बिजनेस लोन कसे घेतात? | Business Loan Information in Marathi

बिजनेस लोन कसे घेतात? | Business Loan Information in Marathi

 





Business Loan Information in Marathi – व्यवसाय म्हणजे बिजनेस करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. पण प्रत्येकाला ते शक्य होते असे नाही. व्यवसाय करण्यासाठी अनेक गोष्टी असाव्या लागतात. बिजनेस करण्यामध्ये मोठी जोखीम देखील असते.त्यामुळे बिजनेस करण्याचा निर्णय अतिशय विचारपूर्वक घ्यावा लागतो. व्यवसाय करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्वात आधी प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे त्यासाठी लागणारे भांडवल कसे उभे करायचे? जास्तीत- जास्त नागरिकांनी व्यवसाय करावा यासाठी सरकारने देखील अनेक योजना सुरू केल्या आहेत. व्यवसायासाठी जलद कर्ज मिळावे यासाठी देखील काही खास योजना सुरू केल्या आहेत. आजच्या लेखात आपण बिजनेस लोन कसे मिळवावे हे पाहणार आहोत. बिजनेस लोन विषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. बिजनेस लोनसाठी लागणारे कागदपत्र, कोणत्या योजना आहेत, त्यासाठी किती व्याजदर असतो हे आपण पाहणार आहोत.

व्यवसाय कर्ज (बिजनेस लोन काय असते?)| What is a Business Loan in Marathi?

बिजनेस लोन म्हणजेच व्यवसायिक कर्ज हे कोणताही नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी घेतले जाते. बिजनेस लोन कोणत्याही व्यवसायासाठी घेतले जाऊ शकते, तुमचा व्यवसाय छोटा असो की मोठा सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी बिजनेस लोन घेतले जाते. तुम्हाला एखादे दुकान सुरू करायचे आहे किंवा एखादी डिस्ट्रिब्युटरशिप  घ्यायची आहे किंवा एखादा लघु उद्योग सुरू करायचा आहे. तुम्ही बिजनेस लोन घेऊ शकता.अनेकदा तुमचा व्यवसाय सुरू असतो, तो व्यवसाय तुम्हाला वाढवायचा असेल तर त्यासाठी देखील तुम्हाला कर्ज मिळते.अनेकदा व्यवसाय वाढविण्यासाठी भांडवल लागते ते आपल्याकडे नसते अशा वेळेस बिजनेस लोन उपयुक्त ठरते.सोप्या भाषेत बिजनेस लोन म्हणजे तुम्हाला एखादा नवीन व्यवसाय करायचा आहे, तो व्यवसाय वाढवायचा आहे त्यासाठी लागणारे भांडवल म्हणजेच पैसा तुम्ही बँकेकडून कर्ज स्वरूपात घेता त्याला बिजनेस लोन म्हणतात.

व्यवसाय कर्ज संबंधी महत्वपूर्ण माहिती | Important Information Regarding Business Loans

कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्था जेव्हा एखाद्या व्यक्तीला बिजनेससाठी लोन देते तेव्हा त्या व्यक्तीबद्दल सर्व माहिती विचारात घेतली जाते, जसे की बिजनेस लोन घेणारी व्यक्ती ते कर्ज फेडू शकेल का? त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत काय आहे.जर ती व्यक्ती बिजनेस लोन फेडू शकली नाही तर जोखीमसाठी काय करता येईल यासर्व बाबीचा विचार करून बिजनेस लोन दिले जाते. त्यामुळे तुम्ही जर बिजनेस लोन घेण्याच्या विचारात असाल तर बँक आणि त्यांची संपूर्ण माहिती काढा.त्यामुळे तुमची होणारी धावपळ होणार नाही.

व्यवसाय कर्ज  घेताय ? आधी हे लक्षात ठेवा | Taking a business loan? Remember this first

रोजगार आणि व्यवसाय वाढावा यासाठी सरकार अनेक योजनामार्फत बिजनेस लोन देते. पण बिजनेस लोन घेताना आधी तुम्हाला कोणता व्यवसाय करायचा आहे, त्या व्यवसायाची गरज काय आहे? किती लोन घ्यायला हवे? त्यांचा कालावधी काय आहे? कोणती सरकारी योजना व्यवसायासाठी लागू होते का? हे देखील तपासावे.व्यवसायिक लोन घेताना तीन बाबी महत्वाच्या असतात.

1. सरकारी योजनेअंतर्गत घेतलेले बिजनेस लोन  Business loans taken under government schemes
2. सरकारी किंवा गैर सरकारी बँकाकडून घेतलेले लोन  Loan taken from Govt or Non Govt Bank
3. महिला व्यवसायिकांसाठी  घेतलेले विशेष लोन Special loans for women entrepreneurs

सरकारी योजनेअंतर्गत घेतलेले व्यवसाय कर्ज  –  Business loans taken under government schemes

मागील काही वर्षात सरकारद्वारे व्यवसाय वाढीसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत.या योजनेद्वारे झटपट बिजनेस लोन उपलब्ध होते. एमएसएमई (MSME) म्हणजेच लघु उद्योग कर्ज, मध्यम कर्ज आणि छोट्या व्यवसईकांना दिले गेलेले कर्ज असे प्रकार पडतात. नवीन स्टार्ट अप आणि लघु उद्योगयासाठी अनेक विशेष योजना आहेत.

• मुद्रा लोन

• स्टँड अप इंडिया

• कॉयर उदयमी योजना

• बँक क्रेडिट सुविधा योजना

• नाबार्ड

सरकारी किंवा गैरसरकारी खाजगी बँकांकडून घेतलेले व्यवसाय कर्ज | Loan taken from Govt or Non Govt Bank

• टर्म लोन

• वर्किंग कॅपिटल

• स्टार्ट अप लोन

• चालान वित्तपोषण

• उपकरण वित्तपोषण

• ओव्हर ड्राफ्ट

महिला व्यवसायिकानी घेतलेले कर्ज  Special loans for women entrepreneurs

महिला व्यवसायिकासाठी सरकारी बँका आणि खाजगी बँका विशेष कर्ज देतात. महिलांनी अधिका अधिक व्यवसाय करावा यासाठी अनेक सरकारी बँका विशेष कर्ज योजना देखील चालवितात. NBFCs  सारख्या संस्थांनी अनेक खास योजना सुरू केल्या आहेत.

• सेंट कल्याणी स्कीम

• स्त्री शक्ती पॅकेज

• देना शक्ती स्कीम

• उद्योगिनी स्कीम

• महिला उद्यम निधी स्कीम

व्यवसाय कर्जासाठी लागणारी पात्रता | Eligibility for Business Loan in Marathi

जेव्हा तुम्ही कोणतेही कर्ज घेता, तेव्हा तुम्हाला ते कर्ज देताना ती बँक काही विशिष्ट अटी आणि शर्थी ठेतात. बँक कोणालाही कर्ज देताना तो कर्ज घेणारा व्यक्ती कर्ज फेडू शकेल का यांची पूर्ण तपासणी करतात. त्यासाठी कोणत्या व्यवसायासाठी कर्ज हवे आहे.व्यवसाय काय आहे हे तपासून कर्ज देतात. या बरोबरच कर्ज देताना खालील अटीची पूर्तता होणे गरजेचे आहे.

• कर्ज घेणारी व्यक्ती ही भारताची नागरिक असावा

• व्यवसाय काय करणार  आहे याचा संपूर्ण प्लॅन असणे आवश्यक

• आवेदकाचे वय हे १८ ते ३५ वर्षाच्या मध्ये असावे.

• जर तुम्ही सुरू असलेल्या व्यवसायावर कर्ज घेणार असाल तर तुमचा व्यवसाय किमान ३ वर्ष जुना असावा.

• या पूर्वी कोणत्याही बँकेने तुम्हाला डीफॉल्टर घोषित केलेले नसावे.

व्यवसाय कर्जासाठी लागणारी कागदपत्रे | Documents required for business loan in Marathi

• ओळखपत्र

• आधार कार्ड

• पॅन कार्ड

• मतदान ओळख पत्र

• रेशन कार्ड

• पासपोर्ट

• आर्थिक कागदपत्रे- इन्कम टॅक्स रिटर्न भरलेली किमान तीन वर्षाची फाईल.किमान दोन वर्षांची बॅलन्सशीट

• पार्टनरशिप डीड- जर तुमचा व्यवसाय भागीदारीमध्ये असेल तर त्यासाठी पार्टनरशिप  डीड असणे गरजेचे आहे.

व्यवसाय कर्जासाठी मर्यादा | Business Loan Limit

जर तुम्ही बँकेकडून बिजनेस लोन घेत असाल तर तुम्हाला त्यासाठी काही मर्यादा आहेत. तुमचा व्यवसाय कोणत्या पद्धतीचा आहे,त्या नुसार बिजनेस लोन दिले जाते.5 हजार रुपये ते 2 करोंड इतके बिजनेस लोन मिळते.तुम्हाला लोन मिळण्यासाठी तुमचे क्रेडिट प्रोफाइल उत्तम असणे गरजेचे आहे.NBFC सारख्या संस्था लोन देताना तुमची सर्व माहिती तपासून त्यानुसार तुम्हाला बिजनेस लोन देतात.

व्यवसाय कर्जासाठी असणारा व्याजदर | Interest Rates for business loans

जर तुम्ही कोणत्या सरकारी योजनेअंतर्गत बिजनेस लोन घेत असाल तर तुम्हाला व्याजदर माफक असतो.प्रत्येक योजनेनुसार व्याजदर हा वेगळा असतो.जर तुम्ही कोणत्या सरकारी बँकेकडून बिजनेस लोन घेत असाल तर तुम्हाला व्याजदर कमी लागतो. पण जर तुम्ही कोणत्या खाजगी बँकाकडून कर्ज घेत असाल तर तुम्हाला व्याज  दर हा अधिक लागतो.खाजगी बँकामध्ये तुम्हाला कर्ज अगदी कमी वेळेत,जलद गतीने मिळते.सरकारी बँकामध्ये हा वेळ थोडा अधिक लागतो. तुम्ही किती कर्ज घेत आहात यावर देखील अनेकदा व्याजदर अवलंबून असतो. या बरोबरच एकदा का तुम्ही कर्ज घेतले की तुम्हाला सुरुवातीला जो व्याजदर दिला जातो तो तुमचे कर्ज संपेपर्यत समान राहतो. जेव्हा सुरुवातीला तुम्ही कर्ज घेता तेव्हा तुम्हाला व्याजदर सांगितलं जातो. सामान्यता व्याजदर हा बिजनेस लोनसाठी १३ टक्के ते ४८ टक्के या दरम्यान असतो.

बँकाद्वारे व्यवसाय कर्जा  देण्याची प्रक्रिया | Business loan Process in Marathi

तुम्ही तुम्हाला कोणता व्यवसाय करायचा आहे, हे ठरविल्यानंतर तुम्ही तुम्हाला किती बिजनेस लोन हवे आहे, हे ठरविता,त्या नंतर तुम्ही जेव्हा तुमच्या जवळच्या सरकारी किंवा खाजगी बँकेत जाता,तेव्हा तुम्हाला तेथील कर्मचारी बिजनेससाठी कशा प्रकारे कर्ज दिले जाते, यांची संपूर्ण माहिती देतात. बँक मॅनेजरची भेट घेऊन त्यांना देखील तुमच्या व्यवसायाबद्दल माहिती देणे गरजेचे आहे.

व्यवसाय कर्जासाठी  बँकेकडून मिळवण्यासाठी तुम्हाला एक बिजनेस लोन फॉर्म दिला जातो. फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला त्या संबंधी लागणारी सर्व कागदपत्रे जोडल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती भरून दिल्यानंतर बँकेकडून तुम्हाला बँक डॉक्युमेंट वेरीफेकेशन करण्यासाठी बँकेकडून कॉल्स केले जातात, त्या नंतर तुमचे लोन पास केले जाते.काही बँका टप्यामध्ये पैसे देतात, तर काही बँका एकत्र रक्कम जमा करतात.

व्यवसाय कर्जासाठी सिबिल स्कोअर जरूरी आहे का? | Is CIBIL score necessary for business loans?

लोन कोणतेही असो त्यासाठी सिबिल स्कोअर खूप महत्वपूर्ण आहे.जर तुमचा क्रेडिट स्कोअर कमी असेल तर एनबीएफ नाही होऊ शकत.जर तुम्हाला बिजनेस लोन घ्यायचे असेल तर तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोअर  आणि सिबिल स्कोअर खूप महत्वपूर्ण आहे. ७५० हून अधिक सिबिल स्कोअर अतिशय महवपूर्ण आहे. प्रत्येक बँक आणि ज्याने कर्जासाठी आवेदन दिले आहे, त्यांचा सिबिल स्कोअर बघून बँक बिजनेस लोन द्यायचे की नाही हे ठरवतात.जितका अधिक सिबिल स्कोअर असतो बँक तितका आकर्षक व्याजदर देतो.काही बँका ७५० पेक्षा कमी सिबिल स्कोअर असेल तरी देखील लोन देतात.

व्यवसाय कर्जाचे लाभ आणि विशेषता | Benefits and Features of Business Loans

• ज्या व्यक्तीला स्वताचा व्यवसाय करायचा आहे, असा व्यक्ती बिजनेस लोन घेऊन स्वताचा व्यवसाय करू शकतो.

• भारत सरकारद्वारे बिजनेस लोनसाठी अनेक आकर्षक योजना आहेत.

• केंद्र सरकारने बिजनेस लोनसाठी एक खिडकी योजना देखील सुरू केली आहे,ज्यामुळे कर्ज मिळणे अधिक सोप्पे होते.

• बिजनेस लोनमुळे व्यवसाय उभा करणे, वाढविणे सोप्पे झाले आहे.

• व्यवसाय कर्जासाठी सिबिल स्कोअर जरूरी आहे का?

व्यवसाय कर्ज  घेताना ईएमआय कॅल्कुलेटर EMI calculator for taking business loan

जेव्हा तुम्ही बिजनेस लोन घेता, तेव्हा ते लोन कसे फेडायचे यांचा देखील विचार करा. तुम्हाला प्रत्येक महिन्याला किती ईएमआय येईल यांचा देखील विचार करा. प्रत्येक बँकेच्या वेबसाईटवर एक ईएमआय कॅल्कुलेटर असते त्यांचा वापर करून तुम्ही तुम्हाला किती ईएमआय भरायचा आहे,हे ठरवू शकता.

व्यवसाय कर्ज संदर्भात सतत विचारले जाणारे प्रश्न | Frequently Asked Questions Regarding Business Loans

बिजनेस लोन काय आहे?

तुम्हाला तुमचा नवीन बिजनेस सुरू करायचा आहे किंवा आहे तो बिजनेस वाढवायचा आहे त्यासाठी काही सरकारी बँका व काही खाजगी बँका विशिष्ट कर्ज देतात त्यास बिजनेस लोन म्हणतात.

व्यवसाय कर्ज कोण देते ?

सर्व सरकारी बँका, खाजगी बँका, काही खाजगी कंपन्या देखील बिजनेस लोन देतात.

व्यवसाय कर्जासाठी काय नियम आहेत?

प्रत्येक बँक आणि त्यांचे नियम आणि व्याजदर वेगळे असतात.

व्यवसाय कर्जासाठी असणारा व्याजदर काय आहे?

जर तुम्ही कोणत्या सरकारी योजनेअंतर्गत बिजनेस लोन घेत असाल तर तुम्हाला व्याजदर माफक असतो.प्रत्येक योजनेनुसार व्याजदर हा वेगळा असतो.जर तुम्ही कोणत्या सरकारी बँकेकडून बिजनेस लोन घेत असाल तर तुम्हाला व्याजदर कमी लागतो. पण जर तुम्ही कोणत्या खाजगी बँकाकडून कर्ज घेत असाल तर तुम्हाला व्याज  दर हा अधिक लागतो

व्यवसाय कर्जासाठी असलेले प्रकार कोणते ?

1. सरकारी योजनेअंतर्गत घेतलेले बिजनेस लोन
2. सरकारी किंवा गैर सरकारी बँकाकडून घेतलेले लोन
3. महिला व्यवसायिकांसाठी  घेतलेले विशेष लोन

व्यवसाय कर्जासाठी सिबिल स्कोअर जरूरी आहे का?

लोन कोणतेही असो त्यासाठी सिबिल स्कोअर खूप महत्वपूर्ण आहे.जर तुमचा क्रेडिट स्कोअर कमी असेल तर एनबीएफ नाही होऊ शकत.जर तुम्हाला बिजनेस लोन घ्यायचे असेल तर तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोअर  आणि सिबिल स्कोअर खूप महत्वपूर्ण आहे.