Kanda Pik Anudan शेतकर्‍यांच्या खात्यात कांदा अनुदान जमा होणार , ही कागदपत्रे तयार ठेवा , या तारखेपासून अर्ज सुरू .

Kanda Pik Anudan शेतकर्‍यांच्या खात्यात कांदा अनुदान जमा होणार , ही कागदपत्रे तयार ठेवा , या तारखेपासून अर्ज सुरू .

 




Kanda Pik Anudan : शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी , कांदा अनुदानाचे पैसे बँक खात्यात जमा होणार पण या यासाठी कोण कोणती कागदपत्रे लागतात अर्ज कुठे करायचा कोणला मिळणार अनुदान कोणते शेतकरी पात्र आहे . सविस्तर पणे सर्व वाचा . राज्यातील 2022-23 या वर्षात कांदा उत्पादक शेतकर्‍यांना प्रती क्विंटल 350 रुपयेचे अनुदान शेतकर्‍यांना देण्यात येणार आहे. या साठी 3 एप्रिल ते 20 एप्रिल पर्यत शेतकर्‍यांनी अर्ज करावेत. जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांनी कांदा विकला आहे त्यांना अनुदान मिळणार आहे .

अर्ज कोठे करावा ? व कधी Kanda Pik Anudan

शेतकरी मित्रांनो कांदा अनुदानासाठी 3 एप्रिल पासून अर्ज सुरू होत आहे . पण शेतकर्‍यांना हे माहीत नाही की अर्ज कुठे करावा . तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही कांदा विकला आहे त्या ठिकाणी म्हणजे कृषि उत्पन्न बाजार समिति , खाजगी बाजार , नाफेड खरीदी केंद्र यांच्या कडे 20 एप्रिल पर्यत अर्ज सादर करावा .

अर्ज करण्यासाठी कागदपत्रे कोण कोणती लागतात .

ज्या ठिकाणी तुम्ही कांदा विक्री केला आहे . तेथे तुम्हाला कागदपत्रे जमा करायची आहे . कोण कोणती कागदपत्रे लागतील पहा .

• कांदा विक्री केलेली पावती ( मूळपट्टी )

• 7/12 उतारा, ( कांदा पिकांची नोंद असलेला )

• बँक पासबुक झेरॉक्स

• आधार कार्ड झेरॉक्स

• कांदा विक्री पट्टी मुलाच्या अथवा अन्य कुटुंबाच्या नावे आहे असा वेळेस सहमती असणारे शपथ पत्र .


कांदा अनुदान कोणाला मिळणार ? Kanda Pik Anudan

ज्या शेतकर्‍यांनी कांदा 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधी कांदा विक्री केला आहे त्यांना हे कांदा अनुदान मिळणार आहे . शेतकर्‍यांना प्रती क्विंटल 350 रुपये ते जास्तीस जास्त 200 रुपये प्रती शेतकरी अनुदान मिळणार आहे.