देशातील गरीब कुटुंबांचे आर्थिक स्तर
सुधारण्यासाठी आणि चांगले राहण्यासाठी सरकार अनेक सरकारी योजना राबवते. यापैकी एक योजना म्हणजे मनरेगा योजना. देशातील सर्व
राज्यांमध्ये ग्रामपंचायत स्तरावर कार्यान्वित होणारी ही योजना भारत सरकारची खूप
मोठी योजना आहे.
MGNREGA ही भारत सरकारद्वारे
लागू केलेली रोजगार हमी योजना आहे, जी 7 सप्टेंबर 2005 रोजी विधानसभेत मंजूर झाली. त्यानंतर 2 फेब्रुवारी 2006 रोजी 200 जिल्ह्यांमध्ये याची सुरुवात झाली. सुरुवातीला याला राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (NREGA)
असे म्हटले जात होते, परंतु 2 ऑक्टोबर 2009 रोजी त्याचे नामकरण महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा असे करण्यात आले.
मनरेगा ही जगातील एकमेव योजना आहे जी 100
दिवसांच्या रोजगाराची हमी देते. या
योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारने 2010-11
या आर्थिक वर्षात 40,100 कोटी रुपयांची तरतूद
केली होती. देशातील गरीब
व बेरोजगार कुटुंबे आपल्या उदरनिर्वाहासाठी या योजनेचा लाभ घेत आहेत. अशा कमकुवत उत्पन्न गटातील लोकांना
त्यांच्याच ग्रामपंचायतीत रोजगार दिला जातो, त्यामुळे
स्थलांतराचा प्रश्नही बऱ्याच अंशी टळला आहे.
मनरेगा MANREGA योजनेचे उद्दिष्ट :
ग्रामीण विकास आणि रोजगार ही दुहेरी उद्दिष्टे
साध्य करणे हे मनरेगाचे सर्वात मोठे उद्दिष्ट आहे.
ग्रामीण भारतात राहणार्या गरीब आणि कमकुवत
उत्पन्न गटातील कुटुंबांना 100 दिवसांचा
रोजगार उपलब्ध करून देणे, जेणेकरुन ते आपला उदरनिर्वाह करू
शकतील.
विकासकामांसोबत आर्थिक बळ देणे.
ग्रामपंचायत स्तरावर रोजगार उपलब्ध करून देणे, जेणेकरून रोजगारासाठी इतर शहरांकडे होणारे स्थलांतर
थांबवता येईल.
उदरनिर्वाह बळकट करणे आणि गरीब कुटुंबांचे उत्पन्न वाढवणे.
समाजातील दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात
समाविष्ट करणे हे मनरेगा योजनेचे उद्दिष्ट आहे.
भारतातील पंचायती राज आस्थापनांचे अधिक
बळकटीकरण.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी
कायदा ठळक वैशिष्ट्ये :
ग्रामीण भागातील कुटुंबातील व्यक्तींना एका
आर्थिक वर्षात केंद्रीय निधीतून शंभर दिवसाची रोजगाराची हमी दिली जाते. म्हणजेच
मागेल त्याला काम तसेच 365 दिवसांची हमी राज्य
शासनाकडून दिली जाते.
कुटुंबातील प्रौढ व्यक्ती अर्जाद्वारे त्याच्या
कुटुंबातील सर्व व्यक्तींची नोंदणी करता येऊ शकते.
सर्व इच्छुक कुटुंबाच्या रोजगार ओळखपत्र जॉब
कार्ड फोटो सहित लॅमिनेटेड ओळखपत्र देणे बंधनकारक आहे.
अंगमेहनतीने काम करणाऱ्या कुटुंबातील इच्छुक
व्यक्तींनी लेखी किंवा तोंडही नोंदणीसाठी ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीकडे अर्ज
सादर करावा लागतो.
कामासाठी अर्ज केल्याच्या 15 दिवसाच्या आत मोफत जॉब कार्ड दिलं जातं.
घराच्या पाच किलोमीटरच्या पुढील अंतरावर रोजगार
पुरवण्यात आलेल्या अतिरिक्त प्रवास आणि जीवकेसाठी मजुरीच्या दहा टक्के वाढीव
रोजगार करून येतो.
मजुरांची मजुरी काम केल्यापासून 15 दिवसांच्या आत मजुरांच्या बँक खात्यावर e-fms प्रणाली द्वारे किंवा पोस्ट खात्यात जमा केली जाते. अन्यथा 0.05% विलंब आकारणी देय होते.
पुरुष आणि स्त्रियांना समान रोजगार दर दिला
जातो.
कामाच्या ठिकाणी पिण्याचे पाणी प्राथमिक उपचार
बरोबर आणलेल्या 6 वर्षाखालील लहान मुलांना
सांभाळण्याची सोय इत्यादी सुविधा असायला हव्यात. तसेच दुखापत झाल्यास रुग्णास सर्व
रुग्णसेवा व दैनिक मजुरीच्या 50 टक्के रुग्ण भत्ता देण्यात
येतो. अपंगत्व व मृत्यू झाल्यास रुपये 50 हजार पर्यंत अनुदान
व कुटुंब नियोजनासाठी सवलती देण्यात येतात.
ग्रामपंचायत स्तरावर 50 टक्के खर्चाची विकास कामे या योजनेअंतर्गत करणे आवश्यक
असते.
अधिकाधिक मजुरांना लाभ मिळवण्यासाठी या योजनेत
केल्या जाणाऱ्या कामांसाठी कंत्राटदार आणि यंत्रसामग्री वापरण्यास बंदी आहे.
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे (MANREGA )लाभार्थी निवडीचे निकष :
पात्र लाभार्थी निकष पुढीलप्रमाणे :
1) अनुसूचित जाती
2) अनुसूचित जमाती
3) भटक्या जमाती
4) भटक्या विमुक्त जमाती
5) दारिद्र्य रेषेखालील इतर कुटुंबे
6) महिला प्रधान कुटुंबे
7) शारिरीक अपंगत्व प्रधान असलेली कुटुंबे
8) भूसूधार योजनेचे लाभार्थी
9) इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी
10) अनुसूचित जमातीचे व अन्य परंपरागत वन्य निवासी (वन अधिकार
मान्यता) अधिनियम 2006 नुसार पात्र लाभ व्यक्ती
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत
केली जाणारी कामे :
या योजनेअंतर्गत सार्वजनिक तसेच ज्या
व्यक्तींना वैयक्तिक स्वरूपातील कामे जसे की, जमीन
तयार करणे, शेणखत पसरविणे, सरी वरंबे
तयार करणे, तुती रोपे लागवड, आंतर
मशागत, खते व औषधी देणे, तुती छाटणी,
गळ फांद्या काढणे, फांदी कापणे, शेड निर्जंतुकीकरण, चॉकी किटक संगोपन व कोष काढणे,
मत्स्य व्यवसायाला चालना देण्याकरिता पायाभूत सुविधा निर्माण करणे,
स्वच्छतागृह बांधकाम करणे (एकूण 682 मनुष्य
दिवस 201 रुपये प्रती मुनष्य दिवस याप्रमाणे) इत्यादी कामे
दिली जातात.
मनरेगा रोजगार हमी योजना जॉब कार्ड (job card) म्हणजे काय?
मनरेगा अंतर्गत काम करण्यास इच्छुक पात्र आणि अकुशल लोकांना जॉब
कार्ड दिले जातात. जर तुमचे जॉब कार्ड अजून तयार झाले नसेल तर तुम्ही त्यासाठी
अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला विहित नोंदणी फॉर्म भरावा लागेल आणि कागदपत्रांसह
ग्रामपंचायत कार्यालयात सादर करावा लागेल. यानंतर, तुमचा
अर्ज तपासल्यानंतर, जर ते योग्य आढळले तर तुम्हाला 30
दिवसात मनरेगा जॉब कार्ड मिळेल. जॉब कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला
तुमच्या गावातील ग्रामसेवकाशी संपर्क साधावा लागेल.
आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन
कार्ड, विवाह नोंदणी आणि पती -पत्नीचा फोटो एकत्र द्या. ही
सर्व कागदपत्रे दिल्यानंतर, गावातील ग्रामसेवक, आवश्यक अधिकाऱ्यांसह या दस्तऐवजावर स्वाक्षरी आणि पडताळणी केल्यानंतर,
मनरेगाच्या वेबसाइटवरील अधिकृत पोर्टलवरून ऑनलाइन अर्ज करतील.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी
द्वारे देण्यात येणारी मजुरी दर :
मनरेगा या कायद्याच्या कलम 6 नुसार दरवर्षी मजुरीचे दर हे केंद्र शासन निश्चित करते
केंद्र शासनाने ठरविलेल्या दराप्रमाणे मजुरास मजुरी मिळते कामाप्रमाणे दाम
स्त्री-पुरुष समान दर ठेवण्यात येतो.
मागील पाच वर्षातील शासनाने ठरवले मजुरीचे दर
पुढील प्रमाणे आहेत.
2016-17 करिता रु.192/- प्रति मनुष्य प्रतिदिन
2017-18 करिता रु.201/- प्रति मनुष्य प्रतिदिन
2018-19 करिता रु. 203/- प्रति मनुष्य प्रतिदिन
2019-20 करिता रु. 206/- प्रति मनुष्य प्रतिदिन
2020-21 करिता रु. 238/- प्रति मनुष्य
प्रतिदिन
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी online ऑनलाईन उपलब्ध :
रोजगार हमी योजनेच्या कामात अधिक वेग यावा व ही
माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावी म्हणून शासनाने ऑनलाइन पोर्टल सुरु केला
आहे. या पोर्टल मधून योजनेच्या लाभार्थ्यांची यादी मनरेगा जॉब कार्ड धारकांची यादी, जॉब कार्ड क्रमांक, मनरेगाच्या विविध
योजने अंतर्गत करण्यात आलेली कामे भरलेल्या कामाचे एकूण दिवस व e-fms प्रणालीद्वारे बँक खात्यात जमा झालेले अनुदान आणि मजुरी इत्यादी योजनेची
संपूर्ण माहिती nrega.nic.in या संकेतस्थळावर पाहता येते.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व ही माहिती सामान्य
समाज बांधवांना पर्यंत नक्की शेअर करा.