या मुला मुलींना मिळणार दर महिन्याला ३ हजार रुपये शिष्यवृत्ती, या प्रकारे करा अर्ज

या मुला मुलींना मिळणार दर महिन्याला ३ हजार रुपये शिष्यवृत्ती, या प्रकारे करा अर्ज

 





Scholarship 2024 : शाळा सोडणाऱ्या मुलींची संख्या कमी करण्यासाठी आणि दररोजची उपस्थिती 100 टक्के राहावी पासाठी सरकारने अनेक उपक्रम राबवले आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सावित्रीबाई फुले प्री मैट्रिक शिष्यवृत्ती इयत्ता पाचवी ते दहावीच्या मुलींसाठी सुरू करण्यात आली आहे. शिष्यवृत्ती रु.600 ते रु. 3 हजारांपर्यंतची रक्कम प्रदान करते. यासाठी शाळा विद्यार्थ्यांची माहिती समाजकल्याण विभागाला देतात. शिष्यवृत्ती मंजूर झाल्यानंतर निधी पेट संबंधित विद्यार्थ्याच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जातो.

काय आहे सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती

सावित्रीबाई फुले प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय मुक्त जाती आणि भटक्या जमातीमधील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींना दिली जाते. नियमित उपस्थिती असणे अनिवार्य आहे. इयत्ता पाचवी ते सातवीमधील विद्यार्थिनींची उपस्थिती किमान ७५ टक्के असल्यास त्यांना ६०० रुपये मिळतात. इयत्ता आठवी ते दहावीच्या महिला विद्यार्थ्यांना वर्षाला १००० रुपये दिले जातात.

 

निकष काय

शिष्यवृत्ती प्राप्त करण्यासाठी संबंधित विद्यार्थिनींना त्यांच्या पालकांचे उत्पन्न प्रमाणपत्र देणे, मुख्याध्यापकांकडून संबंधित प्रवर्गाचा दाखला आणि शाळेत किमान 75 टक्के उपस्थिती राखणे बंधनकारक आहे.

 

अर्ज करण्याची पध्दत

योजनेचे संगणकीकरण करण्यात आले असून ऑनलाइन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी या योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज / माहिती https://mahaeschol.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पूर्ण करून संबंधित जिल्ह्यातील जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडे जमा करावी.

 

संपर्क कार्यालयाचे नाव

• संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद

• सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण मुंबई शहर उपनगर

• संबंधित शाळांचे मुख्याध्यापक

 

कागदपत्रे काय लागतात

राज्य सरकारच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र होण्यासाठी विद्यार्थ्याकडे राष्ट्रीयीकृत बँकेतील खाते आधार कार्ड आणि मागील वर्षांची गुणपत्रिका यासह काही कागदपत्रे असणे आवश्यक आहे. ही कागदपत्रे शाळांमधून मिळू शकतात. पाव्यतिरिक्त, समाज कल्याण कार्यालयांमधील शिक्षकांची माहिती संकलित आणि पुनरावलोकन करते. त्यानंतर निकष पूर्ण करणाऱ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.