प्लास्टिक मल्चिंग पेपर अनुदान योजना : Plastic Mulching Paper Yojana

प्लास्टिक मल्चिंग पेपर अनुदान योजना : Plastic Mulching Paper Yojana

 




मित्रांनो, शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध अशा योजना राबविण्यात येतात. ज्यामध्ये भाजीपाला व फळपिकासाठी प्लास्टिक मल्चिंग करण्यासाठी अनुदान देणारी एकमात्र योजना म्हणजे प्लास्टिक मल्चिंग पेपर अनुदान योजना होय.

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत प्लास्टिक मल्चिंग करण्यासाठी 50% पर्यंत अनुदान दिलं जातं. या लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की, Plastic Mulching Paper Yojana काय आहे ? अनुदान किती दिलं जातं ? अर्ज कसा करावा ? पात्रता व कागदपत्र इत्यादी संपूर्ण माहिती.

महाराष्ट्रमध्ये मोठ्या प्रमाणावर भाजीपाला व फळपिकाची लागवड केली जाते. या अनुषंगाने राज्य शासनामार्फत प्लास्टिक मल्चिंग पेपरसाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्याची योजना Mahadbt पोर्टलच्या माध्यमातून सुरू करण्यात आली.

भाजीपाला व फळझाडांसाठी प्लास्टिक आच्छादन असल्यास पाण्यामुळे होणारा बाष्पीभवनाचा त्रास कमी होतो, त्याचप्रमाणे पिकावरील कीड, रोगराई इत्यादीपासून पिकांचे संरक्षण होते, त्यामुळे प्लास्टिक मल्चिंग पेपरचा वापर सध्या मोठ्या प्रमाणावर केला जात आहे.

शेतकऱ्यांचा प्लास्टिक मल्चिंग पेपरसाठी वाढता वापर पाहता शासनाकडून 50% अनुदान दिलं जात. सामान्यता प्रति एकर प्लास्टिक मल्चिंग पेपरचा खर्च जर पाहिला, तर 32,000 रुपये इतका येतो. यासाठी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत 50% अनुदान शासनाकडून दिले जातं, म्हणजेच जवळपास शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 16 हजार रुपये प्रति हेक्टरसाठी अनुदान मिळणार आहे.

अनुदानाची रक्कम मर्यादा ही दोन हेक्‍टरपर्यंत ठरविण्यात आलेली असून डोंगराळ भागासाठी वाढीव खर्च 36 हजार 800 याप्रमाणे 50% अनुदान त्या भागातील शेतकऱ्यांना दिला जातो. यामध्ये वैयक्तिक शेतकरी, शेतकरी समूह, शेतकरी उत्पादक कंपनी, बचत गट इत्यादींना अर्थसाह्य केलं जातं.

मल्चिंग पेपरची पीकनिहाय जाडी

मल्चिंग पेपरची जाडी ही पिकाच्या कालावधीनुसार ठरविण्यात येते. विविध फळ पिकांसाठी, भाजीपाल्यांसाठी ही जाडी वेगवेगळी असू शकते. कालावधीनुसार मल्चिंग पेपरची जाडी तुम्ही खालील प्रमाणेपाहू शकता.

• 3-4 महिना पीक कालावधी : 25 मायक्राँन

• 4-12 महिना पीक कालावधी : 50 मायक्राँन

• 12 महिन्यावरील पीक कालावधी : 100 किंवा 200 मायक्राँन

अर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्र

• अर्जदारांचा आधारकार्ड

• आधार सलग्न बँक पासबुक

• जमिनीचा ७/१२ व ८अ उतारा

• शेतीतील पिकांची माहिती

अर्ज कसा करावा ?

• सर्वप्रथम Plastic Mulching Paper Yojana अंतर्गत अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला महाडीबीटी शेतकरी पोर्टल वरती जायचं आहे.

• त्यानंतर नोंदणी करताना तुम्ही टाकलेला युजर आयडी पासवर्ड टाकून लॉगिन करा.

• फलोत्पादन या पर्यायासमोरील बाबी निवडा या बटणावर क्लिक करून त्यामध्ये प्लास्टिक मल्चिंग पेपर हा पर्याय शोधून निवडा.

• त्यानंतर तुम्हाला जितक्या क्षेत्रावरती मल्चिंग हवा आहे तो क्षेत्र टाकून अर्ज जतन करा या पर्यायावर क्लिक करा.

• त्यानंतर तुम्ही एकापेक्षा जास्त योजनासाठी अर्ज केला असेल, तर त्यामध्ये प्राधान्य निवडा प्राधान्य क्रमांक दिल्यानंतर सर्वात शेवटी अर्ज सादर करा.

• तुम्ही जर या घटकांतर्गत सर्वप्रथम अर्ज करत असाल तर त्यासाठी 23 रुपये 60 पैसे इतकी पेमेंट तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करावी लागेल.

अशाप्रकारे एकदम सोप्यापद्धतीने तुम्ही ऑनलाईन घरबसल्या प्लास्टिक मल्चिंग पेपर योजनेसाठी अर्ज करू शकता व या योजनेअंतर्गत 50 टक्यापर्यंत अनुदान मिळवू शकता.