झालेल्या स्टेटस मध्ये तुम्हाला तुमचे नाव व माहिती पहायची आहे.

• खाली आल्यावर ekyc Done : YES

• Adhar Bank Link Status : YES

• Land Seeding : YES


या तिन्ही ठिकाणी YES असल्यास तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा पहिला हफ्ता जमा होणार आहे.यामध्ये एकही ठिकाणी जर NO असेल तर मात्र तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा पहिला हफ्ता व पीएम किसान योजनेचा देखील पुढील हफ्ता मिळणार नाही.Namo Samman Yojana Maharashtra


नमो शेतकरी योजना गावनिहाय यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा