सौर कृषी पंप 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु

सौर कृषी पंप 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु

 





सौर कृषी पंप 2023 या वर्षासाठी ऑनलाईन अर्ज पुन्हा एकदा सुरु झालेले असून काही अर्ज सादर केल्यानंतर थोड्याच वेळाने हि वेबसाईट तांत्रिक अडचणीमुळे बंद झालेली आहे. परंतु लवकरच पुन्हा एकदा हि वेबसाईट सुरु होणार असून वेबसाईट सुरु झाल्यावर ऑनलाईन अर्ज कसे सादर करावे या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत.


कुसुम सौर पंपासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेवूयात या व्हिडीओमध्ये. अनेक शेतकरी बांधवानी सौर कृषी पंपासाठी ऑनलाईन अर्ज केले आहेत आण काही शेतकरी बाकी आहेत.

अनेक शेतकरी बांधवाना त्यांच्या शेतामध्ये सौर कृषी पंप उभारण्याची इच्छा असते परंतु कधी कोटा संपलेला असतो तर कधी सौर कृषी पंप योजनेची वेबसाईट बंद असते.

ज्या वेबसाईटवर सौर कृषी पंप योजनेचे ऑनलाईन अर्ज केले जातात ती वेबसाईट काही कारणास्तव बंद आहे परंतु हि वेबसाईट थोड्याच वेळात पुन्हा सुरळीत सुरु होणार आहे.


सौर कृषी पंप योजनेचा लाभ मिळविण्यासाठी https://www.mahaurja.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज सादर करावा लागतो.

सध्या ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट काही तांत्रिक अडचणीमुळे बंद झालेली आहे परंतु काही वेळात पुन्हा एकदा हि वेबसाईट सुरु होणार असून वेबसाईट सुरळीत सुरु झाल्यावर पुन्हा एकदा शेतकरी बांधव सौर कृषी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात.

शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी बरेच शेतकरी बांधव विद्युत पंपाचा वापर करतात. परंतु लोडशेडिंगमुळे शेतकरी बांधवाना आपल्या शेतातील पिकांना पाणी देणे शक्य होत नाही.


लोडशेडींगमुळे अनेक शेतकरी बांधवाना रात्रीच्या वेळी शेतातील पिकांना पाणी द्यावे लागते. रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देताना दुर्घटना देखील घडू शकतात.

यामुळे अनेक शेतकरी बांधव सोलर पंप अर्थात सौर कृषी पंपाकडे वळलेले आहेत. परंतु सध्या हि वेबसाईट बंद असल्याने अनेक शेतकरी निराश झालेले आहेत.

सौर पंप घेण्यास इतर ठिकाणहून

परंतु लवकरच हि वेबसाईट पुन्हा सुरळीत होणार असल्याने परत एकदा सौर कृषी पंप योजनेसाठी शेतकरी बांधवाना ऑनलाईन अर्ज  करता येणार आहेत.

जेंव्हा हि वेबसाईट सुरु होईल त्यावेळी लगेच ऑनलाईन अर्ज सादर करून द्या.

solar pump योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा.

• महाउर्जा वेबसाईटला  भेट द्या.

• वेबसाईटवरील उजव्या बाजूला महाकृषी अभियान कुसुम सौर कृषी पंप अर्ज नोंदणी अशी लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.

• या लिंकवर क्लिक करताच तुमच्या कॉम्प्युटर स्क्रीनवर सौर कृषी पंप योजनेचा ऑनलाईन अर्ज ओपन होईल त्यामध्ये जी माहिती विचारलेली आहे ती तुम्हाला व्यवस्थित भरायची आहे.


महाऊर्जा वेबसाईडला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा