सकाळच्या टॉप घडामोडी : 13 मार्च 2023 BREAKING NEWS 13 MARCH 2023

सकाळच्या टॉप घडामोडी : 13 मार्च 2023 BREAKING NEWS 13 MARCH 2023

 




कृषिपंपांना दिवसा बारा तास अखंड वीज पुरवठा करण्यासाठी राज्यातील सर्व रोहित्रांना सौरऊर्जा पुरविली जाणार आहे, देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

केंद्र सरकारचा विरोध;
समिलिंगी विवाह हा मूलभूत अधिकार होऊ शकत नाही, सर्व वैयक्तिक कायद्यांनुसार एक पुरुष आणि एक स्त्री यांच्याच विवाहाला मान्यता आहे,

भारतातील लोकशाहीवर शंका हा देशाचाच अवमान; पंतप्रधान मोदी यांची राहुल गांधींवर अप्रत्यक्ष टीका

India vs Australia 4th Test Series कसोटी क्रिकेटमध्ये तीन वर्षांहूनही अधिक कालावधीपासूनचा शतकाचा दुष्काळ विराट कोहलीने अखेरीस संपुष्टात आणला.

बोगस कर्ज प्रकरणांद्वारे आदिवासींच्या जमिनी लाटण्याचा प्रकार; राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता अडचणीत
मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीत संचालक करतो, नोकरी लावतो, असे आमिष दाखवून बोगस कर्ज प्रकरणे

आमदार बच्चू कडू म्हणाले की, “काहीजण आम्हाला गद्दार म्हणतात. बिलकूल आम्ही गद्दार आहोत. आम्ही नेत्यांचे गद्दार आहोत, जनतेचे नाही. असं म्हणत कडू यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे

आजपासून सरकारी कर्मचारी संपावर; जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्याची मागणी; मुख्य सचिवांच्या बैठकीवर संघटनांचा बहिष्कार

आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला आहे. राज्याच्या ‘सीएम’चा नवीन अर्थ लावला जाणार आहे. ‘सीएम’ म्हणजे ‘करप्ट माणूस’ म्हणून ओळख निर्माण झाली आहे. हे सरकार संविधान बदलणार आहे. त्यामुळे सावध होणं गरजेचं आहे, असा इशाराही आदित्य ठाकरेंनी दिला.

WPL 2023 : मुंबई इंडियन्सचा सलग चौथा विजय, कर्णधार हरमनप्रीतच्या वादळी खेळीमुळं यूपी वॉरियर्सचा पराभव

ODI Cricket: रवी शास्त्रींचे एकदिवसीय क्रिकेटबद्दल मोठं वक्तव्य; आयसीसीला सल्ला देताना म्हणाले, ‘भविष्यातील वनडे क्रिकेटचे अस्तित्व वाचवता येईल.…

जम्मू-काश्मीरमध्ये श्रद्धा हत्याकांडासारखीच घटना: महिलेच्या शरीराचे तुकडे-तुकडे करुन वेगवेगळ्या ठिकाणी फेकले

एलआयसीचे नवे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती: शासनाने MR कुमार यांना तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली नाही, मोहंती सद्या कंपनीत MD

दिवाळखोरीत निघालेल्या श्रीलंकेतील 40 लाख विद्यार्थ्यांच्या पुस्तकांच्या छपाईसाठी भारताची 8 कोटींची मदत..!

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात: छत्रपती संभाजीनगरमधील 6 जण ठार; पाऊण तास मदत न मिळाल्याची प्रत्यक्षदर्शिंची माहिती

भाजप खासदाराचे वक्तव्य– राहुल गांधींना देशाबाहेर हाकलून द्या!: प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या- परदेशी महिलेच्या पोटी जन्मलेला मुलगा देशभक्त होऊ शकत नाही

शिवसेनेच्या शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांचा मॉर्फ व्हिडिओ व्हायरल: दहिसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, एकाला अटक

नारायण राणेंचे मंत्रिपद 2 महिन्यात जाणार: आमदार वैभव नाईक यांचे भाकीत; म्हणाले – भाजपला आता राणेंची राजकीयदृष्टया गरज नाही

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी, चौथ्या दिवसाचा खेळ समाप्त: विराटच्या 186 धावा, टीम इंडिया 571 धावांवर सर्वबाद; ऑस्ट्रेलिया – 3/0

WPLमध्ये मुंबईचा सलग चौथा विजय: UP वॉरियर्सचा 8 गडी राखून पराभव: हरमनची फिफ्टी, इशाकने घेतले 3 बळी

मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखरवर तयार होणार बॉलिवूड चित्रपट, निर्माते आनंद कुमार यांची घोषणा


▪️ *समलिंगी विवाहाला मान्यता देण्याच्या विरोधात केंद्र सरकार:* सुप्रीम कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले- हे भारतीय परंपरेच्या विरोधात

▪️ *जम्मू-काश्मीरमध्ये श्रद्धा हत्याकांडासारखीच घटना:* महिलेच्या शरीराचे तुकडे-तुकडे करुन वेगवेगळ्या ठिकाणी फेकले

▪️ *एलआयसीचे नवे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती:* शासनाने MR कुमार यांना तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली नाही, मोहंती सद्या कंपनीत MD

▪️ *दिवाळखोरीत निघालेल्या श्रीलंकेतील 40 लाख विद्यार्थ्यांच्या* पुस्तकांच्या छपाईसाठी भारताची 8 कोटींची मदत..!

▪️ *भाजप खासदाराचे वक्तव्य- राहुल गांधींना देशाबाहेर हाकलून द्या!:* प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या- परदेशी महिलेच्या पोटी जन्मलेला मुलगा देशभक्त होऊ शकत नाही

▪️ *समृद्धी महामार्गावर भीषण अपघात:* छत्रपती संभाजीनगरमधील 6 जण ठार; पाऊण तास मदत न मिळाल्याची प्रत्यक्षदर्शिंची माहिती

▪️ *शिवसेनेच्या शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांचा मॉर्फ व्हिडिओ व्हायरल:* दहिसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, एकाला अटक

▪️ *नारायण राणेंचे मंत्रिपद 2 महिन्यात जाणार:* आमदार वैभव नाईक यांचे भाकीत; म्हणाले - भाजपला आता राणेंची राजकीयदृष्टया गरज नाही

▪️ *भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी, चौथ्या दिवसाचा खेळ समाप्त:* विराटच्या 186 धावा, टीम इंडिया 571 धावांवर सर्वबाद; ऑस्ट्रेलिया - 3/0

▪️ *WPLमध्ये मुंबईचा सलग चौथा विजय:* UP वॉरियर्सचा 8 गडी राखून पराभव: हरमनची फिफ्टी, इशाकने घेतले 3 बळी

▪️ *मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखरवर तयार होणार बॉलिवूड चित्रपट,* निर्माते आनंद कुमार यांची घोषणा