Mahavitran Job:दहावी उत्तीर्णांना महावितरणमध्ये नोकरीची संधी

Mahavitran Job:दहावी उत्तीर्णांना महावितरणमध्ये नोकरीची संधी

 




Mahavitarn Job: दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. या उमेदवारांना महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत नोकरी करता येणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. उमेदवारांना सोलापूर येथे नोकरी करावी लागणार आहे.

सोलापूर महावितरणमध्ये शिकाऊ उमेदवार म्हणजे अप्रेंटिसची पदे भरली जाणार आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकतात. यासोबतच पदानुसार मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून शिक्षण पूर्ण केलेले असावे. वीजतंत्री / तारतंत्री या शाखेतून दोन वर्ष कालावधीचा आय.टी.आय. उत्तीर्ण उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. एक वर्षाच्या कालावधीसाठी ही भरती केली जाणार आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्या.

पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.

या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. तसेच उमेदवारांना संबंधित संस्थेने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.

उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. ३० एप्रिल २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.


अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा