नवीन विहीर बांधकाम अनुदान योजना | Navin Vihir Anudan Yojana

नवीन विहीर बांधकाम अनुदान योजना | Navin Vihir Anudan Yojana

 





नमस्कार मित्रांनो , जर तुम्हाला नवीन विहीर काढायची असेल तर तुम्हाला महाराष्ट्र सरकार ही अनुदान देते . Navin Vihir Anudan Yojana तर हे अनुदान कसे मिळवायचे ? कागदपत्रे कोणती लागतील याची संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये समजून घेणार आहोत . आधी माहिती समजून घ्या . नंतर तुम्हाला अर्ज करायचा आहे .

नवीन विहीर अनुदान मिळवन्यायासाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे . हा अर्ज तुम्हाला MahaDBT या पोर्टल वरती करायचा आहे .यासाठी तुम्हाला २ लाख ५० हजार रु पर्यन्त अनुदान ही दिले जाते . अर्ज कसा करायचा याची माहिती तुम्हाला खाली दिली आहे . त्याआधी कागदपत्रे कोणती लागणार हे पहा .

नवीन विहीर साठी लागणारी कागदपत्रे -Navin Vihir Anudan Yojana

मित्रांनो तुम्हाला अर्ज करतेवेळी जास्त कागदपत्रे लागत नाही . तुमची जेव्हा निवड होईल तेव्हा तुम्हाला कागदपत्रे ही अपलोड करावी लागतात .

• आधार कार्ड

• ७/१२ उतारा

• बँक पासबूक

• मोबाईल नंबर

• जीमेल id

एवढी कागदपत्रे तुम्हाला अर्ज करतांना लागतात . आणि निवड झाल्यावर तुम्हाला खालील कागदपत्रे लागणार आहेत .

• ग्रामसभेचा ठराव

• पाणी उपलब्ध असल्याचा दाखला

• कृषि अधिकारी याची शिफारस

• ७/१२

• जातीचा दाखला

वरील कागदपत्रे तुम्हाला निवड झाल्यावर अपलोड करावी लागतात .

आवश्यक पात्रता

खालील पात्रता तुम्हाला पूर्ण करावी लागणार आहे .

• अर्जदार हा अनुसूचित जमाती मधील असावा .

• अर्जदारकडे कमीत कमी १ एकर जमीन असायला पाहिजे .

• या आधी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा .

अर्ज कसा व कुठे करावा ?

अर्ज हा तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे . अर्ज करण्याची लिंक तुम्हाला खाली दिली आहे . जर तुम्हाला अर्ज भरता येते नसेल जर जवळच्या सायबर कॅफे वरती भेट द्या . तेथे तुम्हाला अर्ज भरून दिला जाईल .

आँनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा