घरकुल योजना 2024 यादीत तुमचं नाव आहे का ? असं तपासा ऑनलाईन : Gharkul Yojana List 2024

घरकुल योजना 2024 यादीत तुमचं नाव आहे का ? असं तपासा ऑनलाईन : Gharkul Yojana List 2024

 




राज्यातील गोरगरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या नागरिकांना राज्य शासनाकडून घरकुल योजनेचा लाभ दिला जातो. घरकुल योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ग्रामपंचायतीकडून करण्यात येणाऱ्या सर्वे यादीत तुमचं नाव असणे आवश्यक आहे. जर तुमचं नाव घरकुल योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये असेल, तर घरबसल्या तुमच्या मोबाईलवर तुम्हाला नाव तपासता येईल, याबद्दलची माहिती आपण याठिकाणी जाणून घेणार आहोत.

घरकुल योजना महाराष्ट्र 2024 यादी

PMAYG म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ दिला जातो. अनेक नागरिकांना लाभ मिळाल्यानंतर संबंधित लाभाची संपूर्ण माहिती किंवा लाभार्थी यादी ऑनलाईन तपासायची असते, अश्यावेळी त्यांना पुरेशी माहिती नसल्यामुळे ऑनलाइन यादी तपासता येत नाही; परंतु लाभार्थ्यांना ऑनलाइन यादी तपासण्यासाठी एकदम सोपी पद्धत शासनाकडून देण्यात आलेली आहे. तुम्ही घरकुल यादीत नाव खालीलप्रमाणे तपासू शकता.


घरकुल योजना 2024 यादीत तुमचं नाव तपासण्यासाठी मोबाईलमध्ये सर्वप्रथम उमंग या नावाचा एप्लीकेशन सर्च करून इंस्टॉल करून घ्या. एप्लीकेशन इन्स्टॉल केल्यानंतर 6 अंकी MPIN Set करून सबमिट या बटणावर क्लिक करा. जर तुम्ही नवीन असाल तर, Register या पर्यायावर क्लिक करून नोंदणी करून घ्या, त्यानंतर नोंदणी झाल्यास लॉगिन करा व तुमचा मोबाईल नंबर आणि MPIN टाकून पुढील प्रक्रिया करा.


लॉगिन झाल्यानंतर खालील प्रक्रिया करा

• लॉगिन झाल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये दिसणाऱ्या चौकटीत PMAYG असा शब्द टाकून सर्च करा.

• सर्च केल्यानंतर Pradhan Mantri Awas Yojana Gramin असा पर्याय दिसेल त्या पर्यायावर किंवा लिंकवर क्लिक करा.

• त्यानंतर Panchayat Wise Permanent Wait List या पर्यायावर क्लिक करा.

• पुढील टप्प्यात तुमचे राज्य, जिल्हा, पंचायत समिती व गाव इत्यादी पर्याय निवडून सर्च या बटणावर क्लिक करा.

• सर्च बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या गावातील ज्या लोकांना शासनाच्या वतीने घरकुल मिळालेले असेल, अशा सर्वांची यादी तुमच्या मोबाईलवर दिसेल. लाभार्थ्यांचे नाव किंवा आडनाव टाकून देखील तुम्ही लाभार्थ्यांची यादीत नाव शोधू शकता.