Well Scheme for Farmers in Maharashtra |महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी विहीर योजना|

Well Scheme for Farmers in Maharashtra |महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी विहीर योजना|

 





नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी ती म्हणजे आता तुम्हाला शेतामध्ये विहीर खोदण्यासाठी ४ लाख रुपये अनुदान मिळणार आहे ही योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी म्हणजेच मनरेगाच्या माध्यमातून सिंचन विहीर खोदण्यासाठी आता चार लाख रुपये इतके अनुदान दिले जाणार आहे याबाबत शासनाने 4 नोव्हेंबर 2022 रोजी निर्णय घेतला आहे व त्यानुसार महाराष्ट्रात आतापर्यंत 3 लाख 87 हजार 500 विहिरी खोदणे शक्य असल्याची माहिती भूजल संरक्षणा विकास यंत्रणेने दिली आहे चला तर मित्रांनो पाहूया विहिरीसाठी अनुदान मिळवायचे असले तर पात्रता काय हवी?
दाखवतो त बाई हे बघ नाही यायचं व यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा याविषयी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा

लाभार्थ्यांची निवड:

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी या योजनेअंतर्गत खालील प्रवर्गातील अर्जदारासाठी प्राधान्य क्रमाने वीर मंजूर करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे

• अनुसूचित जाती

• अनुसूचित जमाती

• भटक्यात जमाती

• विमुक्त जाती

• दारिद्र रेषेखाते लाभार्थी

• स्त्री करता असलेली कुटुंबे

• विकलांग व्यक्ती करता असलेली कुटुंबे

• जमीन सुधारणाची लाभार्थी

• इंदिरा आवास योजनेची लाभार्थी

• सीमांत शेतकरी (2.5 एकर पर्यंत शेतजमीन)

• अल्पभूधारक शेती (पाच एकर पर्यंत शेतजमीन)

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता:

• अर्जदाराकडे एक एकर शेतजमीन असावी.

• अर्जदार पिण्याच्या पाण्याच्या विहिरीपासून पाच मीटरपेक्षा जास्त अंतरावर सिंचन विहीर खोदू शकतो.

• दोन विहिरींमधील किमान 150 मीटर अंतराची अट अनुसूचित जाती-जमातींच्या दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांसाठी लागू नाही तसेच खाजगी विहिरीपासून 150 मीटर अंतराची अटही लागू नाही.

• लाभधारकांच्या सातबारावर विहीर खोदाईची पूर्वीची नोंद नसावी.

• अर्जदाराकडे 8-अ उतारा असणे आवश्यक आहे.

• जमिनीचे एकूण लगतचे क्षेत्र एक एकरपेक्षा जास्त नसावे.

• अर्जदाराकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे


अर्ज कसा आणि कुठे करायचा?

या योजनेंतर्गत अर्जदाराने वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहिरीसाठी ग्रामपंचायतीकडे अर्ज करावयाचा असून ऑनलाइन अर्ज केल्यानंतर शेतकऱ्यांनाही ऑनलाइन अर्ज करता येणार असून, या अर्जाचा नमुनाही शासन निर्णयात देण्यात आला आहे.



अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे

• ऑनलाइन अर्ज केला असेल किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज केला असेल तर त्या अर्जाची प्रत

• त्यासोबत सातबाराचा ऑनलाईन उतारा 8 अ चा ऑनलाईन उतारा

• मनरेगा जॉब कार्ड ची प्रत

• सामुदायिक विहीर खोदायचे असल्यास सर्वजण मिळून 40 गुंठे जमीन सलग असल्याचा पंचनामा

• समोपचारानं पाणी वापरण्याबाबतचा सर्वांचा करार पत्र

कागदपत्रे त्या अर्जासोबत जोडावी तसेच अर्ज हा ग्रामपंचायत कार्यालयात सबमिट करायचा आहे व तसेच ज्यांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज केला असेल त्यांचा अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने भरण्याचं काम ग्रामपंचायत मध्ये होईल व तसेच ग्रामपंचायतीने शेतकऱ्याला पोचपावती द्यायची आहे व तसेच विहिरीच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर सर्वसाधारणतः वीर पूर्ण करण्याचा कालावधी हा दोन वर्षाचा असेल अपवादात्मक परिस्थिती आल्यास जसे की दुष्काळ पूर इत्यादी गोष्टी तर विहीर पूर्ण करण्याचा जास्तीत जास्त कालावधी हा तीन वर्षाचा राहील तर मित्रांनो सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा.