पिएम किसान योजनेचा 11 वा हप्ता जमा असे करा चेक

पिएम किसान योजनेचा 11 वा हप्ता जमा असे करा चेक

 



शेतकऱ्यांसाठ बँक खात्यामध्ये pm kisan nidhi payment proceed. आज म्हणजेच दिनांक ३१ मे २०२२ रोजी pm kisan samman nidhi चा ११ वा हफ्ता शेतकऱ्यांच्या बँक अकाऊंटमध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधीच्या ११ व्या हफ्त्याचे पेमेंट ट्रान्स्फर केले जाणार आहे.


तुम्ही जर तुमची ekyc केलेली असेल तर हा ११ व हफ्ता तुमच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी pm किसान योजनेसाठी नोंदणी केलेली आहे. त्यांना अजून देखील pm किसान सन्मान निधीचा हफ्ता मिळत नाहीत.

pm किसान सन्मान निधीचा हफ्ता न मिळण्याचे कारण म्हणजे चुकीचे बँक तपशील हे सुद्धा असू शकते किंवा इतर कारण देखील यासाठी असू शकते.

तुम्हाला जर माहिती करून घ्यायचे असेल कि तुम्हाला पीएम किसान सन्मान निधीचा हफ्ता मिळणार आहे किंवा नाही तर लगेच खालील पद्धतीचा अवलंब करा. जेणे करून तुम्ही तुमच्या मोबाईलवर जाणून घेवू शकता कि तुम्हाला हा pm किसान सन्मान निधी चा हफ्ता मिळणार आहे किंवा नाही.

खालील पद्धतीचा अवलंब करून मोबाईलवर बघा.

• सगळ्यात अगोदर तुमच्या मोबाईलमधील कोणतेही ब्राउजर ओपन करा.

• ब्राउजरच्या सर्च बारमध्ये pm kisan samman nidhi असा कीवर्ड टाका आणि शेअर करा.

• तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरpm kisan samman nidhi हि वेबसाईट ओपन होईल.

• पेजला थोडे खालील स्क्रोल करा farmers corner या बटनावर क्लिक करा.

• या ठिकाणी दिसत असलेल्या beneficiary status या बटनावर क्लिक करा.

• त्यांनतर तुमचा आधार नंबर किंवा खाते क्रमांक टाका आणि Get Data या बटनावर क्लिक करा.

• जसे तुम्ही Get Data या बटनावर क्लिक कराल त्यावेळी तुम्हाला आतापर्यंत किती हफ्ते मिळाले आहेत या संदर्भातील माहिती मिळेल.

• एक बाब या ठिकाणी लक्षात घ्या या ठिकाणी pm किसान सन्मान निधीचा जरी ११ वा हफ्ता मिळत असला तरी तुमच्यासाठी हा १ ला दुसरा किंवा तिसरा हफ्ता असू शकतो

• ११ वा हफ्ताच्या स्टेट्स मध्ये Payment proceed असे लिहिलेले असेल तर समजून जा कि तुम्हाला लवकरच हा हफ्ता मिळणार आहे.

पीएम किसान योजना कार्यपद्धती.

शेतकरी बांधवाना पीएम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत दरवर्षी ६ हजार रुपये अनुदान मिळते.

• या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो.

• ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट काढून तलाठी यांच्याकडून संबधित कागदपत्रावर सही शिक्के घ्यावे लागतात.

• हि सर्व कागदपत्रे तहसील कार्यालयामधील पीएम किसान सन्मान निधी विभागाकडे सादर केली जातात.

• तहसील कार्यालयामधील पीएम किसान सन्मान निधी विभागाने मंजुरी दिल्यावर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो.